35
देव याकोबले आशिर्वाद देस
1 मंग देव याकोबले बोलना, ऊठ बेथेलमा जाईसनं राहाय; अनी तू आपला भाऊ एसाव याले घाबरीसन पळी जाई राहिंता तवय ज्या देवनी तुले दर्शन दिधं त्यानाकरता तठे वेदी बांध.
2 मंग याकोब आपला घरना मंडळीले अनं त्यानासंगेना सर्वा माणसंसले बोलना, तुमनाजोडे ज्या परका देव शेतस, त्या सर्वा फेकी द्या अनं स्वताले शुध्द करीसन आपला कपडा बदली टाका.
3 अनी चला आपण आठेन निंघीसन बेथेलमा जाऊत; तठे मी परमेश्वरना करता वेदी बांधसु; संकटना येळले त्यानी मनं ऐका; अनी ज्या वाटतीन मी प्रवास करी राहिंतु तिमा तो मनासंगे व्हता.
4 तवय त्यासनी त्यासनाजोडे ज्या परका देवसन्या मुर्ती व्हत्यात अनी आपला कानमाधलं कुंडलं याकोबनाजोडे दिधात; मंग याकोबनी शखेमनाजोडे एक एला झाडजोडे ती पुरी दिधं.
5 मंग त्यासनी तठेन पलायन करं; अनी आसपासना नगरना लोकसना मनमा देवनी अश भय निर्माण करा की, त्या याकोबना पोऱ्यासना मांगे लागनात नहीत.
6 अश प्रकारतीन याकोब आपलाबरोबरना सर्वा लोकसनासंगे कनान देशमा लूज आठे ईसन पोहचना.
7 तठे त्यानी एक वेदी बांधी अनं त्या स्थळले एल-बेथेल अश नाव दिधं; कारण तो आपला भाऊपाईन पळी जाई राहिंता तवय आठेच देव त्याले प्रकट व्हयना व्हता.
8 रिबकानी दाई दबोरा हाई मरण पावनी अनं तिले बेथेलना खालना बाजुले अल्लोन झाडनाखाल पुरं; ह्या झाडना नाव अल्लोन-बाकूथ अश ठेवात.
9 याकोब पदन-अराममाईन परत येवावर देवनी त्याले परत दर्शन दिसन आशिर्वाद दिधा.
10 देव त्याले बोलना, तुनं नाव याकोब शे; पण आतेपाईन तुले याकोब म्हणावुत नहीत, तर तुनं नाव इस्त्राएल व्हई; अनी देवनी त्याले इस्त्राएल हाई नाव दिधं.
11 देव त्याले आखो बोलना, मी सर्वसमर्थ देव शे; तू फलद्रूप व्हईसन बहुगुणित व्हई जाय; तुनापाईन एकच राष्ट्र नही, तर राष्ट्र समूह उत्पन्न व्हतीन; अनी तुनापाईन राजा उत्पन्न व्हतीन.
12 अनी जो देश मी अब्राहाम अनं इसहाक यासले दिधा, तो तुले दिसु अनी तुनामांगे तुनी संतानले बी तोच देश दिसु.
13 मंग देवनी जठे याकोबना संगे भाषण करं तठेनच तो वर निंघी गया.
14 अनी जठे देवनी याकोबना संगे भाषण करं तठे त्यानी एक दगडना स्तंभ उभा करा, अनी त्यानावर पेयार्पण करीसन त्यानावर तेल ओतं.
15 मंग याकोबनी त्या स्थळना नाव बेथेल ठेवा जठे देवनी त्यानासंगे भाषण करेल व्हतं.
राहेलनं मृत्यु
16 मंग त्यासनी बेथेलमाईन वाटचाल करी अनी एफ्राथ नावना गाव अजुन थोडंच बाकी व्हता तवय राहेलले प्रसूत पिडानी सुरवात व्हयनी अनं तिले भयानक प्रसूती पिडा व्हवाले लागनी.
17 प्रसूतीपिडा व्हई राहिंतात तवय सुईण तिले बोलनी घाबरू नको, कारण आते बी तुले हाऊ पोऱ्याच व्हवाव शे.
18 तवय अश व्हयनं की, ती मरण पावनी अनी तिना जीव जावाना येळले तिनी पोऱ्याना नाव बेनओनी अश ठेवात. पण त्याना बापनी त्यानं नाव बन्यामिन (मना उजवा हातना पोऱ्या) अश ठेवात.
19 अश प्रकारतीन राहेल मरण पावनी अनी एफ्राथ (म्हणजे बेथलेहेम) गावना वाटवर तिले पुरं.
20 मंग याकोबनी तिना कबरवर एक स्तंभ उभा करा; तो स्तंभ राहेलना कबरवर आजपावत कायम शे.
21 नंतर याकोबनी पलायन करीसन एदेर कोटना पलीकडे आपला पडाव टाकात.
याकोबना पोऱ्या
(१ इतिहास 2:1-2)
22 तवय अश व्हयनं की, याकोब त्या देशमा राही राहिंता तो रऊबेन हाऊ आपला बापनी उपपत्नी बिल्हा हिनाजोडे जाईसन झोपना, अनं हाई याकोबले समजनं याकोबना बारा पोऱ्या व्हतात.
23 लेआ हिना पोऱ्या: याकोबना पहिला पोऱ्या रऊबेन अनी शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार अनं जबुलून;
24 राहेलना पोऱ्या: योसेफ अनं बन्यामिन;
25 राहेलनी दासी बिल्हा हिना पोऱ्या: दान अनं नफताली;
26 अनी लेआनी दासी जिल्पा हिना पोऱ्या: गाद अनं आशेर; ह्या याकोबना पोऱ्या त्याले पदन-अराममा व्हयनात.
इसहाकना मृत्यु
27 मंग किर्याथ अरबा म्हणजे हेब्रोन अठला मम्रेमा याकोब आपला बाप इसहाक याले भेटाले गया; तठेच अब्राहाम अनं इसहाक ह्या सुरवातले वस्ती करीन राही राहिंतात.
28 इसहाकनं वय एकशेऐंशी वरीसना व्हई जायेल व्हतं.
29 अनी इसहाकना जीव निंघी गया; तो म्हतारा अनं पुरा वयना व्हईसन मरण पावना अनी आपला लोकसमा जाईन भेटना; त्याना पोऱ्या एसाव अनी याकोब यासनी त्याले मूठमाती दिधी.