12
अब्रामले देवनं पाचारण
1 तवय परमेश्वरनी अब्रामले सांगं, तू आपला देश, आपला नातेवाईक, अनं आपला बापना घर सोडीसन मी दखाडसू त्या देशमा जाय.
2 मी तुनापाईन मोठं राष्ट्र बनाडसू, मी तुले आशिर्वाद दिसु, तुना नाव मोठं करसु; तू आशिर्वादीत व्हशी.
3 जो तुले आशिर्वाद दी, त्यासले मी आशिर्वाद दिसु, तशच जो तुले शाप दी, त्यासले मी शाप दिसु, तुनाद्वारा पृथ्वीवरना सर्वा कुळं आशिर्वादीत व्हतीन.
4 परमेश्वरनी हाई आज्ञा देयल प्रमाणे अब्राम निंघी गया, अनं लोट बी त्यानासोबत गया; हारान आठेन निंघाना येळले अब्रामना वय पंचाहत्तर वरीसना व्हता.
5 अब्राम आपली बायको सारा अनं त्याना पुतण्या लोट, आपली सर्वी धनसंपत्ती जी त्यानी गोळा करेल व्हती, अनी हारान आठे त्यानी मियाडेल माणसं बी लिसन अब्राम कनान देशमा जावाले निंघना.
असा प्रकारे कनान देशमा त्या जाईसन पोहचनात.
6 अब्राम त्या देशमाईन शखेमना प्रदेशना पवित्र जागावर म्हणजे मोरे आठे पवित्र झाडनाजोडे जाईसन पोहचना, त्या काळले त्या देशमा कनानी लोके राही राहिंतात.
7 परमेश्वर अब्रामले आशिर्वाद दिसन बोलना, हाऊ देश मी तुना संतानले दिसु; परमेश्वरनी त्याले दर्शन दिधं म्हणीन त्यानी तठे परमेश्वरनी एक वेदी बांधी.
8 मंग तो तठेन निंघना अनी बाबेलना पुर्वले डोंगर व्हता तठे जाईसन त्यानी तंबू उभा करं, त्याना पश्चिमले बेथेल शहर व्हतं अनं पुर्वले आय शहर व्हतं; तठे त्यानी परमेश्वरनी वेदी बांधी अनी परमेश्वरनी नावनी आराधना करी.
9 तठेन निंघीसन अब्राम प्रवास करीसन कनान देशना दक्षिणकडे गया.
मिसर देशमा अब्राम
10 त्या येळले देशमा दुष्काळ पडेल व्हता; त्यामुये काही दिन मिसरमा जाईसन रावानं म्हणीन अब्राम तिकडे निंघी गया, कारण त्या देशमा दुष्काळ खुपच भयानक व्हता.
11 मंग अश व्हयना की, तो मिसरमा प्रवेश करनारच तोच त्यानी बायको साराले बोलना, दख, तू दिसाले सुंदर बाई शे हाई माले माहित शे.
12 तुले मिसरी गावना लोके दखतीन तवय हाई यानी बायको शे अस म्हणतीन, अनी माले मारी टाकतीन अनं तुले जिवत ठेवतीन.
13 यामुये कृपा करीसन त्यासले हाई सांग, मी यानी बहीण शे, म्हणजे तुनामुये मनं भलं व्हई, अनी तुनामुये मना जीव वाची.
14 मंग अब्राम मिसर देशमा जाईन पोहचना, तवय ती बाई भलती सुंदर शे अश मिसर देशना लोकसनी दखं.
15 फारोना सरदारसनी तिले दखीसन फारोनाजोडे तिनी प्रशंसा करी अनी तिले त्याना घर आनीसन ठि दिधं.
16 तिनामुये फारोनी अब्रामनं भलं करं, अनी त्याले मेंढरं, बैल, गाढव, दास, दासी, गाढवी अनं उंट भेटनात.
17 तरी अब्रामनी बाई सारा हिना कारण परमेश्वरनी फारोले अनं त्याना घरनासले भयानक पीडा भोगाले लायं.
18 तवय फारोनी अब्रामले बलाईसन सांगं, "तू मनासंगे हाई काय करं? हाई ते तुनी बायको शे, तू माले हाई काबंर नही सांग?
19 ती तुनी बहीण शे अस तु माले काबंर सांगं? मी तिले आपली बायको कराकरता मनाकडे ठेयल व्हतं; तर आते दख हाई तुनी बायको शे, हिले लई जाय.
20 तवय फारोनी आपला दाससले त्यानाविषयी हुकूम करा; अनी त्यानी बायको अनं त्यानं जे काही व्हतं त्यासनासंगे त्याले वाट लायं.