9
पाळीव प्राणीसवर पिढा
1 मंग परमेश्वर मोशेले बोलना, “फारोले जाईसन सांग, ‘इब्रीसना देव परमेश्वर अस सांगस की, मना लोकसनी मनी उपासना कराले पाहिजे म्हणीसन त्यासले जाऊ दे.
2 जर तु त्यासले जाऊ देवाव नही अनी आखो अडाईन ठेवशी,
3 तर दख, घोडा, गधडा, उंट, गुरंढोरं, शेळ्यामेंढ्या ह्या ज्या तुना पशु रानमा शेतस त्यासनावर परमेश्वरना हात पडी, अनी भयंकर मरी ई.
4 इस्त्राएल लोकसना गुरंढोरं अनी मिसरी लोकसना गुरंढोरं यासले मी अलग अलग करसु. इस्त्राएल लोकसना एक बी पशु मराव नही.
5 मंग परमेश्वरनी येळ ठराई अनी सांगं की, सकाळ मी परमेश्वर हाऊ मिसर देशमा हाई काम करसु.’ ”
6 दुसरा दिन परमेश्वरनी हाई गोष्ट करी अनी मिसर देशमा सर्वा गुरं मरणात. पण इस्त्राएल लोकसना गुरंसपैकी एक बी मरनं नही.
7 फारोनी माणसे धाडीसन दखं तर इस्त्राएल लोकसना गुरंसपैकी एक बी मरनं नही. तरी बी फारोनं मन कठिणच राहिनं, त्यानी लोकसले जाऊ दिध नही.
फोडसनी पिढा
8 “मंग परमेश्वर मोशे अनं अहरोनले बोलना की, मोशेनी भट्टीमातील मुठभर राख लिसन फारोना समोर आकाशमा उधळानी.
9 म्हणजे ती राखना कण पुरा मिसर देशमा पसरी अनी सर्व देशमातील लोकसले अनं जनावरसले गळवा अनं फोड व्हतीन.”
10 त्या भट्टीमातील मुठ्ठीभर राख लिसन फारोनापुढे उभा राहिनात; मोशेनी ती आकाशकडे हवामा उधळी तवय त्यामुये लोकसले अनं जनावरसले फोड वनात.
11 गळवामुये जादुगरसले मोशेना पुढे उभं राहता ई नही राहिंतं, कारण सर्व मिसरी लोकेसले अनी जादुगर यासले बी गळवा येल व्हतात.
12 पण परमेश्वरनी फारोनं मनले अजून कठीण करं अनी त्यानी त्यासनं ऐकं नही, परमेश्वरनी मोशे अनं अहरोनले अस सांगेलच व्हतं.
सातवी पिढा गारासना पाणी
13 परत परमेश्वर मोशेले बोलना, “पहाटले उठीसन फारोपुढे उभा ऱ्हाय अनी त्याले सांग, ‘इब्रीसना देव परमेश्वर अस म्हणस की, मना लोकसनी मनी उपासना कराकरता त्यासले जाऊ दे.
14 नहीतर या खेपले मी सर्वाप्रकारनी पिढा तुनावर, तुना सेवकसवर अनं तुनी प्रजावर धाडसु, म्हणजे पुरी पृथ्वीवर मनामायक कोणीच नही हाई तुले यावरतीन समजी.
15 आतेपावत मी मना हात उगारीसन तुनावर अनी तुनी प्रजावर मरीना प्रहार करतु अनी जगमातीन तुना पुरा नाश करी टाकतु.
16 पण तुले मनं सामर्थ्य दखाडानं अनी मनं नाव सर्व पृथ्वीवर पसरावं यानाकरता मी तुले जिवत ठेयल शे.
17 तु आते बी मना लोकससंगे गमंडीनामायक वागीसन त्यासले जावु दि नही राहिना का?
18 सकाळ याच येळले मी गारासना अशा भयंकर पाऊस पाडसु ना, जसा मिसर देशनी स्थापना व्हयनी तवयपाईन ते आजपावत असा पाऊस व्हयना नही व्हई.
