27
होमबलीनी वेदी
(निर्गम 38:1-7)
बाभुळना लाकडसना पाच हात लांब अनी पाच हात रुंदी आशी एक वेदी बनाड; ती चौकोन राहीसनं तिनी उंची तीन हात राहावाले पाहिजे. तिन्या चारी कोपरासले चार शिंग बनाडानं; ते शिंग तिना आंगनच राहावाले पाहिजे; हाई वेदी पितळघाई मढावानं.
त्यामाधली राख उचलीसनं ली जावाकरता भांडा, त्याप्रमानं तिनाकरता पावडी, कटोरा, काटे अनी अग्नीपात्र बनाडानं; तिना बठा भांडा पितळनं राहावाले पाहिजे. तिनाकरता पितळनं जाळीनं एक चाळण बनाडानं अनी तिना चारी कोपरासले पितळनं चार कडया लावानं. हाई चाळन वेदीना आजुबाजूले कंगोरानं खाल आशे लावानं की ती वेदीना अर्धा उचा राहावाले पाहिजे. वेदीकरता बाभुळना लाकुडनं दांड बनाड अनी ते पितळघाई मढाई लेवानं. त्या दांडा कडामां घालानं म्हणजे जवय जवय उचलामां येई तवय तवय तिना दोनी बाजुले त्या राहातीन. वेदीमां पोकय ठेईसनं अनी बाजुले फया लाईसनं बनाडानं; पर्वतवर दखाडेल प्रमानं ते करानं.
निवासस्थानना आंगण
(निर्गम 38:9-20)
निवासमंडपले आंगन कर; त्याना दक्षिण बाजुले कातेल तलम सणसनं ईनेल पडदा मिळीसनं त्यासनी लांबी एक बाजुले शंभर हात राहावाले पाहिजे; 10 त्यासले वीस खांब करानं अनी त्या खांबसले पितयन्या वीस खाचा करी लेवानं; खांबासना आकडा अनी त्यासनी साखय चांदीनी करानी;
11 त्याप्रमानं आंगणनं उतर बाजुलेबी शंभर हात लांबना पडदा राहावाले पाहिजे; त्यासले ईस खांब राहीसनं त्यासले वीस खाचा राहावाले पाहिजे अनी त्या खांबासना आकडा अनी साखया चांदीन्या राहावाले पाहिजे. 12 आंगणनं रुंदीकडला भागमां म्हणजे पश्चिमले पनास हात पडदा राहावाले पाहिजे; त्यासना खांब दहा अनी खाचा दहा राहावाले पाहिजे. 13 पुर्व बाजुले आंगणनी रूंदी पनास हात राहावाले पाहिजे. 14 अनी आंगणनं दारनं एक बाजुले पंधरा हात पडदा राहावाले पाहिजे; त्यासना खांब तीन अनी खाचा तीन राहावाले पाहिजे. 15 अनी दारना दुसरी बाजुले पंधरा हात पडदा राहीसन त्यासलेबी तीन खांब अनी तीन खाचा राहावाले पाहिजे. 16 आंगणनं दारकरता एक पडदा बनाडानं; तो निया, जांभया अनी किरमिजी रंगनं कातेल तलम सणनं सुतना वेलबुट्टीदार राहावाले पाहिजे; तो वीस हात राहीसनं त्याले चार खांब अनी चार खाचा राहावाले पाहिजे.
17 आंगणनं आजुबाजूना बठा खांब चांदीन्या साखयासघाई जोडेल राहावाले पाहिजे; त्यासना आकडा चांदीन्या अनी खाचा पितळन्या राहावाले पाहिजे. 18 आंगणनी लांबी शंभर हात अनी रूंदीनासारखा पन्नास हात अनी पडदानी उंची पाच हात राहावाले पाहिजे; त्याना पडदा कातेल सणसना सुतनं राहीसनं त्यान्या खांबन्या खाचा पितळनं राहावाले पाहिजे. 19 निवासमंडपमासला बठा उपकरनं सामान त्याना बठा खुट, अनी आंगणनं बठा खुट पितळना राहावाले पाहिजे.
दिवासनी देखभाल
(लेवीय 24:1-4 )
20 तु इस्त्राएल लोकेसले आशे आज्ञा करानं की दिवा कायमनं पेटेल राहावाले पाहिजे त्यासनी दिवटकरता जैतुननं कुटीसनं काढेल शुध्द तेल लिसनं येवानं. 21 आज्ञापटनामोरे ज्या आंतरपट शेतस त्या आंतरपटनाबाहेर दर्शनमंडपमां अहरोन अनी त्याना पोर्‍या यासनी तो दिवट संध्याकायपाईन ते सकायपावोत परमेश्वरनामोरे उजाळानी व्यवस्था करानी; हाई इस्त्राएल लोकेसकरता पिढयानपिढया कायमनं विधी शे.