8
बेडकसनी दुसरी पिढा
1 तवय परमेश्वर मोशेले बोलना, “फारोकडे जाईसन त्याले सांगं, परमेश्वर अस सांगस कि, ‘मना लोकसले मनी उपासना कराकरता जाऊ दे.
2 तु जर त्यासले जाऊ देवाव नही तर दख मी बेडकसघाई तुना पुरा देशले पिढा दिसु.
3 नील नदीमा बेडकसना सुळसुकाट व्हई अनी तुना मंदिरमा, तुनी झोपानी खोलीमा, तुना आंथरूनवर, तुना नौकरचाकरसना घरमा, तुनी प्रजावर, तुन्या भट्ट्यासमा अनी भांडासमा बेडूकच बेडूक व्हतीन.
4 तुना अनं तुना लोकसना अनी तुना सर्व सेवकसना आंगवर बेडकं चढतीन.”
5 परमेश्वर मोशेले बोलना, “अहरोनले सांग की, आपली काठी लिसन नद्या, नाला, अनं तलाव यासवर आपला हात उगार अनी बेडूक मिसर देशवर चढी येतीन.”
6 म्हणीन अहरोननी मिसरमातील सर्व पाणीवर आपला हात उगारा तवय बेडूक बाहेर निंघनात अनी त्यासनी पुरा मिसर देश भरी गया.
7 जादुगरसनी बी आपला तंत्रमंत्रसघाई तसच करं त्यासनी बी पुरा मिसर देशवर बेडूक आणात.
8 मंग फारोनी मोशे अनी अहरोन यासले बलाईसन सांगं की, “परमेश्वरले ईनंती करा की, मनापाईन अनी मनी प्रजापाईन त्यानी या बेडकसले दूर करावं म्हणजे परमेश्वर करता यज्ञ कराकरता मी तुमना लोकसले जाऊ दिसु.”
9 मोशे फारोले बोलना, “तुनापाईन अनी तुनी प्रजापाईन बेडूक काढी टाकीसन फक्त नदीमा राहु दिसु यामुये मी तुनाकरता अनं तुना सेवकसकरता कोणती येळले प्रार्थना करू हाई तु माले सांग.”
10 राजा बोलना, “सकाय” मोशे बोलना, “तुनी आज्ञाप्रमाणे व्हई म्हणजे तुले समजी कि आमना देव यहोवाना मायक कोणताच देव नही.
11 बेडूक तुनापाईन तुना सेवकसपाईन, तुनी प्रजापाईन दूर व्हई, त्या फक्त नील नदीमा राहतीन.”
12 मंग मोशे अनं अहरोन फारोकडतीन निंघी गयात अनी परमेश्वरनी फारोवर ज्या बेडूक आनेल व्हतात त्याबद्दल मोशेनी परमेश्वरकडे प्रार्थना करी.
13 परमेश्वरनी मोशेनी सांगेलप्रमाणे करं, अनी घरदारमा, अंगनमा अनं वावरसमा ज्या बेडूक व्हतात त्या मरी गयात.
14 लोकसनी त्यासले गोया करीसन त्यासना ढिग करात, तवय सर्वीकडे घाण वास सुटना.
15 फारोनी दखं कि, बेडुक मरी गयात तवय त्यानं मन परत कठीण व्हयनं अनी त्यानी मोशे अनं अहरोन यासनं ऐकं नही, परमेश्वरनी अस सांगेलच व्हतं.
पिसूसनी पिढा
16 मंग परमेश्वनी मोशेले सांगं, “अहरोनले सांग की, आपली काठी उगारीसन जमिनवरली धुळवर मार म्हणजे मिसरदेश भर त्या धुळन्या पिसवा बनतीन.”
17 अहरोननी आपला हातमाधली काठी उगारीसन जमिननी धुळवर मारी तवय मनुष्य अनी पशुसवर पिसू व्हयन्यात. जमिनवरली धुळघाई सर्व मिसर देशमा पिसवाच पिसवा व्हयन्यात.
