10
अमोरीसवर विजय
यहोशवानी आय नगर लिसन त्यासना बठा नाश करी टाक; अनी जशे त्यानी यरीहोन अनी त्याना राजानं करं तशेच आय नगरनं अनी त्याना राजानं करं, अनी गिबोनना रहीवाशी इस्त्राएल लोकसनासंगे सल्ला करीसनं त्यासमां जाईसनं राहीनात; हाई बठं यरुशेलमना राजा अदोनीसदेक यानी ऐकं; तवय त्यासले भ्याव वाटनं; कारण गिबोन हाई मोठं नगर व्हतं अनी राजधानी व्हतं अनी ते आय नगरपेक्षा मोठ शे अनी तठेना लोके बलाढय व्हतात. तवय यरुशेलमना राजा अदोनीसदेक यानी हेब्रोनना राजा होहाम, यर्मुथना राजा पिराम, लाखीशना राजा याफीय अनी एग्लोनना राजा दबीर यासले निरोप धाडा की, मनाकडे ईसन माले कुमक करा, आपण गिबोन नगरले मार दिसुत; कारण त्यानी यहोशवानीसंगे अनी इस्त्राएल लोकसनासंगे सल्ला करेल शे. तवय यरुशेलम, हेब्रोन, यर्मुथ, लाखीश अनी एग्लोन आठेना पाच अमोरी राजासनी आपली सेना जमा करीसनं चढाई करी अनी गिबोननामोरे तळ दिसनं त्या त्यासनासंगे लढाले लागनात. तवय गिबोनना रहीवासीसनी गिलगालनना छावनीमां यहोशवाले सांगी धाडं की, “आपला दासासवरतीन आपला हात मांगे लेऊ नको; लवकर आमनाकडे यिसनं आमले वाचाडं; कारण डोंगरकडतीन बठा अमोरी राजा एकजागे व्हयीसनं आमनावर येयल शेतस!”
तवय यहोशवा त्याना योध्दे अनी बठा शुरवीर यासले संगे लिसनं गिलगाल आठे निघना. परमेश्वर यहोशवाले बोलना, “त्यासनी भीती धरु नको; मी त्यासले तुना हातमां देयेल शे; त्यासमाधला एकबी माणुस तुनामोरे टिकाऊत नही.” यहोशवा त्यासनावर एकाएकी चाल करीसनं ऊना; तो रातमास गिलगालकडे कुच करीसन गया. 10 परमेश्वरनी इस्त्राएलनासमोर त्यासनी गाळण करी अनी त्यासनी गिबोनपान त्यासनी कत्तल उडाईसनं बेथ-हारोनना घाटमां त्यासना पाठलाग करा अनी अजेक अनी मक्केदा आठेपावोत त्या त्यासले मारत गयात. 11 त्या इस्त्राएलना समोरतीन पळीसनं बेथ-हारोनना उतरतीपान येवावर अजेकले जातस तोपावोत परमेश्वरनी आकाशमाईन मोठया गारा‍ त्यासनावर पाडीसन त्यासले ठार करं; इस्त्राएल लोकेसनी तलवारघाई मारं, त्यापेक्षा जास्त गारासघाई मरनात;
12 परमेश्वरनी अमोरी लोकेसले इस्त्राएल लोकेसना हातमां दिद् तवय यहोशवा परमेश्वरपान बोलना, इस्त्राएलनासमोर तो अस बोलना, “हे सुर्या, तु गिबोनवार स्थिर व्हय; हे चंद्रा तु अयालोनना खोरावर स्थिर व्हय.”
13 तवय सुर्य स्थिर व्हयना अनी चंद्र थांबना, त्या राष्ट्रनी आपला शत्रुना बठा उसना फेडस तोपावोत त्या थांबनात. याशार नावना ग्रंथमां हाई कथा लिखेल शे ना? सुर्य आकाशमंडयमां थांबना अनी जवयजवय चार प्रहर गया नही. 14 असा दिन याना पहिले ऊना नही अनी यानामोरे येवाऊ नही; परमेश्वरनी मानवना शब्द ऐका; परमेश्वर इस्त्राएलकरता लढना.
15 मंग यहोशवा बठा इस्त्राएलनासंगे गिलगालना छावनीकडे परत गया.
यहोशवा पाच राजासले धरसं
16 त्या पाच राजा पळीसनं मक्केदानाजोडे एक गुहामां दपी बसनात. 17 त्या पाच राजा मक्केदा आठे गुहामां दपेल शेतस अस कोणी यहोशवाले कळाडं. 18 तवय यहोशवानी सांग की, “गुहानां तोंडपान मोठमोठा दगड ढकला अनी तिनावर माणसासना पहारा ठेवा. 19 पण तुम्हीन थांबानं नही, आपला शत्रुना पाठलाग करीसनं त्यासनामांगेना लोकसले मारी टाका, त्यासले त्यासना नगरमां जाऊ देवानं नही; कारण तुमना देव यहोवा यानी त्यासले तुमनां हातमां देयेल शे.” 20 यहोशवा अनी इस्त्राएल लोक यासनी त्यासनी मोठी कत्तल करीसनं त्यासना संहार करानं काम आपटी लिधं; त्यासमाधला काही माणसे वाचीसनं तटबंदीना नगरमां गयात, 21 तवय बठा लोक मक्केदाना छावनीमां यहोशवाकडे सुखरुप ऊनात; इस्त्राएलना विरोधमां कोणीच शब्द बी काढा नही.
