2
एस्तेर पट्टराणी व्हस
यानानंतर अहश्वेरोश राजाना राग शांत व्हयना, तवय त्याले वश्ती राणीनी काय करेल व्हतं अनं त्यामुये तिनाविरूध्द काय ठराव व्हयेल व्हता यानं याद वनी. मंग त्यानी सेवाचाकरी करनारा त्याना सेवक त्याले बोलनात, “राजाकरता तरूण अनं देखणी कुवारीसना शोध करानं; राजानी आपला सर्वा प्रांतसमा अमलदार नेमानं; त्यासनी सर्वा देखण्या अनं तरूण कुवाऱ्या शूशन वाडामाधलं अंतपुरमा गोया करीसन राजबाईसना रक्षक हेगे नावना खोजा जो शे, त्याना स्वाधीन करानं अनी त्यासन्या शुध्दताकरता त्यासले पाहिजे त्या वस्तु देवानं; मंग त्यासनापाईन जी कुवारी राजाना मनमा ई ती वश्ती राणीना ठिकाणमा राजानी पट्टराणी व्हवानं.”
हाई गोष्ट राजाले पसंत पडनी मंग त्यानी त्यानाप्रमाणे करं.
शूशन राजवाडामा मर्दखय बिन याईर बिन शिमई बिन कीश हाऊ नावना एक बन्यामिनी यहूदी व्हता; बाबेलना राजा नबुखद्नेस्सर यानी यहूदाना राजा यखन्या यानाबरोबर ज्या लोके यरुशेलममाईन धरी लेयल व्हतात त्यासनापाईन हाऊ एक व्हता. त्यानी आपला चुलतानी पोर हदस्सा म्हणजे एस्तेर हिना पालनपोषण करेल व्हतं; तिले मायबाप नव्हतात; ती पोर देखणी अनं रूपवान व्हती. तिना मायबाप मरावर मर्दखयनी तिले स्वतःनी पोरनागत सांभाळेल व्हता.
राजानी आज्ञा अनं त्याना ठराव प्रसिध्द व्हवावर बऱ्याच कुवाऱ्या शूशन राजवाडामा हेगेना हवाली करामा वन्यात; एस्तेर हिलेबी राजमंदिरमाधलं बाईसना रक्षक हेगे याना ताबामा दिधं. ती तरूण बाई त्याले पसंत पडनी अनं तो तिनावर प्रसन्न व्हयना; त्यानी काहीबी उशीर न करता तिना शुध्दतेना वस्तु, तिना भोजन पदार्थ अनी तिले साजीत अश सात सख्या राजवाडामाईन दिधात अनी तिले अनं तिना सख्यीसले तठेन लिसन अंतपुरमा सर्वापेक्षा उत्तम जागा रावाले दिधी.
10 एस्तेरनी आपलं घराणाबद्दल सांगात नहीत; तिनी सांगाले नको म्हणीन तिले मर्दखयनी बजाईन सांगेल व्हतं. 11 एस्तेर कशी काय शे अनं तिनं काय व्हई, हाई समजाकरता मर्दखय रोजनरोज अंतपुरना अंगणसमोर फेऱ्या मारे. 12 बाईसनाबाबत ठरायेल नियमप्रमाणे बारा महिनापावत सर्वा काही उपचार व्हवावर एक एक कुवारीनी अहश्वेरोश राजाकडे जावानी पाळी वनी. त्यासन्या शुध्दीकरणनी रीत सांगं म्हणजे त्यासले गंधरसना तेल सहा महिना अनं सुगंधी द्रव्य सहा महिना लायेत; तसेच इतर शुध्दतेना वस्तु त्यासले लायेत. 13 कुवारीनी राजानाकडे जावाना प्रकार अश: अंतपुरमाईन राजमंदिरमा जावाना येळले जे काही ती मांगे ते तिले देवामा येई. 14 संध्याकाळले ती जाये, अनी सकासले ती उपपत्नीना रक्षक राजाना खोजा शाशगज याना देखरेखखाल दुसरा अंत:पुरमा जाये; राजानी तिनावर प्रसन्न व्हईन तिनं नाव लिसन बलावाशिवाय ती परत त्यानाकडे नही जाये.
15 मर्दखयना चुलता अबीहाइल यानी पोर एस्तेर, जिले मर्दखयनी पोर म्हणीन सांभाळेल व्हतं. तिनी राजानाजोडे जावानी पाळी वनी तवय बाईसना रक्षक राजाना खोजा हेगे यानी जे तिले देवानं ठरायेल व्हतं त्यानापेक्षा जास्त काही तिनी मांगात नही. ज्यानी ज्यानी एस्तेरले दखा त्या सर्वासनी तिनावर कृपादृष्टी व्हयनी. 16 हाई एस्तेर अहश्वेरोश राजाना कारकीर्दीना सातवा वरीसना दहावा महिनामा म्हणजे तेबेथ महिनामा राजमंदिरमा राजाकडे लवामा वनी. 17 राजानी एस्तेरवर इतर बायासपेक्षा जास्त प्रिती करी अनी बाकिन्या सर्वा कुवारीसपेक्षा तिनावर त्याना अनुग्रह अनं कृपादृष्टी विशेष व्हयनी. त्यानी तिना डोकामा राजमुकूट घालात अनं वश्तीना जागवर तिले राणी करं. 18 मंग राजानी सर्वा सरदार अनं सेवक यासले एस्तेरना निमित्त मोठी मेजवाणी दिधी; प्रांतोप्रांतीसना लोकसना कर माफ करात अनी आपला उदारताले शोभनारं इनामं दिधं.
मर्दखयनी राजाना जीव वाचाडा
19 कुवारी दुसरांदाव एकत्र गोया व्हयन्यात तवय मर्दखय राजद्वारी बठेल व्हता. कारण राजानी त्याले आपल्या सेवामां ह्या येळले नियुक्त करेल व्हतं. 20 एवढा येळ एस्तेरनी आपलं घराणाबद्दल सांगेल नव्हतं; मर्दखयनी तिले तशीच आज्ञा देल व्हती. एस्तेरना मर्दखयना आठे संगोपन व्हई राहिंता तवय जशी ती त्यानी आज्ञा माने, त्यानाप्रमाणेच तिनी ह्या येळले बी त्यानी आज्ञा मानी.
21 त्या दिनले मर्दखय राजद्वारमा बसेल राहे; तवय राजाना द्वारपाळस पैकी त्याना दोन खोजा बिग्थान अनं तेरेश ह्या संतापमा अहश्वेरोश राजावर हात टाकानी संधी दखी राहिंतात. 22 मर्दखयले हाई गोष्ट समजनी तवय त्यानी ती एस्तेर राणीले सांगं, अनी एस्तेरनी मर्दखयना नावतीन राजाले ती सांगी. 23 चौकशी व्हवावर ती बातमी खरी ठरनी; तवय त्या दोन्हीसले झाडंसवर फाशी दिधी, हाई माहिती राजानासमोर इतिहासना ग्रंथमा लिखी ठेवामा वना.