18
येशुले अटक करतस
(मत्तय २६:४७-५६; मार्क १४:४३-५०; लूक २२:४७-५३)
1 हाई प्रार्थना करानंतर येशु आपला शिष्यससंगे किद्रोन नालाना पलिकडली बाजुले गया, तठे एक बगीच्या व्हता, त्यामा तो अनं त्याना शिष्य गयात.
2 हाई जागा त्याले धरी देणारा यहुदा याले बी माहीत व्हती; कारण येशु आपला शिष्यससंगे तठे कायम जाये.
3 तवय यहुदा, रोमी सैनिकनी एक पलटणले, अनी मुख्य याजक अनं परूशी यासनी धाडेल मंदिरना रक्षकसले लिसन तठे कंदील, मशाली अनं हत्यारं लिसन बगिचामा वना.
4 येशुले आपलावर जे काही येणारं व्हतं ते सर्व माहीत व्हतं म्हणीसन तो समोर वना अनी त्यासले बोलना, “तुम्हीन कोणले शोधी राहीनात?”
5 त्यासनी त्याले उत्तर दिधं की, “नासरेथ गावाना येशुले,” येशु त्यासले बोलना, “मी तो शे” त्याले धरी देणारा यहुदा त्यासनासंगे उभा व्हता.
6 “तो मी शे” अस बोलताच त्या मांगे सरकीन खाल जमीनवर पडणात.
7 तवय त्यानी त्यासले परत ईचारं, “तुम्हीन कोणा शोध करतस?” त्या बोलनात, “नासरेथ गावाना येशुना.”
8 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “तो मी शे” अस मी तुमले पहिलेच सांगं, “माले शोधी राहीनात तर या बाकीनासले जाऊ द्या.”
9 “पिता, जे तु माले देयल शे त्यानामातीन एक बी मी दवडायेल नही,” अस जे वचन तो बोलना ते पुरं व्हवाले पाहिजे म्हणीसन हाई व्हयनं.
10 शिमोन पेत्रकडे तलवार व्हती, ती त्यानी काढीसन प्रमुख याजकना दासवर चालाडी अनी त्याना उजवा कान कापी टाका; त्या दासनं नाव मल्ख व्हतं.
11 येशु पेत्रले बोलना, “तलवार म्यानमा घाल; पितानी जो दुःखना प्याला माले देयल शे, तो मी पेवाना नही का?”
हन्ना समोर येशु
12 मंग रोमी पलटण, सेनानायक अनी यहूदीसना शिपाईसनी येशुले धरीन बांधं.
13 अनी पहिले त्याले हन्नाकडे लई गयात; कारण कैफा जो त्या वरीस प्रमुख याजक व्हता त्याना हाऊ सासरा व्हता.
14 एक माणुसनी लोकसकरता मरावं हाई हितनं शे असा ज्यानी यहूदीसले सल्ला दिधा, तोच हाऊ कैफा व्हता.
पेत्र येशुले नकारस
(मत्तय २६:६९,७०; मार्क १४:६६-६८; लूक २२:५५-५७)
15 शिमोन पेत्र अनी दुसरा एक शिष्य या येशुना मांगे गयात. तो शिष्य प्रमुख याजकना वळखना व्हता अनी तो येशुनासंगे प्रमुख याजकना घरना वाडामा गया.
16 पेत्र दारजोडे बाहेर उभा व्हता, यामुये जो दुसरा शिष्य प्रमुख याजकना वळखना व्हता त्यानी बाहेर ईसन अनं व्दारपालिकाले सांगिन पेत्रले मझार लई गया.
17 यावरतीन ती पोरं व्दारपालिका पेत्रले बोलनी, “तु बी त्या माणुसना शिष्यसमाधला शे का?” त्यानी सांगं “नही, मी नही.”
18 तवय थंडी व्हती म्हणीसन दासलोके अनी शिपाई कोळसाना ईस्तव चेटाडीसन शेकत उभा व्हतात; अनी त्यासनासंगे पेत्र बी उभा राहीसन शेकी राहिंता.
प्रमुख याजक येशुले प्रश्न ईचारस
(मत्तय २६:५९-६६; मार्क १४:५५-६४; लूक २२:६६-७१)
19 तवय प्रमुख याजकनी येशुले त्याना शिष्यबद्दल अनी त्यानी शिकवणबद्दल ईचारं.
20 येशुनी त्याले उत्तर दिधं, “मी सर्व लोकससंगे उघड बोलेल शे; जठे सभास्थानमा अनं मंदिरमा सर्व यहूदी एकत्र जमतस तठे मी नेहमी शिक्षण दिधं, गुप्त अस काहीच बोलनु नही,
21 माले का बरं ईचारस? मी काय बोलनु हाई ज्यासनी ऐकं त्यासले ईचार; मी जे बोलनु ते त्यासले माहीत शे.”
