10
आठवी पिढा टोळ येण
मंग परमेश्वर मोशेले बोलना, “फारोनापुढे जाय, मीच त्यानं अनी त्याना सेवकसनं मन कठीण करेल शे ते यानाकरता की त्यासना मी ह्या चिन्ह चमत्कार दखाडावं. मी मिसर देशनी कशी फजिती करी अनी त्यासनामा कायकाय चिन्ह चमत्कार करात हाई तुना पोऱ्या अनी नातुसना कानवर पडू दे, म्हणजे मी परमेश्वर शे हाई तुमले समजी.”
मोशे अनी अहरोन फारोनापुडे जाईसन त्याले बोलनात, “इब्रीसना देव यहोवा अस म्हणस, ‘तु मनासमोर कवयपावत झुकाव नही? मना लोकसले मनी उपासना कराले जाऊ दे. तु जर मना लोकसले जाऊ देवाव नही तर दख, मी सकाळ तुना देशमा टोळ आणसु. त्या जमिनले अस झाकी टाकतीन की, जमिन दखावणार नही, गारासना पाऊसपाईन जे काही वाचेल व्हई त्याना त्या नाश करतीन, जंगलमा तुमना जितला झाडे लायेल शेतस त्याना बी त्या नाश करतीन. तुना घरं, तुना सेवकसना घरं, सर्वा मिसरीसना घरसले त्या भरी टाकतीन. इतला टोळ तुना बापदादानी किंवा त्यासना बापदादासनी आजपावत कधी जन्ममा दखेल नही व्हतीन.’ ” मंग मोशे तठेन फिरना अनं निंघी गया.
फारोना सेवक त्याले बोलनात, “आम्हीन कोठपावत या माणुसना तरासमा राहसुत? त्यासना देव यहोवा यानी उपासना कराले त्या लोकसले जाऊ द्या, मिसर देश उध्वस्त व्हयेल शे, हाई तुमले का बरं समजी नही राहीनं.”
मंग मोशे अनी अहरोन यासले परत राजाकडे बलाई आणं, तो त्यासले बोलना, “तुम्हीन तुमना देव यहोवा यानी उपासना करा, पण कोण कोण जावाव शे?”
मोशे बोलना, “आमना धल्ला लोकं, आमना पोऱ्या अनं पोरी, आमना शेरडंमेंढरं अनं गुरंढोरं या सर्वासले आम्हीन लई जाणार शेतस, कारण परमेश्वर करता आमले उत्सव करना शे.”
10 राजा त्यासले बोलना, “मी तुमले जर तुमना लेकरंबाळस संगे जाऊ दिधं तर देव तुमनं भल करो, सावधान, तुमना मनमा खोट शे, 11 हाई व्हवाव नही, फक्त माणससनीच जाईसन परमेश्वरनी उपासना करानी, कारण हाईच तर तुमले पाहीजे व्हतं.” मंग मोशे अनं अहरोन यासले फारोना पुढेतीन हाकली दिधं.
12 परमेश्वर मोशेले बोलना, “मिसर देशवर आपला हात उगार म्हणजे त्यासनावर टोळ ईसन गारासना सपाटामातीन ज्या वनस्पती वाचेल शेतस त्या त्यासना नाश करतीन.” 13 मोशेनी मिसर देशवर आपली काठी उगारी, तवय परमेश्वरनी दिवसभर अनं रात्रभर पुर्व दिशातीन वारा सोडा अनी सकाळ व्हयनी तवय त्या वारासंगे टोळ बी वनात. 14 सर्व मिसर देशवर टोळसनी धाड टाकी अनी त्या सर्वीकडे उतरनात. त्या बराच व्हतात, ऐवढा टोळ कधी येल नव्हतात अनी कधीच येवाव नही. 15 त्यासनी सर्वी जमिनले झाकी टाकं त्यामुये सर्वीकडे अंधार पडना अनी त्यासनी जमिनवरला सर्वा झाडे अनी ज्या फळ गारासमातीन वाचेल व्हतात त्या सर्वा खाई टाकात, पुरा मिसर देशमा झाडसपैकी किंवा वावरमातील एक बी हिरवं अस काही उरनं नही.
16 मंग राजानी लवकरच मोशे अनं अहरोन यासले बलाईसन सांगं, “मी तुमना देव यहोवा यानाविरूध्द अनं तुमनाविरूध्द पाप करेल शे. 17 तर आते एकदाव मना अपराधसनी क्षमा करा अनी ऐवढीदाव मृत्यूपाईन माले वाचाडा म्हणुन तुम्हीन आपला देव यहोवा यानाकडे प्रार्थना करा.” 18 मोशेनी फारोकडतीन निंघी गया अनी देवकडे प्रार्थना करी. 19 तवय देवनी पश्चिम दिशातीन प्रचंड वारा सोडा, त्यानी त्या टोळसले उडाईसन तांबडा समुद्रमा टाकं, मिसर देशनी हद्दमा एक बी टोळ राहिना नही. 20 पण परमेश्वरनी फारोनं मन कठीण करं अनी त्यानी इस्त्राएल लोकसले जाऊ दिध नही.
नववी पिढा मिसर देशमा आंधार होण
21 मंग परमेश्वरनी मोशेले सांगं, “आकाशकडे आपला हात उगार म्हणजे मिसर देशवर आंधार पडी अनी तो सर्वी जमिनले झाकी टाकी.” 22 तवय मोशेनी आपला हात आकाशकडे करा अनी तिन दिनपावत सर्वा मिसर देशवर काळाकुट्ट आंधार पडना. 23 तीन दिन कोणीच कोणले दखायना नही की कोणीच आपली जागा सोडीन हालना नही, पण इस्त्राएल लोकसनी वस्तीमा उजेड व्हता.
24 मंग राजानी मोशेले बलाईसन सांगं, “तुम्हीन जाईसन तुमना परमेश्वरनी उपासना करा, पण शेरडंमेंढरसले अनी गुरंढोरसले आठेच राहू द्या, तुमना लेकरंबाळसले लई जा.”
25 मोशेनी उत्तर दिधं, “आमना देव यहोवाकरता यज्ञपशु अनं होमबली तु आमना हवाली कराले पाहीजे. 26 आमना जनावरं बी आमनासंगे जावाले पाहीजे, एक बी ऱ्हावाले नको, कारण यामातीनच आमले आमना देव यहोवानी उपासना कराकरता यज्ञपशु लेना पडतीन अनी परमेश्वरनी उपासनाकरता काय लागी हाई आमले तठे पोहचाशिवाय समजाव नही.”
27 परमेश्वरनी राजानं मन कठीण करं अनी त्यानी त्यासले जाऊ दिधं नही. 28 फारो त्याले बोलना, “मनापुढेतीन चालता व्हयं, अनी संभाय परत फिरीन तुनं तोंड दखाडू नको, ज्या दिन तु तुनं तोंड माले दखाडं त्या दिन तु मरणाच!”
29 मोशे बोलना, “तु बरोबर बोलना, मी परत तुनं तोंड कधी दखावं नही.”
10:2 अनुवाद 4:9; स्तोत्रसंहिता 44:1 10:14 स्तोत्रसंहिता 78:46; 105:34; प्रकटीकरण 9:2-3 10:22 स्तोत्रसंहिता 105:28; प्रकटीकरण 16:10