7
हामानले फाशी व्हस
1 ठरायेल येळना प्रमाणे राजा अनं हामान एस्तेर राणीना मेजवाणीमा गयात.
2 दुसरा दिनले भोजनना येळले द्राक्षरस पेवाना येळले राजानी एस्तेरले परत ईचारं, “एस्तेर राणी तुनं काय अर्ज शे? ते मान्य करामा ई. तुनी मागणी काय शे? ती अर्धा राज्यना एवढी बी राहिनी तरी तीनाप्रमाणे करामा ई.”
3 मंग एस्तेर राणी बोलनी, “महाराज, मनावर आपली कृपा दृष्टी व्हयेल शे, तर आपला मर्जीमा वना तर माले अनं मना लोकसले जीवनदान देवानं हाऊच मना अर्ज अनं ईनंती शे.
4 मना अनं मना लोकसना विध्वंस, संहार अनं नायनाट व्हवाले पाहिजे हाई हेतूतीन आमनी विक्री व्हई जायेल शे; आम्हीन फक्त दासदासी व्हवाले पाहिजे हाई हेतूतीन आमनी विक्री व्हती तर आम्हीन गप्प ऱ्हातुत; तरी बी त्या स्थितीमा त्या वैरीले राजाना नुकसाननी भरपाई करता नही येती.”
5 अहश्वेरोश राजानी एस्तेर राणीले ईचारं, “अस करानं धाडस करनारा कोन शे? अनं तो कोठे शे?”
6 एस्तेर राणी बोलनी, “हाऊ विरोधी अनं हाऊ शत्रु कोण शे म्हणीन इचारशात तर, हाऊ दुष्ट हामानच शे!” हाई ऐकीन राजा अनं राणी यासनापुढे हामान घाबरना.
7 तवय राजा रागाईसन भोजनवरीन उठना अनं राजमंदिरना बागमा गया; तवय माले जीवनदान द्या अशा रावण्या करत हामान एस्तेर राणीनापुढे उभा राहिना; कारण राजानी आपलं वाईट करानं ठराई लेयल शे हाई त्याले समजी जायेल व्हतं.
8 मंग राजा मंदिरना बागमाईन त्या भोजनना जागामा परत वना तवय एस्तेर राणीना मंचकवर हामानले वाकेल त्यानी दखं तवय राजा बोलना, “हावु घरमा अनी मनासमोर हाऊ राणीवर जबरदस्ती बी कराले दखस का?”
राजाना तोंडतीन हाई शब्द निंघताच सेवकसनी जाईन हामाननं तोंड झाकं.
9 राजाना तैनातीमा राहेल खोजापाईन हरबोना नावना एक खोजा बोलना, दखा, हामानना आठे पन्नास हात उचा एक फाशी देवाना खांब उभा करेल शे; ज्या मर्दखयनी राजाना हितकरता खबर दिधी त्याले टांगाकरता हामाननी तो उभा करेल शे. राजानी सांगं, “तोच खांबवर याले फाशी द्या.”
10 तवय जो खांब मर्दखयाकरता हामाननी तयार करेल व्हता तेनावर त्यालेच फाशी दिधी. तवय राजाना राग शांत व्हयना.