9
यहूदी आपला शत्रुसना नाश करतस
अदार जो बारावा महिना तेना त्रयोदशीले राजानी आज्ञा अनं फर्मान अमलमा ईसन यहूदी लोकेसवर वरचढ व्हवाना आशेना दिन जोडे वना तो सर्वा उलट व्हईन यहूदी लोके आपला वैरीसवर वरचढ व्हयनात; आपलाले उपद्रव करनारा वैरीसले हात दखाडाना म्हणीन अहश्वेरोश राजाना सर्वा प्रांतमाधला यहूदी लोके आपापला गावमा एकत्र गोया व्हयनात; त्यासनासंगे कोणलेबी सामना करानी हिंमत व्हयनी नही; त्यासना सर्वा लोकसले धाक बसना. प्रांतना सरदार, इलाखाना अधिपती, प्रांतना अधिपती अनं राज्य कारभार चालाडनारा सर्वाजण यासनी यहूदीसले मदत करी; त्या सर्वासले मर्दखयना धाक बसेल व्हता. मर्दखयना राजदरबारमा मोठा मान राहिसन त्यानी किर्ती सर्वा प्रांतमाईन पसरेल व्हती; मर्दखयना महिमा उत्तरोत्तर वाढत गई. इकडे यहूदी लोकसनी आपला सर्वा शत्रुसवर तरवार चालाडीसन त्यासना वध अनं नाश करात; मनमा ई तसं त्यासनी आपला विरोधीसना समाचार लिधात.
शूशन राजवाडामा यहूदी लोकसनी पाचशे लोकसना वध करीन त्यासना धुव्वा उडावा. पर्शन्दाथा, दलफोन, अस्पाथा. पोराथा, अदल्या, अरीदाथा, पर्मश्ता, अरीसई. अरीदय अनं वैजाथा. 10 ह्या यहूदीसना वैरी हामान बिन हम्मदाथा याना दहा पोऱ्या त्यासनी ठार करात. पण त्यासनी धन लुटा नही.
11 त्या दिनले शूशन राजवाडामा ज्यासना वध व्हयना त्यासनी यादी राजाकडे आणी. 12 तवय राजा एस्तेर राणीले बोलना, “यहूदीसनी शूशन राजवाडामाधला पाचशे माणसं अनं हामानना दहा पोऱ्या मारीसन त्यासना फडशा उडायेल शे; मंग राज्यना इतर प्रांतमा त्यासनी काय करं व्हई ते कोणले ठाऊक शे! आते अजून तुनं काही अर्ज शे का? तो मंजुर करामा ई; अजून काही मागणं शे का? त्यानाप्रमाणं करामा ई.”
13 एस्तेर राणी बोलनी, “राजानी मर्जी व्हई तर आजना हुकूमनामायक सकाय बी कराले शूशन आठे यहूदीसले मुभा भेटाले पाहिजे अनी हामानना दहा पोऱ्यासले फाशी देवाना खांबवर लटकाडानं.” 14 त्यानाप्रमाणं करानी राजआज्ञा व्हयनी. शूशन आठेन फर्मान निंघनात अनं लोकसनी हामानना दहा पोऱ्यासले फासावर लटकाडात. 15 शूशन आठला यहूदीसनी अदार महिनाना चौदावा दिनले एकत्र गोया व्हईसन शूशन आठला तीनशे माणसंसले मारी टाकात; पण त्यासनी लुटेल धनले हात लाया नही.
16 राज्यमाधला येगयेगळा यहूदी एकत्र व्हईसन आपला जीव वाचाडाले उभा राहिनात; त्यासनी आपला वैरीसपाईन पंचाहत्तर हजार लोकेसना नाश करात अनं त्या वैरीसपाईन विसावा पावनात; पण त्यासनी लुटले हात लायात नही. 17 अदार महिनाना तेरावा दिनले हाई घडनं; त्यासनी चौदावा दिनले आराम करीसन तो दिन मेजवाणीना अनं आनंद उत्सवना ठरायं. 18 पण शूशन आठला यहूदी तेरावा अनं चौदावा असा दोन दिनले एकत्र गोया व्हयनात अनी पंधरावा दिनले त्यासनी आराम करीसन तो दिन मेजवाणीना अनं आनंद उत्सवना ठरावा. 19 पण गावकूस न राहेल गावमा राहनारा गावढेकरी यहूदी अदार महिनानी चौदावा दिनले आनंद उत्सवना मंगलदिनले एकमेकसले भेटना ताटे धाडाना दिन ठराईसन पाळतस.
