12
वल्हांडण सण
1 मंग परमेश्वरनी मिसर देशमा मोशे अनी अहरोनले सांगं की,
2 हावु महिना तुमना वरीसना पहिला महिना व्हवाले पाहीजे.
3 इस्त्राएलना सर्व मंडळीसले सांगा की, या महिनाना दहावा दिन तुम्हीन आपआपला घराणाप्रमाणे एक एक घराणाकरता एक एक कोकरू लेवानं.
4 अनी एक कोकरू सरनार नही इतला लोकं जर घरमा व्हतीन तर त्यानी शेजारीसना घरमा कितला शेतस अनी आपला कितला याना हिशोब करीसन कोकरू लेवानं अनी एक कोकरू कितला लोकसले खावाले पुरी याना हिशोब करी लेवाना.
5 कोकरू लिधं तर तो निर्दोष ऱ्हावाले पाहिजे, हावु नर तुम्हीन मेंढरं किंवा बोकडंमाईन तुमले पटी त्यामातीन लेवु शकतस.
6 या महिनाना चौदा तारीख पावत ते संभाळीन ठेवानं अनी त्या संध्याकायले इस्त्राएल लोकसनी त्याले मारानं.
7 त्यानं रक्त लिसन ज्या घरमा त्या कोकरुले खाणार शेतस त्या घरनी चौकटले आजुबाजू अनं वरना बाजूले ते रक्त लावानं.
8 अनी त्यासनी त्याच रातले ते मांस ईस्तववर भाजीसन ते बेखमीर भाकरसंगे अनी कडू भाजीसंगे खावानं.
9 मांस कच्च खावानं नही अनं शिजाडीसन बी खावानं नही, तर ते ईस्तववर भाजीसन खावानं, त्यानी मुंडी, पाय, आतडी हाई बी खावानं.
10 त्यामातील सकाळपावत काहीच उरू देवानं नही अनी सकाळपावत काय राहिनं तर ते आगमा टाकीसन जाळी टाकानं.
11 त्याले तुम्हीन अस खावानं, कबंर कशीसन, पायमा जोडा घालीसन अनी हातमा काठी लिसन ते घाईघाईमा खावानं, हावु परमेश्वरना वल्हांडण सण शे.
12 “कारण हाई रातले मी मिसर देशमा फिरीसन त्यामातील मनुष्य अनं पशु या सर्वासना पहिला जन्मेलले मी मारी टाकसु अनी मिसरना सर्व देवसले मी शिक्षा करसु. मी यहोवा शे.
13 अनी ज्या घरमा तुम्हीन राहाशात त्यावर लागेल ते रक्त तुमनाकरता खूण व्हई. मी जवय रक्त दखसु तवय तुमले वलांडीन जासु, मिसर देशना लोकसले मी मारसु तवय तुमनावर अनर्थ येवाव नही, तुमना नाश व्हवाव नही.
14 हावु दिन तुमले कायम ध्यानमा राही, या दिनले तुम्हीन परमेश्वर करता मेळा भराईसन सण पाळना; पिढ्यानंपिढ्या म्हणजे कायमनी विधी समजीसन हावु सण तुम्ही पाळाना.”
बेखमीर भाकरना सण
15 आखो परमेश्वर बोलना, “सात दिनपावत तुम्हीन खमीरनी भाकर खावानी नही, पहिलाच दिन तुमना घरमातीन सर्व खमीर काढी टाकानं, पहिला दिनपाईन सातवा दिनपावत जो कोणी खमीरनी भाकर खाई त्याले इस्त्राएलमातीन काढी टाकानं.
16 पहिला दिन तुमना पवित्र मेळा भराना तसाच सातवा दिन बी पवित्र मेळा भराना, या दोन दिन काहीच काम करानं नही फक्त जेवनखावन करता जे करनं पडस तेच करानं.
17 अशा तुम्हीन बेखमीर भाकरना सण पाळानं कारण याच रोज मी तुमनी सैनाले मिसर देशमातीन बाहेर आनेल शे, तरी बी हावु दिन तुम्हीन पिढ्यानपिढ्या सण म्हणीसन पाळाना.