18 पिसवा बनाडाकरता जादुगरसनी बी आपला मंत्र बोलीसन तसाच प्रकार करा. पण त्यासले काय जमनं नही, मनुष्य अनी पशु पिसवासघाई सर्वीकडे भरी गयात.
19 तवय जादुगर फारोले बोलनात, “यामा देवना हात शे.” तरी फारोनं मन कठीण व्हयनं अनी त्यानी त्यासनं ऐकं नही. जसं देवनी सांगेल व्हतं
गोमाशासनी पिढा
20 मंग परमेश्वरनी मोशेले सांगं की, “पहाटले उठ अनी जाईसन फारोपुढे उभा ऱ्हाय. तो ती येळले नदिवर येस, तु त्याले सांग, ‘परमेश्वर म्हणस, मना लोकसनी मनी उपासना कराले पाहीजे म्हणीसन त्यासले जाऊ दे.
21 त्यासले जाऊ देवाव नही तर दख, तुनावर, तुना सेवकसवर, तुनी प्रजावर अनी तुना घरमा मी गोमाशीसना थवा धाडसु. मिसरी लोकसना घरं अनी ते राहतस तो सर्व प्रदेश गोमाशीसना थवाघाई व्यापी टाकसु.
22 पण गोशेन प्रांतमा मना लोकं राहतस तो मी त्या दिन अलग करसु, गोमाशीसना थवा तठे जावाव नही, यावरतीन पृथ्वीवर मीच परमेश्वर शे. हाई तुले समजी.
23 मनी प्रजामा अनी तुनी प्रजामा मी अंतर ठेवसु, सकाय हावु चमत्कार व्हई.”
24 तसच परमेश्वरनी करं, फारोना घरमा, त्याना सेवकसना घरमा अनं पुरा मिसर देशमा गोमाशीसना थवाना थवा वनात. गोमाशीसना या थवासमुये मिसर देशमा नुकसान व्हयनं.
25 मंग फारोनी मोशे अनं अहरोन यासले बलाईसन सांगं की, “तुम्हीन जा, याच देशमा तुमना देवले यज्ञ करा.”
26 मोशे बोलना, “हाई करनं चांगलं नही शे, कारण आम्हीन जो यज्ञ आमना देव यहोवा याले करावं शेतस त्यानी मिसरी लोकसले किळस ई, मिसरी लोकसना नजरमा किळसवाना असा यज्ञ आम्हीन करा तर त्या आमले दगडमार करावुत नही का?
27 आम्हीन रानमा तीन दिननी वाट चाली जासुत अनी परमेश्वर आमना देव सांगी तसा आम्हीन त्याले यज्ञ करसु.”
28 फारो बोलना, “तुम्हीन रानमा जाईसन परमेश्वर तुमना देव याले यज्ञ कराकरता मी तुमले जाऊ देस, पण जास्त दूर जाऊ नका अनी मनाकरता प्रार्थना करा.”
29 मोशे बोलना, “मी लगेच जास, अनी परमेश्वरले प्रार्थना करस की, फारो अनं त्याना सेवक अनी त्याना लोके यासनावरला गोमाशीसना थवा सकाय निंघी जावोत, पण परमेश्वरले यज्ञ कराकरता लोकसले जाऊ न देवाना फारोनी परत ईचार करू नये.”
30 मंग मोशे फारोकडतीन निंघी गया अनी देवले प्रार्थना करी.
31 परमेश्वरनी मोशेनी प्रार्थनाप्रमाणे करं, फारो त्याना सेवक अनी त्याना लोके यासवर येल गोमाशीसना थवा त्यानी दूर करात, एक बी गोमाशी राहिनी नही.
32 पण फारोनी या येळले बी आपलं मन कठिण करं अनी लोकसले जाऊ दिध नही.