पुरीम सण
20 मंग मर्दखयनी हाई सर्वी माहिती लिखी काढी अनी अहश्वेरोश राजाना दूरना अनं जोडेना सर्वा प्रांतमाधला यहूदी लोकसले पत्र धाडीसन येनाप्रमाणं फर्मान करात. 21 अदार महिनाना चौदावा अनं पंधरावा ह्या दिन वरीसन वरीसले पाळत जावानं. 22 ह्या दिनले यहूदीसले आपला शत्रुसपाईन विसावा प्राप्त व्हयना, हाऊ महिनामा दु:ख जाईन आनंद प्राप्त व्हयना, अनी शोक जाईन शुभदिन प्राप्त व्हयना, म्हणीन तो पाळानं; ह्या दिन आनंद उत्सव करामा, एकमेकसले भेटना ताटे धाडानं अनं गोरगरीबसले दानधर्म करामा घालानं. 23 यहूदी लोकसनी सुरवात करेल व्हती त्यानाप्रमाणं अनं मर्दखयनी त्यासले लिखी धाडेल व्हतं त्यानाप्रमाणं यहूदीसनी संप्रदाय चालू करानं कबूल करात. 24 सर्वा यहूदीसना विरोधी अगागी हामान बिन हम्मदाथा यानी यहूदीसना नाश कराना बेत करीसन त्यासना पुर्ण नायनाट कराकरता त्यानी पुर म्हणजे चिठया टाकेल व्हत्यात. 25 पण राजाना ध्यानमा हाई प्रकरण ईसन त्यानी लेखी हुकूम करात यावरीन हामानना जे कपट कारस्थान यहूदी लोकेविरूध्द योजेल व्हतं ते त्यानाच माथावर उलटना अनी तो अनं त्याना पोऱ्या फाशीना खांबवर टांगामा वनात. 26 यामुये पुर हाऊ शब्दवरीन त्या दिनले पुरीम हाई नाव पडनं. हाऊ पत्रमाधला अक्षरवरीन अनी त्यासनी स्वत: या बाबतमा जे दखेल व्हतं अनी त्यासनावर जे बितेल व्हतं त्यानावरीन. 27 यहूदी लोकेसनी आपलाकरता, आपला वंशजकरता अनं ज्या त्यामा सामील व्हयना व्हतात त्यासनाकरता असा अढळ नियम अनं प्रतिज्ञा करी की, त्या लेखनानुसार वरीसवरीसले योग्य काळले ह्या दोन दिन पाळानं. 28 अनी पिढानपिढी प्रत्येक कुटुंबमा, प्रत्येक प्रांतमा अनं प्रत्येक गावमा ह्या दिननं स्मरण करीसन तो पाळामा येवाले पाहिजे. हाऊ पुरीम सणना दिन पाळाले यहूदी लोकसनी चुकानं नही; त्यानं स्मरण त्यासना वंशजमाईन कधीच नष्ट व्हवाले नको.
29 हाऊ दुसरा पत्रनानुसार पुरीम पाळानं मंजुर व्हवाले पाहिजे म्हणीन अबीहाइलानी पोर एस्तेर राणी हिनी अनी मर्दखय यहूदी यानी आपला अधिकारतीन फर्मान लिखात. 30 त्याना नकला मर्दखयनी अहश्वेरोश राजाना एकशे सत्तावीश प्रांतमाधल्या सर्वा यहूदीसले लिखी धाडात; त्यामा शांती देनारा सत्यवचनं व्हतं. 31 ह्या पत्रना आशय अश व्हतं की, पुरीमना नेमेल येळले मर्दखय अनं एस्तेर राणी यासन्या आज्ञा प्रमाणं अनी यहूदी लोकसनी स्वत:करता अनं आपला वंशजकरता करेल ठरावप्रमाणं उपवास अनं विलाप करामा येवाले पाहिजे. 32 पुरीमना संबधना नियम एस्तेरना आज्ञातीन स्थिर करामा वना, अनी हाई ग्रंथमा लिखी ठेवात.