3
आमनाकरता प्रार्थना
भाऊ अनं बहिणीसवन, शेवट इतलंच सांगणं शे की, आमनाकरता प्रार्थना करा; याकरता की प्रभुना संदेशनी प्रगती फटकामा व्हवाले पाहिजे; जश तुमनामा तसं सर्वाकडे लोके त्याना आदरतीन स्विकार कराले पाहिजे. आम्हीन सैतानी अनी दुष्ट माणससपाईन सुटाले पाहिजे, कारण सर्वासले संदेशवर ईश्वास शे, अस नही.
प्रभु ईश्वासु शे, तो तुमले स्थिर करी, अनं सैतानपाईन सांभाळी. प्रभु आमले तुमनाबद्दल ईश्वास देस की, आम्हीन तुमले जे सांगतस ते तुम्हीन करतस अनं पुढे बी करशात.
प्रभुनी तुमना मनंसले देववरली प्रितीमा अनं ख्रिस्तना धीरघाई पाचारण कराले पाहिजे.
काम कराकरता नियम
भाऊसवन अनी बहिणीसवन, आम्हीन आपला प्रभु येशु ख्रिस्तना नावतीन तुमले आज्ञा करस की अव्यवस्थीतपणतीन वागणारा अनं आमनापाईन लेयल शिक्षणनामायक नही चालणारा प्रत्येक ईश्वासु भाऊसपाईन तुम्हीन दुर ऱ्हावाले पाहिजे. आमनं अनुकरण कोणता पध्दततीन कराले पाहिजे हाई तुमले स्वतःले माहित शे, जवय आम्हीन तुमनासंगे व्हतुत तवय आळशीनामायक वागणुत नही. अनी आम्हीन कोणं अन्न फुकट खादं नही; तुमनावर वझं पडाले नको म्हणीन आम्हीन श्रमतीन अनं कष्टतीन रातदिन काम करं. आमले तुमना कडतीन मांगाना अधिकार नही, अस नही, तर आमनं अनुकरण कराले आमले आमना कित्ता तुमले देवाले म्हणीन अस करं. 10 आम्हीन तुमनाजवळ व्हतुत तवय बी, कोणले काम करानी ईच्छा नव्हती तर त्यानी खावाले बी नको, अशी तुमले आज्ञा करी.
11 तरी तुमनामा कितला आळशीपणतीन वागणारा, काहीच कामधंदा नही करनारा अनं लुडबुड्या शेतस, अस ऐकतस. 12 असा लोकसले आम्हीन प्रभु येशु ख्रिस्तना नावतीन आज्ञा अनं बोध करतस की, त्यासनी ढंगतीन काम करीसन अन्न खावाणं.
13 भाऊसवन अनी बहिणीसवन, तुम्हीन तर चांगली कृती कराले थकु नका. 14 या पत्रमाधलं आमनं वचन जर कोणी मानस नही तर त्या माणुसवर नजर ठेवा अनी त्याले लाज वाटाले पाहिजे म्हणीन त्यानी संगत धरू नका, 15 तरी त्याले शत्रुमायक समजानं नही, तर त्याले ईश्वासु बंधु समजीन बोध करा.
शेवटली गोष्ट
16 शांतीना प्रभु हाऊ तुमले सर्वकाळ अनी सर्व प्रकारे शांती देवो, प्रभु तुमना सर्वासंगे ऱ्हावो.
17 मी पौलनी स्वतःना हाततीन लिखेल सलाम; हाई प्रत्येक पत्रले खुण शे, हाई मनी सही शे.
18 आपला प्रभु येशु ख्रिस्त यानी कृपा तुमना सर्वासंगे ऱ्हावो.