7
1 तवय परमेश्वर मोशेले बोलना, “दख मी तुले फारोना देवच बनाडस अनी तुना भाऊ अहरोन तुना संदेष्टा व्हई.
2 जी काही आज्ञा मी तुले करसु ती अहरोनले सांग की तो फारोले सांगी की, तु इस्त्राएल लोकसले तुना देशमातीन जाऊ दे.
3 पण मी फारोनं मन कठीण करसु अनी मिसर देशमा मना बराच चिन्ह अनी चमत्कार दखाडसु.
4 तरी फारो तुमनं काय ऐकाव नही मंग मिसरवर मना हात चालावसु, अनी त्यासले मोठे शिक्षा करीसन आपली सेना इस्त्राएल लोकसले मिसर देशमातीन लई जासु.
5 अनी मी मिसरवर आपला हात उगारीसन त्यासनामातीन इस्त्राएल लोकसले लई जासु, तवय मिसरी लोकसले समजी की मी परमेश्वर शे.”
6 परमेश्वरनी करेल आज्ञाप्रमाणे मोशे अनी अहरोननी करं.
7 जवय ह्यासनी फारोसंगे हाई बोलनं करं तवय मोशे ऐंशी अनी अहरोन त्र्याऐंशी वरीसना व्हता.
मोशेनी काठी
8 मंग परमेश्वर मोशे अनं अहरोनले यासले बोलना,
9 “तुम्हीन स्वतः काही अद्भुत कृती करी दखाडा अस फारो तुमले बोलना तवय तु अहरोनले सांग, आपली काठी लिसन फारोपुढे टाक म्हणजे तिना साप व्हई.”
10 मंग मोशे अनी अहरोन यासनी परमेश्वरनी आज्ञाप्रमाणे फारोकडे करं, अहरोननी आपली काठी फारो अनी त्याना सेवकसनापुढे टाकी अनी तिना साप व्हयना.
11 हाई दखीसन फारोनी त्याना जानते अनी मांत्रीक ह्यासले बलावं, त्या मिसरी जादुगरसनी बी तसा प्रकार करी दखाडा.
12 त्यासनी बी आप आपल्या काठ्या खाल टाकताच त्यासना बी सापं व्हयनात, पण अहरोनना काठीनी त्यासन्या काठ्यासले गिळी टाकं.
13 पण फारोनं मन अजून कठीण व्हयनं अनी परमेश्वरनी सांगेलप्रमाणे त्यानी मोशे अनं अहरोन यासनं ऐकं नही.
पाणीनं रक्त व्हण
14 तवय परमेश्वर मोशेले बोलना, “फारोनं मनं कठिण शे तो या लोकसले जाऊ देवाव नही.
15 जवय फारो सकासले नदीजोडे ई तवय तू त्यानाजोडे जाय अनी जी काठी साप बनेल व्हती, ती आपला हातमा लिसन तू निल नदीना किनारले जाईन त्यानी वाट पाय.
16 त्याले अस सांग की, इब्रीसना देव परमेश्वर यानी मनाकडे तुनाकरता निरोप देयल शे की, मना लोकसले जाऊ दे म्हणजे त्या रानमा मनी उपासना करतीन, पण तु अजून ऐकी नही राहिना.
17 परमेश्वर म्हणस की, मी परमेश्वर शे हाई तुले यावरतीन समजी दख, मी मना हातमाधली काठी नदीना पाणीवर मारसु तवय पाणीनं रक्त व्हई.
18 नदीमाधला मासा मरतीन अनी तिमा घाण वास सुटी, अनी तिनं पाणी पेवाकरता मिसरी लोकसले किळस वाटी.”
19 “मंग परमेश्वरनी मोशेले सांगं, तु अहरोनले सांग की, आपली काठी लिसन मिसर देशमा जितलं पाणी शे म्हणजे नद्या, नाला, तलाव अनं हौद या सर्वांसवर आपला हात उगार म्हणजे त्या सर्वांसवर आपला हात उगार म्हणजे त्या सर्वासनं रक्त व्हई अनी मिसरमातील खडकसमातीन सर्व झरासमा रक्तच रक्त व्हई.”
20 तवय मोशे अनी अहरोन यासनी परमेश्वरना आज्ञाप्रमाणे करं. त्यानी काठी उचलीसन फारो अनं त्याना सेवकसना समोर पाणीवर मारी तवय नदीमातीन सर्व पाणी रक्त व्हयनं.
21 नदिमातील मासा मरी गयात त्यामातीन घाण वास सुटना अनी मिसरी लोकसले नदीमातीन पाणी पिता ई नही राहिंतं, सारा मिसर देशमा रक्तच रक्त व्हयनं.
22 तवय मिसरी जादुगरसनी बी मंत्रतंत्रसघाई तसाच प्रकार करा. तवय फारोनं मनं कठीण व्हयनं अनी त्यानी मोशे अनं अहरोन यासनं ऐकं नही, हाई परमेश्वरनी मोशेले पहिलेच सांगेल व्हतं.
23 फारो तठेन मांगे फिरना अनी आपला घर गया, ह्यावर बी त्यानी भरोसा करा नही.
24 सर्व मिसरी लोकसनी पेवाना पाणीकरता नदीना आसपास झरा खोदात. कारण नदिनं पाणी त्यासले पिता ई नही राहिंतं.
25 परमेश्वरनी नदीले शिक्षा करीसन सात दिन व्हयनात.