3
यहूदीसना नायनाट करानं हामाननं कारस्थान
या गोष्टी घडी जावावर अहश्वेरोश राजानी अगागी हामान बिन हम्मदाथा याले बढती दिसन पंतप्रधान बनाडं अनं त्यानाबरोबरना सरदारसंपेक्षा त्यानं आसन उचा करात. राजद्वारमा असेल राजाना बट्टा सेवक हामाननासमोर वाकीसन त्याले मुजरा करीत राहेत, कारण त्याना बाबतमा राजानी अशीच आज्ञा करेल व्हती; मर्दखय त्याले अजिबात नमन किंवा मुजरा करे नही. तवय राजद्वारमाधला राजसेवकसनी मर्दखयले ईचारं, की, तू राजआज्ञाना काबंर उल्लंघन करस? त्या त्याले अश रोज सांगेत तरी त्यानी त्यासनं बोलनं, ऐकं नही, तवय मर्दखयना हाई चालावू किंवा नही हाई दखाकरता त्यासनी हामानना कानमा हाई गोष्ट टाकी; आपण यहूदी शेतस अस त्यानी त्यासले सांगेल व्हतं. मर्दखय आपलासमोर वाकीन मुजरा करस नही हाई हामाननी दखं तवय त्याले त्याना भलता राग वना. एकटा मर्दखयवर हात टाकानं हाई त्याले हलकं वाटनं, कारण मर्दखय कोणता जातना शे हाई त्यासनी हामानले सांगेल व्हतं; त्यामुये अहश्वेरोशना सगया साम्राज्यमाधला मर्दखयना लोके म्हणजे सर्व यहूदी लोके यासना नायनाट कराना बेत हामाननी करा.
अहश्वेरोश राजाना कारकीर्दीना बारावा वरीसले त्यासनी पहिला म्हणजे निसान महिनापाईन हामाननासमक्ष चिठया टाकाले लायात. हाऊ क्रम दररोज, दरमहिनाले, बारावा महिना अदार संपापावत चालू राहिना.
हामान अहश्वेरोश राजाले बोलना, “आपला साम्राज्यमाधला सर्वा प्रांतामाईन राहनारा देशदेशना लोकसमा पांगेल अनं विखरेल एक राष्ट्र शे; त्या लोकेसना कायदा इतर सर्वा लोकसना कायदापेक्षा येगळा शेतस. त्या राजाना कायदाप्रमाणे चालतस नही म्हणीन त्यासले राहू देवानं राजाना हितना नही शे. राजानी मर्जी व्हई तर त्यासना नाश करानं अशी आज्ञा लिखानी; राजभांडारमा गोया कराकरता मी दहा हजार चांदीना शिक्का राजाना कारभारीसना हातमा देस.”
10 तवय राजानी आपली आंगठी बोटमाईन काढीन यहूदीसना शत्रु हामान बिन हम्मदाथा याले दिधी. 11 राजानी हामानले सांगं, तुले चांदी देल शे अनं लोकं बी देल शेतस; तुले वाटी तसं त्यासनं कर.
12 तवय पहिला महिनाना त्रयोदशीस राजानं लेखकसले बोलवामा वनात अनी राजानं प्रतिनिधि, प्रत्येक प्रांतना सुभे अनं सगया लोकसना सरदार यासले हामानना सांगेल प्रमाणे प्रत्येक प्रांतना लिपीक अनं प्रत्येक जातीना लोकसना भाषामा खलिते लिखीन धाडामा वना. अहश्वेरोश राजाना नावतीन ते लिखीन त्यानावर राजानी आंगठीना मोहर करेल व्हती. 13 राजाना सर्वा प्रांतप्रांतमाईन जासूदसना हाततीन अश आशयानी पत्रं धाडामा वनं की, एकच दिनले म्हणजे बारावा अदार महिनाना त्रयोदशीसले म्हातारा, जवान, बाया, पोऱ्या अश सर्वा यहूदी लोकसना विध्वंस अनं नायनाट कराना अनं त्यासनी धनसंपत्ती लुटी लेवानी. 14 हाई आज्ञा पत्रसन्या प्रत सर्वा प्रांतासमा खुल्या धाडात. त्या अशा हेतूतीन की सर्वा लोकसनी त्या दिनले तयार रावाले पाहिजे. 15 हाऊ हुकूम शूशन राजवाडामा देवामा वना अनी राजआज्ञा मानीसन जासूद लगेच निंघी गयात; त्या येळले राजा अनं हामान ह्या पेवाले बसनात; पन शुशन नगर चिताक्रांत व्हयनं.