18 पहिला महिनाना चौदावा दिननी संध्याकायपाईन ते त्या महिनाना एकविसवा दिननी संध्याकायपावत तुम्हीन बेखमीरघाई बनाडेल भाकरी खावान्या.
19 सात दिनपावत तुमना घरमा अजिबात खमिर ऱ्हावाले नको, कारण जो कोणी एखादी खमीरघाई बनाडेल एक बी वस्तु खाई, तो परदेशी ऱ्हावो की स्वदेशी, त्याले इस्त्राएल लोकसनी मंडळीमातीन कायमनं काढी टाकानं.
20 तुम्हीन कोणता बी खमीरना पदार्थ खाऊ नका, तुम्हीन घरोघर बिगर खमीरन्या भाकरी खावान्या.”
पहिला वल्हांडण सण
21 मंग मोशेनी सर्वा इस्त्राएलना वडील मंडळीले बलाईसन सांगं, “तुम्हीन आप आपला घरानाप्रमाणे एक एक कोकरू निवाडी लेवानं अनी वल्हांडणना यज्ञ कराना, असा तुमना परिवार वल्हांडण सण साजरा करू शकतस.
22 नंतर एजोब झाडनी एक जुडी लिसन ती भांडामातील रक्तमा बुचकाडानी अनी तीनाघाई ते रक्त दरवाजानी चौकटले वर अनं आजुबाजू लावानं अनी सकाळपावत कोणी बी घरना बाहेर जावानं नही.
23 कारण परमेश्वर मिसरीसना वध कराकरता बाहेर फिराव शे, ज्या ज्या घरना चौकटले वर अनं आजुबाजू रक्त लागेल परमेश्वर दखी तर ते दार तो वलांडीसन जाई अनी वध करणाराले वध कराकरता तुमना घरमा जाऊ देवाव नही.
24 हाई आज्ञा तुम्हीन अनी तुमना लेकरसले कायमनी शे.
25 वचन देयेलप्रमानं देश परमेश्वर तुमले दि, तठे तुम्हीन जाशात तवय हाई उपासना करानी पध्दत तुम्हीन पाळानी.
26 तुमना लेकरंबाळ तुमले ईचारतीन की, ‘या उपासनाना अर्थ काय?’
27 तवय तुम्हीन सांगा कि, हावु परमेश्वरना वल्हांडणना यज्ञ शे, त्यानी मिसरी लोकसले मारं अनी आपला घरसना बचाव करा ती येळले तो इस्त्राएल लोकसना घरं वलांडीन गया.” हाई ऐकीसन लोकसनी गुडघावर ईसन उपासना करी.
28 तवय इस्त्राएल लोकसनी तसच करं जस देवनी मोशे अनी अहरोनले आज्ञा करी व्हती.
पहिला जन्मेल ज्या त्यासनं मरण
29 मध्यरातमा अस व्हयनं की मिसर देशना सिंहासनवर बठेल राजाना थोरला पोऱ्यापाईन ते कैदखानामा पडेल कैदीसना थोरला पोऱ्यापावत सर्वा अनी गुरंढोरसपैकी सर्वा पहिला जन्मेल देवनी मारी टाकात.
30 रातले राजा, त्याना सर्व सेवक अनी सर्वा मिसरी लोकं जागा व्हयनात अनी मिसर देशमा मोठा हाहाकार उडना, कारण ज्यामा कोणी मरना नही अस एक बी घर राहिनं नही.
31 तवय फारोनी रातमाच मोशे अनं अहरोनले बलाईसन सांगं, “तुम्हीन अनं सर्वा इस्त्राएल लोकं मना लोकसमातीन निंघी जा, तुम्हीन म्हणतस तशी परमेश्वरनी उपासना करा.
32 तुम्हीन म्हणतस तस सर्व गुरंढोरं अनं शेरड्यामेंढ्या लिसन चालता व्हा अनी माले बी आशिर्वाद द्या.”
33 इस्त्राएल लोकसनी लगेच निंघी जावाले पाहीजे म्हणीसन मिसरी लोकं बोलु लागनात; त्या बोलनात, “तुम्हीन जर गयात नही तर आम्हीन मरसुत.”
