11
शेवटली पिढानी चेतावणी
मंग परमेश्वर मोशेले बोलना, “मी राजावर अनं मिसर देशवर आखो एक पिढा लयसु, तवय तो तुमले तठेन जाऊ दि. अनी तो तुमले जाऊ दि तवय तुमले हाकली दि. तु तुना लोकसले सांगी ठेव की, प्रत्येक माणुसनी आपला शेजारनाकडतीन अनी प्रत्येक बाईनी आपली शेजारीनकडतीन सोनं चांदिना दागिना मांगी लेवानं.” मिसरी लोकसनी इस्त्राएल लोकसवर कृपादृष्टी व्हई अस परमेश्वरनी करं अनं त्यामाच मिसर देशना राजाना सेवक अनी सामान्य लोकं यासना नजरमा मोशे हावु थोर माणुस व्हता.
मंग मोशे राजाले बोलना, “परमेश्वर म्हणस, ‘मी आज मध्यरातनी येळले मिसर देशमा फिरसु, तवय प्रत्येक थोरला पोऱ्या मरी राजापाईन ते जातावर दळनारी दासीपावत सर्वासना थोरला पोऱ्या अनी गुरसनं पहेलं पिल्लु मरतीन. मिसर देशमा मोठा हाहाकार व्हई, असा की पहेले कधी व्हयेल नव्हता अनी कधी व्हवाव नही. पण इस्त्राएल लोकसवर काय त्यासना गुरंसवर बी एक कुत्रा बी भुकाव नही. यावतीन मिसरी लोकसमा अनी इस्त्राएल लोकसमा मी कशा भेद ठेवस हाई तुमले समजी.’ ” मोशे आखो बोलना, “तवय या तुना सेवक मनाकडे ईसन माले नमन करीसन म्हणतीन की, आपला परिवारससंगे आपण निंघी जा, तवय मी निंघी जासु.” यावरतीन मोशे संतापमा फारोनापुढेतीन निंघी गया.
परमेश्वर मोशेले बोलना व्हता की, “फारो तुमनं ऐकावं नही, कारण मिसर देशमा मना बराच चमत्कार व्हवाले पाहिजे अशी मनी इच्छा शे.” 10 मोशे अनी अहरोन यासनी फारोपुढे या सर्वा चमत्कार करात तरी परमेश्वरनी फारोनं मन कठीण करं अनी त्यानी इस्त्राएल लोकसले देशमातीन जाऊ दिधं नही.