16
एफ्राईम अनी मनश्शेना वंशले देयल भाग
1 योसेफनं वंशनं जे भाग चिठया टाकीसनं ठरायेल व्हतं ते हाई शे: त्यानी सीमा यरीहोनाजवय यार्देन नदीपाईन पुर्वतीन यरीहोना जलसंचयपान जाईसनं जंगलमां पहाडी प्रदेशमाईन बेथेलले जासं;
2 तठेतीन ती लूज आठे जाईसनं अर्कीना सीमापाईन अटारोथ आठे जास;
3 पश्चिमले यफलेटी यासन्या सरहद्दपाईन खालनं बेथ-हारोन अनी गेजेर आठे उतरीसनं समुद्रनी सीमापान जासं.
4 योसेफना पोर्या मनश्शे अनी एफ्राईम यासनी आपआपलं वतन लिधं.
एफ्राईमना भाग
5 एफ्राईम वंशाची सरहद्द ज्यान्या त्यान्या कुयप्रमाणे ठरनी ती आशी; त्यासन्या वतनना सरहद्दले पुर्वेले सुरुवात व्हयीसनं अटारोथ अद्दार आठेतीन वरनी बेथ-हारोनले जासं;
6 उत्तर सीमा पश्चिमले मिखमथाथ आठे सुरु व्हयीसनं पुर्वले वळसा लिसनं तानथशिलो आठे जासं अनी तठेतीन मोरे निघीसनं यानोहा आठेपावत जासं;
7 अनी यानोहा आठेतीन ती आटारोथ अनी नारा आठे उतरीसनं यरीहोपान यार्देनपान निंघस.
8 हाई सीमा तप्पुहा आठेतीन निघीसनं पश्चिम दिशाले जाईसनं काना नालावरतीन समुद्रपान जासं; एफ्राईमना वंशसनं त्यासना कुयप्रमाणे वतन हाई शे:
9 तशेच मनश्शेना वंशसना वतनमाईन नगरे आस-पासना खेडापाडासनीसंगे एफ्राईमना वंशकरता येगळी करीसनं ठेवामां वनात.
10 गेजेरमां ज्या कनानी लोके राहात व्हतात त्यासले एफ्राईमनी घालाडं नही म्हणीसनं त्या कनानी त्यासमां आजपावोत वस्ती करी राहीना शेतस; त्या दास व्हयीसनं बिगारकाम करनारा व्हयनात.