14
अब्राम लोटनी सुटका करस
1 शिनारना राजा अम्राफेल, एल्लासारना राजा अर्योक, एलामना राजा कदार्लागोमर अनी गोयीमना राजा तिदाल यासना येळले अश व्हयनं की,
2 त्यासनी सदोमना राजा बेरा, गमोराना राजा बिर्शा, अदमना राजा शिनाब, सबोयिमना राजा शमेबर अनी बेला म्हणजे सोअर याना राजा यासनासंगे युध्द करात.
3 ह्या सर्वा एकजूट करीसन सिद्दीम खोरामा गयात; हाई खोरा म्हणजे क्षारसमुद्र शे.
4 त्या कदार्लागोमर यासना बारा वरीसपावोत अधीन व्हतात, पण तेराव्या वरीसले त्या त्यानावर उठनात.
5 चौदाव्या वरीसले कदार्लागोमर अनं त्याना पक्षना राजे यासनी ईसन अष्टरोथ-कर्णईम अठे रेफाई लोकसले, हाम अठे जूजी लोकसले, किर्याथाईमना मैदानमा एमी लोकसले पराजीत करं.
6 अनी होरी लोकसले त्यासन्याच सेईर डोंगरमा मार दिसन एल्-पारानना जोडेना रानपावत हाकली दिधं.
7 मंग मांगे फिरीसन एन-मिशपात म्हणजे कादेशमा त्या वनात अनं त्यासनी अमालेकी लोकसना सर्वा देश जिकी लिधा अनं हससोन- तामार अठे राहनारा अमोरी लोकसले बी जिकी लिधा.
8 तवय सदोमना राजा, गमोराना राजा, अदमना राजा, सबोयिमना राजा, अनी बेला म्हणजे सोअर याना राजा ह्या त्यानासंगे युध्द कराले निंघनात अनी सिद्दीम खोरामा त्यासनी आपला सैनासनी रचना करी.
9 एलामना राजा कदार्लागोमर, गोयिमना राजा तिदाल, शिनारना राजा अम्राफेल, अनी एल्लासारना राजा अर्योक यासनासंगे त्या युध्द करनात; चार राजासनी पाच राजासनासंगे सामना करात.
10 सिद्दीम खोरामा डांबरना बऱ्याच खाणी व्हत्यात, सदोम अनं गमोरा यासना राजा पळनात तवय त्या खाणीसमा पडनात अनी बाकीना ज्या वाचनात त्या डोंगरसमा पळत सुटनात.
11 तवय सदोम अनं गमोरा आठली मालमत्ता अनं पुरी अन्न-सामुग्री शत्रु लुटीसन लई गयात.
12 अब्रामना पुतण्या लोट ह्याले पण त्यासनी धरीसन त्यानी बी मालमत्ता लई गयात, कारण तो सदोम आठे राही राहिंता;
13 तवय तठेन पळी येल एक माणुसनी जाईसन अब्राम इब्रीले हाई बातमी सांगी; त्या येळले तो अष्कोल अनं आनेर यासना भाऊ अमोरी मम्रे याना एलोन झाडना जंगलमा राही राहिंता; ह्या अब्रामना संगेना व्हतात.
14 आपला भाऊबंधले धरीसन लई गयात हाई ऐकीसन अब्रामनी आपला घरमा जन्मेल अनं लढाईना काममा तयार करेल असा तीनशेअठरा दास लिसन त्यानी दान शहरपावत शत्रूसना पाठलाग करा.
15 त्यानी आपला दाससन्या टोळ्या करीसन त्यासनावर रातले चाल करी अनी त्यासले मार दिसन दिमिष्कना उत्तरमा होबापावत त्यासना पाठलाग करा.
16 त्यानी सगयी मालमत्ता वापस आणी; तसच आपला भाऊबंध लोट, त्यानी मालमत्ता, बाया अनं लोके यासले सोडाईसन परत लयना.
मलकीसदेक अब्रामले आशिर्वाद देस
17 कदार्लागोमर अनी त्यानासोबतना राजा यासले मारीसन तो वापस ई ऱ्हाईंता त्याले भेटाले सदोमना राजा शावेखिंड म्हणजे राजेखिंड आठेपावत वना.
18 अनी शालेमना राजा मलकीसदेक भाकर अनं द्राक्षरस लिसन त्याले भेटाले वना; हाऊ परात्पर देवना याजक व्हता.
19 त्यानी त्याले हाई आशिर्वाद दिधं आकाशना अनं पृथ्वीना मालक जो परात्पर देव तो अब्रामले आशिर्वाद देवो.
20 ज्या परात्पर देवनी तुना शत्रू तुना स्वाधीन करा तो धन्य! तवय अब्रामनी त्याले दहावा हिसा दिधा.
21 मंग सदोमना राजा अब्रामले बोलना, माणसे माले दि टाका अनी मालमत्ता तुमनाकरता ठेई ल्या.
22 पण अब्राम सदोमना राजाले बोलना, मी आकाशना अनं पृथ्वीना जो मालक परात्पर देव यहोवा यानी शपथ लिसन सांगस की,
23 तुमना एक सुतळीना तोडा किंवा वहाणना बंद मी लेवाव नही; मी अब्रामले धनवान बनाडं अश बोलाले तुमले कारण नको भेटाले.
24 ह्या माणसंसनी अन्न खादं तेवढं पुरं, मनासंगे येल आनेर, अष्कोल अनं मम्रे यासले वाटा भेटना तेवढच पुरं शे; त्यासले आपला वाटा लेऊ द्या.