6
1 मंग परमेश्वर मोशेले बोलना, “मी आते फारोले काय करस ते तु दखशी, मी त्याले भुजबल दखाडा म्हणजे तो या लोकसले जाऊ दि, मना भुजबल त्याले दखाडा म्हणजे तो यासले आपला देशमातीन बाहेर हाकली दि.”
परमेश्वर मोशेले बलावस
2 देव मोशेले बोलना, “मी यहोवा परमेश्वर शे.
3 मी अब्राहाम, इसहाक अनं याकोब यासले सर्वसमर्थ देव म्हणीसन प्रकट व्हयेल शे तरी परमेश्वर हाऊ मना नावतीन मी त्यासले माहित नव्हतु.
4 ज्या कनान देशमा त्या पाहुणा व्हतात तो परदेश त्यासले वतन म्हणीसन देवाना करार मी त्यासनाशी करेल शे,
5 आते ज्या इस्त्राएल लोकसले मिसरीसनी दास करी ठेयल शे, त्यासना आक्रोश ऐकीसन मी आपला करारनं स्मरण करेल शे.
6 म्हणीसन इस्त्राएल लोकसले सांग, ‘मी यहोवा परमेश्वर शे, मी तुमले मिसरीसना मजुरीमातीन सोडावसु, त्यासना गुलामगिरीतीन तुमले मुक्त करसु अनी हात लांब करीसन त्यासले चांगलीच शिक्षा दिसु अनी तुमले वाचाडसु.
7 मी तुमले आपली प्रजा करी लिसु अनी मी तुमना देव व्हसु, म्हणजे तुमले मिसरी लोकसना गुलामगिरीमातीन सोडावनारा मी तुमना देव यहोवा शे, हाई तुमले समजी.
8 अनी जो देश अब्राहाम, इसहाक अनं याकोब यासले देवानी शपथ मी हात वर करीसन देयल व्हती, त्यामा मी तुमले लई जासु अनी तो मी तुमले वतन म्हणीसन दिसु, मी परमेश्वर शे.
9 मोशेनी हाई सर्व इस्त्राएल लोकसले सांगं, पण त्या आपला मनमातील संतापमुये अनी कठीण गुलामगिरीमुये त्या मोशेनं ऐकी नही राहिंतात.’ ”
10 मंग परमेश्वर मोशेले बोलना,
11 “तु जाईसन मिसरना राजा फारोले सांग की, ‘इस्त्राएल लोकसले’ तुना देशमातीन निंघी जाऊ दे.”
12 पण मोशे बोलना, “इस्त्राएल लोकसनी मनं ऐकं नही तर फारो मनं कसं ऐकी? मी तर बोलामा कच्चा शे.”
13 तवय देवनी मोशे अनी अहरोनले आज्ञा करी, “इस्त्राएल लोकसले अनी मिसरना राजाले आज्ञा करी की, तो इस्त्राएल लोकसले मिसर देशमातीन बाहेर काढी आनी.”
मोशे अनी अहरोन यासना कुटूंबसनी नोंद
14 मोशे अनी अहरोन यासना पुर्वजसपैकी प्रमुख पुरूष ह्या शेतस, इस्त्राएलना थोरला पोऱ्या रऊबेन याना पोऱ्या हानोख, पल्लू हेस्त्रोन अनं कर्मी, ह्या रऊबेनना कुळं.
15 शिमोनना पोऱ्या: यमुवेल यामीन, ओहद, याखीन जोहर अनं कनानी बाईपाईन व्हयेल शौल, ह्या शिमोनना कुळं,
16 लेवीना वंशावळीप्रमाणे त्यासना पोऱ्यासनी नावं अशा शेतस: गेर्षोन, कहाथ अनं मरारी, लेवी एकशे सदतीस वरीस जगना.
17 गेर्षोनना कुळप्रमाणे त्याना पोऱ्या लिब्नी अनं शिमी ह्या मुख्य व्हतात.
18 कहाथना पोऱ्या: अम्राम, इसहाक, हेब्रोन अनं उज्जियेल, कहाथ एकशे तेहतीस वरीस जगना.
19 मरारीना पोऱ्या: महली अनं मुशी. लेवीना वंशावळीप्रमाणे ह्या त्याना कुळं.
20 अम्रामानी आपली आत्यासंगे लगीन करं, तिनापाईन तिले अहरोन अनी मोशे व्हयनात, अम्राम हावु एकशे सदतीस वरीस जगना.
21 इसहारना पोऱ्या: कोरह, नेफेग अनं जिख्री.
22 उज्जियेलना पोऱ्या मिशाएल, एलसाफान अनं सिथ्री.
23 अहरोननी अम्मीनादाबनी पोर, नहशोननी बहिण अलिशेबा हिनासंगे लगीन करं, तिनापाईन त्याले नादाब, अबीहू, एलाजार, अनं इथामार ह्या व्हयनात.
24 कोरहाले तीन पोऱ्या व्हतात: अस्सीर, एलकाना अनं अबीयासाफ, ह्या कोहरना कुळं.
25 अहरोनना पोऱ्या एलाजार यानी पुटियेलना पोरीसपैकी एकसंगे लगीन करी लिधं. तिनापाईन त्याले फिनहास व्हयना. त्यासना घराणा प्रमाणे लेवीना पितृकुलमातील मुळ पुरूष ह्याच व्हतात.
26 इस्त्राएल लोकसले दल करीसन मिसर देशमातीन बाहेर लई जा अशी परमेश्वरनी ज्यासले आज्ञा देयल व्हती त्याच ह्या मोशे अनी अहरोन.
27 इस्त्राएल लोकसले मिसरमातीन बाहेर लई जासू अस मिसरी राजाले सांगनारा त्याच ह्या मोशे अनी अहरोन.
मोशेकडतीन बोलणारा अहरोन
28 मंग ह्या दिनले मिसरमा परमेश्वर मोशेसंगे बोलना,
29 तो मोशेले बोलना, “मी यहोवा शे, मी तुले सांगस ते सर्व मिसरी राजा ह्याले सांग.”
30 तवय मोशे बोलना, “तुले माहीत शे, मी बोलामा कच्चा शे, मंग फारो मनं कसं ऐकी.”