26
परमेश्वरना उपस्थितीना निवासमंडप
(निर्गम 36:8-38)
निवास मंडपकरता दहा पडदा करानं; त्या कातेल तलम सणसना कापडासना अनी निया, जांभया अनी किरमिजी रंगनं सुतघाई तयार करानं अनी त्यामा मोठा चतुर कारागीरकडतीन करुब काढी लेवानं. एक एक पडदानी लांबी आठ्ठावीस हात अनी रूंदी चार हात राहावाले पाहिजे; त्या बठा पडदा एक मापना राहावाले पाहिजे. त्यामासला पाच पडदा येरायेरले जोडीसनं राहावाले पाहिजे अनी दुसरा पाच पडदा येरायेरले जोडीसनं राहावाले पाहिजे. जठे एक पडदा जोडामां येई तठे काठले निया सुतनं फंदा कर; तशेच दुसरा पडदानं काठलेबी तशच फंदा कर. एक पडदाले पन्नास फंदा कर अनी दुसरा पडदानं काठले पन्नास फंदा कर. ह्या फंदा समोरासमोर राहावाले पाहिजे. तशेच सोनानं पन्नास आकडा बनाडानं अनी या आकडासना अनी त्या आकडासना पडदा आशे जोडानं की बठा मिळीसनं निवासमंडप अखंड दखाई. निवासमंडपवार तंबू राहावाले पाहिजे‍ म्हणीसनं बकर्‍यासना केसासना पडदा करानं; त्या पडदा आकरा राहावाले पाहिजे. एक एक पडदानी लांबी तीस हात अनी रूंदी चार हात राहावाले पाहिजे; हया आकरा पडदा एक मापना राहावाले पाहिजे. पाच पडदा येगळा अनी सव पडदा तंबूना समोरनी बाजुले दोन भाग करानं. 10 जोडीसनं करेल एक फंदानं बाहेरतीन शेवटना पडदानं काठले पन्नास फंदा करानी; तशेच फंदानं दुसरा पडदानं काठले पन्नास फंदा करानं. 11 अनी पितळनं पनास आकडा बनाडानं; अनी ते फंदासमा घालीसनं तंबू आशे जोडानं ते अखंड दखाई. 12 तंबूना पडदाना लटकेल भाग म्हणजे उरेल आरधा पडदा निवासमंडपना मांगेना बाजुले लटकत सोडानं.
13 अनी तंबूना पडदा लांबीकडतीन हातभर हाई बाजुले अनी हातभर त्या बाजुले आशे निवासमंडप झाकाकरता त्यान्या दोनी बाजुले लटकाडी ठेवानं. 14 तंबुकरता तांबडा रंग देयेल मेंढाना कातडानं एक आच्छादन अनी त्यानावर तहश्यानं कातडानं एक आच्छादन करानं.
15 निवासमंडपले उभा लावाकरता बाभुळना लाकडेसना फळया बनाडानं. 16 प्रत्येक फळीनी लांबी दहा हात अनी रूंदी दीड हात राहावाले पाहिजे.
17 प्रत्‍येक फळी दुसरी फळीले जोडानी म्हणजे तिले दोनदोन कुसे राहावाले पाहिजे; निवासमंडपन्या बठया फळया आशेच करानं. 18 निवासमंडपकरता ज्या फळया तु करशी त्यासनामाईन वीस फळया दक्षिण बाजुकरता राहावाले पाहिजे. 19 या ईस फळयासना खाल लावाकरता चांदीन्या चाळीस उथळ्या बनाडानं म्हणजे एक एक फळीना खाल चुलाकरता दोन दोन खाचा; 20 त्याप्रमानं निवासमंडपन्या दुसरी म्हणजे उत्तर बाजुकरता वीस फळया बनाडानं. 21 त्याकरता चांदीन्या चाळीस खाचा बनाडानं म्हणजे एक एक फळीनं खाल दोन दोन खाचा. 22 निवासमंडपनी मांगेनी म्हणजे पश्चिम बाजुकरता सव फळया बनाडानं; 23 अनी मांगली बाजुले निवासमंडपन्या कोपरासकरता दोन फळया बनाडानं.
24 हया फळया खालपाईन दोनदोन राहीसनं त्या दोनी वरना भागले एक एक कडीघाई जोडी टाकानं, अनी दोनी फळया आशेच राहावाले पाहिजे; दोनी कोपरासकरता आशे फळया राहावाले पाहिजे. 25 आठ फळया अनी त्यान्या चांदीन्या सोळा खाचा राहावाले पाहिजे, अनी एक एक फळीनं खाल दोन दोन खाचा राहावाले पाहिजे. 26 अनी बाभुळना लाकडासना अडसर तयार करानं; निवासमंडपनं एक बाजुना फळीकरता पाच,
27 अनी दुसरी बाजुनी फळीकरता पाच अनी त्याना पश्चिमले म्हणजे मांगली बाजुकरता पाच अडसर बनाडान्यात. 28 अनी फळयासना मजारमा लावानं मजारनं अडसर तंबूना एक शेवटपाईन दुसरा शेवटपावोत जावाले पाहिजे आशे राहावाले पाहिजे. 29 त्या फळया सोनाघाई मढावानं अनी अडसर लावाकरता कडया सोनान्या बनाडान्यात, अनी अडसरबी सोनाघाई मढावानं. 30 मी तुले पर्वतवर दखाडेल प्रमानं निवासमंडप उभं करानं.
31 तशेच निया, जांभया अनी किरमिजी रंगनं अनी कातेल तलम सणसनं सुतनं एक आंतरपट बनाडानं अनी त्यानावर चतुर कारागीरकडतीन करुब काढी लेवानं. 32 हाई पट सोनाघाई मढायेल बाभुळनं लाकुडनं चार खांबवर लटकाढानं, त्यान्या आकडया सोनान्या राहावाले पाहिजे अनी ते खांब चांदीन्या चार खाचासमां उभं करानं. 33 आंतरपट आकडयासनाखाल लटकाढीसनं त्यानाआड मजारनी बाजुले आज्ञापटनी कोश ठेवानं; हाई आंतरपट पवित्रस्थान अनी परम पवित्रस्थान हाई तुमले येगळं करी. 34 मंग पवित्रस्थानमां आज्ञापटना कोशवर दयासन ठेवानं. 35 अनी त्या आंतरपटनाबाहेर निवासमंडना उतर बाजुले मेज ठेवानं अनी दक्षिण बाजुले मेजनामोरे दिवट ठेवानं;
36 अनी तंबूना दारकरता निया, जांभया अनी किरमिजी रंगन अनी कातेल तलम सणसनं सुतनं वेलबुट्टीदार पडदा बनाडानं. 37 या पडदाकरता बाभुळना लाकडसना पाच खांब करानं अनी ते सोनाघाई मढावानं; त्यासना आकडा सोनानं राहावाले पाहिजे अनी त्यानाकरता पितळन्या पाच खाचा वती टाकानं.