40
योसेफ कैदीसना स्वप्नसना अर्थ सांगस
1 यानानंतर अश व्हयनं की, मिसरना राजाना प्यालेबरदार अनं आचारी या दोन्हीसनी आपला मालक मिसरना राजा याना अपराध करा.
2 प्यालेबरदारसना नायक अनं आचारीसना नायक ह्या त्याना दोन्ही सरदारसवर फारो रागावना.
3 तवय त्यानी त्यासले गारद्यासना सरदारसना वाडामा कैद करी ठेवं; तठेच योसेफ बी कैदमा व्हता.
4 गारद्यासना सरदारनी योसेफले त्यासना अधिकारी नेमा; अनं त्यानी त्यासनी सेवा करी; तठे त्या काही दीन कैदमा राहिनात.
5 बंदीगृहमा कैदमा पडेल मिसरी राजाना प्यालेबरदार अनं आचारी या दोन्हीसले एकच रातले त्यासले लागु व्हतीन अश अर्थना स्वप्न पडनात.
6 सकासले योसेफ त्यासनाकडे गया तवय त्या त्याले नाराज दखायनात.
7 तवय त्यानी फारोना त्या सरदारले ज्या त्यानासंगे त्याना मालकना बंदीगृहमा कैद व्हतात, त्यासले ईचारं, आज तुमना तोंडे का बर उतरेल दखाई राहिनात शेतसॽ
8 त्या त्याले बोलनात, “आमले स्वप्न पडेल शे, पण त्याना अर्थ सांगनारा कोणी नही शे,” “योसेफ त्यासले बोलना, सपनना अर्थ सांगानं काम देवना शे?” तुम्हीन आप आपल सपन माले सांगा.
9 प्यालेबरदारसना नायकनी योसेफले आपला स्वप्न सांगा, ते अश व्हतं, स्वप्नमा मनासमोर एक द्राक्षवेल व्हता,
10 त्या द्राक्षवेलले तीन फाटा व्हतात, त्याले कळ्या लागीसन बहार वना मंग त्याना गुच्छासले द्राक्ष लागीसन पिकनात.
11 अनी फारोना प्याला मना हातमा व्हता; मी द्राक्ष लिसन त्या फारोना प्यालामां पिळात अनं तो प्याला फारोना हातमा दिधा.
12 योसेफ त्याले बोलना, याना अर्थ आशे शे, त्या तीन फाटा म्हणजे तीन दिन.
13 तीन दिनमा फारो तुले उचा करी अनी तुले तुना पदवर परत नेमी, अनी तू पहिला सारखा फारोना प्यालेबरदार व्हईसन त्याना हातमा प्याला दिशी.
14 पण तुना भलं व्हयनं तर मनी आठवन कर, अनी मनावर कृपा करीसनं फारोनाजोडे मनी चर्चा कर अनी हाई बंदीगृहमाईन मनी सुटका कर.
15 कारण माले इबऱ्यासना देशमाईन चोरी आणेल शे; अनी आठे बी मी अश काही काम करेल नही ज्यानामुये मी हाई बंदीगृहमा टाकाई जायेल शे.
16 सपनना अर्थ चांगला शे हाई दखीसन, आचारीसना नायक योसेफले बोलना, माले बी अश सपन पडनं की, धवया भाकरीसन्या तीन टोपल्या मना डोकावर व्हत्यात.
17 अनी वरनी टोपलीमा फारोनाकरता सर्वा प्रकारना बनाडेल जेवण व्हता, अनी पक्षी मना डोकावरन्या टोपलीमाधलं वस्तुसले खाई राहिंतात.
18 योसेफनी त्याले उत्तर दिधं, हाऊ सपनना अर्थ आशे शे, त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिन;
19 फारो तीन दिनमा तुना मुंडका वर करीन उडाई, तुले झाडवर फाशी दि अनी चिडा तुना मास तोडीन खातीन.
20 तिसरा दिनले फारोना जन्मदिन वना, तवय त्यानी आपला सर्वा चाकरंसले मेजवाणी दिधी, अनी त्यानी आपला प्यालेबरदारसना नायक अनं आचारीसना नायक यासले समोर आणात.
21 त्यानी प्यालेबरदारसना नायकले त्याना पदवर परत नेमा, अनी तो फारोना हातमा प्याला देवाना काम कराले लागना.
22 पण त्यानी आचारीसना नायकले फाशी दिधी, योसेफनी त्यासना सपनना अर्थ सांग व्हतं तस घडनं.
23 पण प्यालेबरदारसना नायकले योसेफनी आठवन ऱ्हायनी नही, तो त्याले ईसरी गया.