6
मर्दखयना मानसन्मान करानं हामानले भाग पडस
त्या रातले राजानी झोप उडनी; तवय त्याना आज्ञातीन इतिहासना ग्रंथ आणीसन लोकसनी त्यानापुढे वाचात. त्यामा हाई लिखेल व्हतं: अहश्वेरोश राजाना खोजे द्वारपाल राहेत, त्यासनामाईन दोनजन बिग्थान अनं तेरेश यासनी राजावर हात टाकाना बेत करानी बातमी मर्दखयनी दिधी. तवय राजानी ईचारं की, “हाई कामगिरीबद्दल मर्दखयना काही गौरव किवा मानसम्मान करामा वना का?”
तवय राजाना सेवा करनारा सेवकसनी त्याले सांगं, “त्यानाकरता ते काहीच करामा वनं नही.”
तवय राजानी ईचारं, “चौकमा कोण शे?” त्या येळले हामान राजमंदिरना बाहेरना चौकमा येल व्हता, फाशी देवाना जो खांब त्यानी बनाडेल व्हता त्यानावर मर्दखयले फाशी देवानी म्हणीन तो राजानाजोडे ईनंती कराकरता येल व्हता. राजसेवकसनी राजाले सांगं, हामान चौकमा उभा शे.
राजा बोलना, “त्याले मझार बलावा.”
हामान मझार येवावर राजानी त्याले ईचारं, “एकादा माणुसना मानसम्मान करानं राजानं मनमा वना तर त्या माणुसनीकरता काय कराले पाहिजे? तवय हामान आपला मनमा ईचारं कराले लागना, मनापेक्षा दुसरा कोनी जास्त मानसम्मान करानं राजानी मनमा ई.”
हामान राजाले बोलना, “एकादानं गौरव करानं राजानं मनमा वना तर. महाराज वापरतस तो कपडा आणानं, त्यानाप्रमाणच ज्या घोडावर महाराज स्वारी करतस तो अनं महाराजना डोकावर जो राजमुकूट ठेवतस तो आणानं; मंग तो कपडा अनं घोडा महाराजना कोन एक मोठा सरदारना हातमा दिसन महाराज ज्यानं गौरव कराले इच्छितस त्याले त्यानी कपडा घालानं. अनी त्याले घोडावर बसाडीसन नगरना चौकमाईन त्यानी मिरवणूक काढानी अनी त्यानापुढे हाई प्रचार करानं की, ‘महाराज ज्यानं गौरव कराले इच्छितस त्यानं सम्मान हाई प्रकारमा व्हस!’ ”
10 राजा हामानले बोलना, पटकन हाऊ कपडा अनं हाऊ घोडा ले अनी राजद्वारनाजोडे मर्दखय बसना शे, त्यानं सम्मान तुना सांगाप्रमाण कर, तू बोलनास तसं करामा काहीबी कमी व्हवाले नको.
11 हामाननी तो कपडा अनं तो घोडा लिसन मर्दखयले सजाडं अनी शहरना रस्तातीन त्यानी मिरवणूक काढीन त्यानापुढे प्रचार करा की, “महाराज ज्यानं गौरव कराले दखतस त्यानं सम्मान या प्रकारमा व्हसं!”
12 मर्दखय राजद्वारनाजोडे परत वना अनी हामान शोक करत अनं आपलं तोंड झाकीन लगेच आपला घर निंघी गया. 13 मंग हामाननी आपली बाई जेरेश अनं आपला सर्वा मित्र यासले आपलावर येल प्रसंग बद्दल माहिती सांगी. तवय त्याना बुध्दिमान मित्र अनं त्यानी बाई ह्या त्याले बोलनात, “हाऊ मर्दखयनापुढे तुमना पराभव व्हई राहिना शे, तो जर यहूदी वंशमाधला व्हई तर तुमनं वर्चस्व व्हवावू नही, त्यानापुढे तुमना पराभवच व्हई.”
हामानानं मरण
14 त्यानी बाई त्यानासंगे बोली राहिंती तितलामाच राजाना खोजा वनात अनी एस्तेर राणीनी तयार करेल मेजवाणीमा त्या हामानले लगेच लई गयात.
6:2 एस्तेर 2:21-22