19 तर आते रानमा तुना लोकसले धाडीसन गुरं अनी दुसरी जे काही व्हई ते लई ये. ज्या माणसे अनी गुरं रानमा सापडतीन त्यासनावर गारासनी झोड पडीसन त्या मरतीन.”
20 यामुये फारोना काही सेवकसपैकी ज्यासले परमेश्वरनी सांगेल गोष्टनी भिती वाटनी त्यासनी रानमातीन आपला दास अनं गुरंसले घर आणं.
21 अनी ज्यासनी परमेश्वरना सांगाकडे ध्यान दिधं नही त्यासनी आपला दास अनं गुरं यासले रानमाच राहू दिधं.
22 मंग परमेश्वर मोशेले बोलना, “तु आपला हात आकाशकडे कर म्हणजे सर्व मिसर देशमा गारासना पाऊस पडी. सर्व देशमातील जनावरसवर अनी वावरमातील पिकसवर सर्वा निळागार झाडझुडपसमा तो पडी.”
23 मोशेनी आपली काठी आकाशकडे वर करी तवय परमेश्वरनी ढगसना कडकडाट अनी गारासना पाऊस पाडा अनी ईजा तर जमिनपावत ई राहिंत्यात, असा परमेश्वरनी मिसर देशवर गारासना पाऊस पाडा.
24 गारा पडी राहिंतात अनी मजारमां ईजा बी चमकी राहिंतात. हावु गारासना पाऊस ईतला भयंकर व्हता की असा पाऊस मिसर देशनी स्थापना व्हयनी तवय पाईन कुठेच व्हयेल नव्हता.
25 यामुये सर्व मिसर देशमा, माणसं, गुरंढोरं अनी जे काही जंगलमा व्हतं त्या सर्वावर गारासना मारा व्हयना. वावरमातील सर्व पिक अनं झाडे तुटीन पडी गयात.
26 पण गोशेन प्रांतमा इस्त्राएल लोकं राही राहिंतात तठे मात्र गारासना पाऊस पडना नही.
27 तवय फारो राजानी मोशे अनी अहरोन यासले बलाईसन सांगं, “मी या खेपले पाप करेल शे, परमेश्वर न्यायी शे, मी अनी मनी प्रजा अपराधी शेतस.
28 तुम्हीन परमेश्वरले ईनंती करा, हाई इतली कडकडात अनं गारासना पाऊस पडना हाईच पुरं शे, मी तुमले जाऊ देस, तुम्हीन आखो आठे जास्त येळ राहू नका.”
29 मोशे बोलना, “मी शहरना बाहेर गवु का परमेश्वरकडे मना हात पसारसु तवय मेघगर्जना बंद व्हई अनी गारा पडनार नहीत; यावरतीन तुले समजी की, पृथ्वी परमेश्वरनी शे.
30 पण माले हाई माहित शे की अजून बी तु अनी तुना सेवक परमेश्वरले भ्यातस नही.”
31 ती येळले जवस अनी सातू यासना नाश व्हयना, तवय तु सातू निवाडेल व्हतात अनी जवसले बोंडा येल व्हतात.
32 पण गहू अनी काठ्यागहू यासना नाश व्हयना नही, कारण त्या आजुनपावत वाढेल नव्हतात.
33 मोशे फारोना पुढेतीन निंघीसन शहरना बाहेर गया अनी परमेश्वरकडे त्यानी हात पसारात तवय मेघगर्जना अनं गारा बंद व्हयन्यात अनी पाऊस पडनं थांबनं.
34 पाऊस, गारा अनं कडकडात बंद व्हयनी अस दखीसन फारोनी अनी त्याना सेवकसनी आपलं मन कठीण करीसन परत पाप करं.
35 अनी त्यानी इस्त्राएल लोकसले जाऊ दिध नही, परमेश्वरनी मोशेना व्दारा हाई सांगेलच व्हतं.