2
दुष्ट मनुष्य
भाऊ अनं बहिणीसवन आपला प्रभु येशु ख्रिस्तनं आगमन अनी त्यानाजोडे आपल एकत्र व्हणं, यानाबद्दल आम्हीन तुमले अशी ईनंती करतस की, कदाचित तुमले आमना पत्रमुये वाटत व्हई की, प्रभुनं येणं जोडे येल शे तर नाराज व्हईसन हिम्मत सोडु नका अनं अस्वस्थ व्हवु नका. कोणता बी प्रकारतीन कोणकडतीन फसु नका; प्रभुविरूध्द शेवटला बंड व्हस नही, प्रभुना दिनना पहिले बंड व्हई, तवय दुष्ट माणुस प्रकट व्हई; ज्याले नरकमा टाकामा ई. तो दुष्ट माणुस, विरोधी अनं ज्याले देवना किंवा ज्या भजनीय गोष्टी शेतस त्या सर्वासपेक्षा स्वतःले उंच करनारा, म्हणजे मी देव शे, अस स्वतःनं प्रदर्शन करीसन देवना मंदिरमा बसणारा असा शे.
मी तुमनाजवळ व्हतु तवय हाई तुमले सांगं, यानी तुमले आठवण नही का? दुष्ट माणुस योग्य येळले प्रकट व्हवाले पाहिजे, दुसरा येळले व्हवाले नको, म्हणीसन ज्या प्रतिबंध शेतस त्या तुमले माहित शेतस. दपेल दुष्टता आते बी आपलं कामं करी राहिना अनी जो आते त्याले रोखी राहिना तो दुर व्हस नही तोपावत तो तसच आपलं काम करत राही. अनी मंग तो “दुष्ट माणुस” प्रकट व्हई, त्याले प्रभु येशु येताच आपला तोंडमाधला श्वासतीन मारी टाकी, अनी स्वतःना तेजोयम उपस्थितीन त्याले भस्म करी. त्या दुष्ट माणुसनं येणं सैतानना सामर्थ्यतीन, सर्व प्रकारना खोटा चमत्कार, अनी चिन्ह, अनी अद्भुत कामनासंगे ई. 10 अनी नाश व्हणारसकरता सर्व प्रकारना दुष्टताघाई फसाडी. कारण त्यासनी सत्यवर प्रिती करी नही ज्यापाईन त्या लोकसनं तारण व्हणार व्हतं, म्हणीसन त्यासना नाश व्हई. 11 यामुये परमेश्वरनी त्यासनामा एक भटकाई देणारा सामर्थ्यले धाडं की ती खोटावर ईश्वास करतीन. 12 ज्यासनी सत्यवर ईश्वास ठेवा नही, तर अनितीमा समाधान मानं त्या सर्वासले दंडाज्ञा व्हवाले पाहिजे म्हणीन अस व्हई.
तुमनी निवड तारणकरता व्हयनी
13 भाऊ अनं बहिणीसवन, “प्रभुना प्रिय लोकसवन,” तुमनाबद्दल आम्हीन देवना उपकार कायम कराले पाहिजे; कारण पवित्र आत्माकडतीन व्हयेल पवित्रकरणमा अनं सत्यवरना ईश्वासमा देवनी तुमले पहिलेपाईन तारणकरता निवडेल शे; 14 त्यामा त्यानी तुमले आम्हीन सांगेल सुवार्ताघाई आपला प्रभु येशु ख्रिस्तना गौरवमा सहभागी व्हवाकरता बलायेल शे. 15 तर भाऊसवन अनी बहिणीसवन, स्थिर रहा, अनी संदेशतीन किंवा आमना पत्रसघाई ज्या विधी तुमले शिकाड्यात त्या धरीन ठेवा.
16 आपला प्रभु येशु ख्रिस्त हाऊ, अनी ज्यानी आपलावर प्रेम करीसन युगानुयुगनं सांत्वन दिधं अनं चांगली आशा कृपातीन दिधी, तो देव आपला पिता, 17 तुमना मननं सांत्वन करो, अनी प्रत्येक चांगलं करामा अनं बोलामा तुमले स्थिर करो.
2:1 १ थेस्सलनी ४:१५-१७ 2:9 मत्तय २४:२४