22 येशु असा बोलना म्हणीसन त्यानाजोडे जो शिपाई उभा व्हता त्यानी येशुले थापड मारीसन बोलना, “तुनी ईतली हिम्मत तु प्रमुख याजकले अस उत्तर देस का?”
23 येशुनी त्याले उत्तर दिधं, “मी वाईट बोलनु व्हई तर त्याबद्दल साक्ष दे, बराबर बोलनु व्हई तर माले का बरं मारी राहीना?”
24 तवय हन्नानी त्याले प्रमुख याजक कैफाकडे बांधेलच धाडं.
पेत्र येशुले परत नकारस
(मत्तय २६:७१-७५; मार्क १४:६९-७२; लूक २२:५८-६२)
25 शिमोन पेत्र शेकत उभा व्हता तठे ज्या उभा व्हतात त्या त्याले बोलनात, “तु बी त्याना शिष्यसमाधला शे का?” तो नकारीसन बोलना, “नही, मी नही.”
26 मंग ज्याना कान पेत्रनी कापा व्हता त्याना एक नातेवाईक प्रमुख याजकसना दाससपैकी एक व्हता तो त्याले बोलना, “मी त्यानासंगे तुले बागमा दखं नव्हतं का?”
27 पेत्रनी परत नकार; अनी तवयच कोंबडा कोकायना.
येशुले पिलात पुढे लई जातस
(मत्तय २७:१,२,११-१४; मार्क १५:१-५; लूक २३:१-५)
28 नंतर त्यासनी रामपारामा येशुले कैफाना घरतीन रोमी राजभवनमा लई गयात, पण यहूदी अधिकारी राजभवनमा गयात नही, कारण वल्हांडण सणनं जेवणकरता येवाले पाहिजे म्हणीसन त्या स्वतःले धार्मीक अनी शुध्द असा दखी राहींतात.
29 यामुये पिलात त्यासनाकडे बाहेर ईसन बोलना, “तुम्हीन या माणुसवर काय आरोप आनतस?”
30 त्यासनी त्याले उत्तर दिधं, “तो दोषी नही ऱ्हाता तर आम्हीन त्याले तुमना स्वाधिन करतु नही.”
31 पिलातनी त्यासले सांगं, “तुम्हीन त्याले लई जाईसन तुमना शास्त्रप्रमाणे त्याना न्याय करा.” यहूदी त्याले बोलनात, “कोणा जीव लेवाना आमले अधिकार नही.”
32 आपण कोणता मरणघाई मरावं शेतस हाई सांगतांना येशुनी जे वचन सांगेल व्हतं ते पुरं व्हावं म्हणीसन अस व्हयनं.
33 यामुये पिलात परत राजभवनमा गया, अनी येशुले बलाईसन बोलना, “तु यहूदीसना राजा शे का?”
34 येशुनी उत्तर दिधं, “तु स्वतःव्हईसन म्हणी राहीना की दुसरानी तुले मनाबद्दल सांगं?”
35 पिलातनी उत्तर दिधं, “मी यहूदी शे का? तुनाच लोकसनी अनी मुख्य याजकसनी तुले मना स्वाधीन करं; तु असं काय करं?”
36 येशुनी उत्तर दिधं, “मनं राज्य या जगनं नही; मनं राज्य या जगनं ऱ्हातं तर मी यहूदी अधिकारीसना स्वाधीन व्हवाले नको म्हणीसन मना अनुयायी लढाई करतात, पण मनं राज्य आठलं नही.”
37 यावरतीन पिलात त्याले बोलना, “तर तु राजा शे का?” येशुनी उत्तर दिधं, “मी राजा शे अस तुच म्हणस, मी यानाकरता जन्मेल शे अनी यानाकरता जगमा येल शे की सत्यबद्दल साक्ष देवाले पाहिजे, जो कोणी सत्यना शे तो मनी वाणी ऐकस.”
38 पिलात त्याले बोलना, “सत्य काय शे?” अस बोलीन परत तो यहूदीसकडे बाहेर गया अनी बोलना, त्यानामा माले काहीच अपराध दखाई नही राहीना.
येशुले मरणदंडनी शिक्षा देतस
(मत्तय २७:१५-३१; मार्क १५:६-२०; लूक २३:१३-२५)
39 पण वल्हांडणमा मी तुमनाकरता एक माणुले सोडानं अशी तुमनी रित शे; म्हणीसन मी तुमनाकरता यहूदीसना राजाले सोडानं अशी तुमनी ईच्छा शे का?
40 तवय त्या परत वरडीन बोलनात, “नही, याले नको, तर आमनाकरता बरब्बाले सोडा,” बरब्बा हाऊ एक लुटारू व्हता.