22 तवय यहोशवानी आज्ञा करी की, “गुहानं तोंड उघाडीसनं त्या पाच राजासले मनाकडे लयी या.” 23 त्यासनी तसं करं अनी यरुशेलम, हेब्रोन, यर्मुथ, लाखीश अनी एग्लोन आठेना पाच राजासले गुहामाईन काढीसन त्यानामोरे आणं. 24 त्यासनी त्या राजासले यहोशवाकडे लई ऊनात तवय बठा इस्त्राएल लोकेसले बलाईसनं तो आपलासंगे योध्द्यांसना नायकसले बोलना, “जोडे ईसन तुमना पाय या राजासना मानवर ठेवा.” त्यासनी जोडे ईसनं त्यासना मानवर पाय ठेवं. 25 यहोशवा त्यासले बोलना, “भ्याऊ नका, धीर धरा; कारण ज्यासनासंगे तुम्हीन लढशात त्या तुमना बठा शत्रुसनं परमेश्वर असच कराव शे.” 26 मंग यहोशवानी त्या राजासले ठार मारीसनं पाच झाडसवर टांगं; अनी त्या संध्याकायपावोत त्या झाडासवर लटकी राहीनात. 27 सुर्य मावयाना येळले यहोशवानी आज्ञावरतीन लोकेसनी त्यासले त्या झाडसवरतीन उतारं, अनी ज्या गुहामां त्या दपेल व्हतात तठे त्यासले टाकं, अनी त्या गुहाना तोंडले त्यासनी मोठमोठा दगड लोटी दिद्; आजपावोत त्या तशेच शेतस.
यहोशवानी अमोरी प्रदेशवर कबजा करा
28 त्या रोज यहोशवानी मक्केदा लिसनं तलवारघाई त्यासना बठाच संहार करं, त्याना राजालेबी मारी टाकं अनी जेवढा जनावर तठे व्हतात त्यासमाईन कोणलेच जीवत राहू दिद् नही; त्यानी यरीहोना राजानं जशे करं तशेच मक्केद्ना राजानं करं. 29 मंग मक्केदामाईन निघीसनं बठा इस्त्राएलसले संगे लिसनं यहोशवा लिब्ना आठे गया अनी त्यासनासंगे लढना; 30 परमेश्वरनी ते नगर अनी त्याना राजा यासले इस्त्राएलना हातमां दिध अनी यहोशवानी त्याना अनी त्या नगरमाधला बठा जनावरसना तलवारघाई संहार करं; त्यामाधला काहीच जीवत राहू दिध नही; यरीहोना राजानं जशे त्यानी करं तशेच त्यानी आठेना राजानं करं.
31 मंग लिब्ना सोडीसनं बठा इस्त्राएलनासंगे यहोशवा लाखीश नगर आठे गया अनी त्यासनामोरे तठ दिसनं त्यासनासंगे लढना; 32 परमेश्वरनी लाखीश नगरले इस्त्राएलना हातमां दिधं अनी त्यासनी ते दुसरा रोज लिधं; लिब्ना आठेना बठा जनावरासना त्यानी तलवारघाई संहार करा व्हता तसच लाखीश नगर आठे बी करं. 33 तवय गेजेरना राजा होराम हाऊ लाखीशला कुमक कराकरता चाली ऊना; तवय यहोशवानी त्याना अनी त्याना लोकसना एवढा संहार करा की, त्यासमाधला कोणले बी जीवत राहू दिध नही.
34 मंग लाखीश सोडीसनं यहोशवा बठा इस्त्राएलनासंगे एग्लोन आठे गया; त्यासनामोरे तळ दिसनं त्यासनासंगे लढनात; 35 त्याच रोज त्यासनी ते नगर लिद् अनी त्याना तलवारघाई संहार करं; लाखीश नगरमां जस बठा जिवसना संहार करं व्हतं तशेच त्यानी त्या रोज एग्लोनं नगरनं बी करं.
36 मंग एग्लोन सोडीसनं बठा इस्त्राएलनासंगे यहोशवा हेब्रोन नगरले गया; अनी त्या त्यासनासंगे लढनात; 37 त्यासनी ते नगर लिद् अनी त्या, त्याना राजा, त्याना बठा नगर अनी त्यामाधला बठा जनावर यासना तलवारघाई संहार करं; यहोशवानी एग्लोनना मायकच हेब्रोनमां कोणलेच जीवत राहू दिद् नही; त्यानी त्यासना अनी तठेना बठा जनावरासले संहार करं.
38 मंग यहोशवा बठा इस्त्राएलनासंगे मांगे वळीसनं दबीरा नगरले गया अनी त्यासनासंगे लढना; 39 तठेना राजा अनी त्याना बठा नगर त्यानी हस्तगत करीसनं त्यासना तलवारघाई संहार करं; तठे जेवढा जनावर व्हतात त्यासना त्यानी संहार करं, कोणलेच जीवत राहू दिद नही; हेब्रोनना अनी लिब्ना अनी त्यासना राजा यासना जशे त्यानी करं तशेच दबीर अनी त्याना राजा यासनं बी करं. 40 असं यहोशवानी त्या बठा देशना म्हणजे पहाडी परदेश, दक्षिण देश, तळवट अनी उतरण हाई बठा प्रांत अनी त्यासना राजासना धुव्वा उडावा, कोणलेच जीवत राहू दिद् नही; इस्त्राएलना देव यहोवा याना आज्ञाप्रमाणे बठा जनावरासना त्यानी संहार करं. 41 यहोशवानी कादेश-बर्ण्यापाईन गज्जापावोत मुलूख अनी गिबोनपावोत बठा गोशेन प्रांत यासना धुव्वा उडावं. 42 हया बठा राजा अनी त्यासना देश यहोशवानी एकच येळमां लिधात; कारण इस्त्राएलना देव यहोवा इस्त्राएलकडतीन लढना. 43 मंग यहोशवा बठा इस्त्राएलनासंगे गिलगालनी छावनीमां परत गयात.
10:13 निर्गम 10:13; २ शमुवेल 1:18