34 इस्त्राएल लोकसनी मळेल पिठ खमीर न घालता तशीच ताठवाटीसंगेच गासोडामा बांधीसन खांदावर आवरी लिधं.
35 मोशेनी सांगेलप्रमाणे इस्त्राएल लोकसनी करं; त्यासनी मिसरी लोकसपाईन सोनाचांदिना दागीना अनं कपडा मांगी लिधात.
36 इस्त्राएल लोकसवर मिसरी लोकसनी कृपादृष्टी व्हावी अस परमेश्वरनी करं, म्हणीसन इस्त्राएल लोकसनी जे जे मांग ते मिसरी लोकसनी दि टाकं. अस त्यासनी मिसरी लोकसले लुटं.
इस्त्राएल लोकं मिसर देश सोडतस
37 मंग इस्त्राएल लोकं रामसेस आठेन निंघीसन सुक्कोथ आठे गयात. त्या जवळजवळ पायी चालणारा सहा लाख माणसेच व्हतात बाया अनी लेकरसनी तर मोजनी नव्हती.
38 त्यासनासंगे दुसरा लोकसना बी मोठा समुदाय गया; तसच शेरड्यामेंढ्या, गुरंढोरं वगैरे असा बराच जनावरं बी गयात.
39 त्यासनी आपलासंगे मिसर देशमा मळेल पिठ आणेल व्हतं. त्यानं त्यासनी बेखमीर भाकरी भाज्यात, तिमा काय खमीर नव्हतं, मिसर देशमातीन त्यासले बळजबरी बाहेर काढेल व्हतं, त्यामुये त्यासले खावाकरता बनाडाले येळ नव्हती म्हणीसन त्यासले काय बनाडता वनं नही.
40 इस्त्राएल लोकं मिसर देशमा ईसन ऱ्हावाले चारशे तीस वरीस व्हयेल व्हतात.
41 चारशे तीस वरीसना बरोबर त्याच दिनले परमेश्वरनी सर्व सेना मिसर देशमातीन बाहेर पडनी.
42 परमेश्वरनी त्यासले मिसर देशमातीन बाहेर काढं यानाकरता बी परमेश्वरकरता जागरणनी रात म्हणीसन अवश्य पाळानी; इस्त्राएल लोकसनी पिढ्यानपिढ्या हाई रात जागरणनी रात म्हणीसन अवश्य पाळी.
वल्हांडणना विधी
43 परमेश्वर मोशे अनं अहरोन यासले बोलना, “वल्हांडण सणना विधी असा: कोणी विदेशीनी वल्हांडणनं बनाडेल जेवण खावानं नही,
44 पण जर कोणी पैसा दिसन एखादा दास ईकत लिधा अनी त्यानी सुंता व्हयनी व्हई तर तो त्यामातील खाऊ शकस.
45 घर येल पाहुणा किंवा नौकर यासनापैकी कोणीच ते खावानं नही.
46 हाई जेवण एकच घरमा व्हवाले पाहिजे त्या मांसमातील काहीच घरना बाहेर लई जावानं नही अनी यज्ञ करेल पशुनं एकबी हाडूक मोडानं नही.
47 इस्त्राएलना सर्व मंडळीसनी हावु विधी पाळाना.
48 कोणी परदेशी तुमनासंगे राही राहीना अनी त्याले वल्हांडण सण पाळानी इच्छा व्हई तर त्याना घरना सर्व माणससनी सुंता व्हवाले पाहीजे मंग त्याले जोडे करीसन वल्हांडण सण पाळु देवाना अनी आपला लोकसनामायकच त्याले समजानं; पण बेसुंता माणुसनी ते खावानं नही.
49 इस्त्राएलमा जन्मेल अनी तुमनामा राहनारा विदेशी यासले एकच नियम राही.”
50 यानाप्रमाणे सर्व इस्त्राएल लोकसनी करं, परमेश्वरनी मोशे अनं अहरोनले आज्ञा करेल प्रमाने त्यासनी करं.
51 त्याच रोज परमेश्वरनी इस्त्राएल लोकसले टोळीटोळीतीन मिसर देशमातीन बाहेर काढं.