17
पक्षिममा मनश्शेना भाग
योसेफना वडील पोर्‍या मनश्शे याना वंशना भाग चिठया टाकीसनं ठरावं ते हाई शे: माखीर हाऊ वडील पोर्‍या गिलादना बाप व्हतां, हाऊ मोठा योध्दा व्हता म्हणीसनं त्याले गिलाद अनी बाशान हाई प्रांत भेटनं. मनश्शेना बाकीना वंशसले त्यासना कुळ‍प्रमाणे जो भाग भेटना तो अशा; अबिजेयेर, हेलेक, अस्रियेल, शेखेम, हेफेर अनी शमीदा हया आपआपला कुळप्रमाणे योसेफना पोर्‍या मनश्शे याना वंशमाधला ज्या माणसे व्हतात, त्यासन्या येगयेगळ्या कुळप्रमाणे ह्या विभाग ठरनात; पण सलाफहाद बिन हेफेर बिन गिला बिन माखीर बिन मनश्शे याले पोर्‍यासोरे नही व्हतात. पोरी व्हत्यात, त्या पोरीसना नाव महला, नोआ, हाग्ला, मिल्का अनी तिरसा ह्या व्हत्यात. एलाजार याजक, नूनाना पोर्‍या यहोशवा अनी सरदार मंडयी यासनामोरे या पोरी यिसनं बोलन्यात, परमेश्वरनी मोशेले आज्ञा देयेल व्हती त्याप्रमाणे आमले आमना भाऊबंदासमां वतन दया; तवय यहोशवानी परमेश्वरनी आज्ञाप्रमाणे त्यासले त्यासना बापना भाऊबंदसनीसंगे वतन दिध. असा प्रकारे यार्देनना तिकडे गिलाद अनी बाशान या प्रांतासनासंगे मनश्शेले दहा भाग भेटनात; कारण मनश्शेना वंशमासल्या बायासले त्यासन्या पुत्रसंततीनासंगे वतन भाग भेटनं अनी मनश्शेना वंशना बाकिना बी लोकसले गिलाद प्रांत भेटना.
मनश्शेनी सीमा आशेरपाईन शखेमासमोरनी मिखमथाथापावोत जास; अनी मोरे ती उजवी बाजुले एन-तप्पुहाना लोकवस्तीपावोत जाईसनं भिडसं. तप्पुहाना प्रांत मनश्शना व्हता; पण मनश्शेना सीमापान तप्पुहा नगर हाई एफ्राईमनं व्हतं. तठेतीन ती सीमा काना नालापावत उरतरीसनं त्याना दक्षिणले भिडसं; तठेतीन मनश्शेना प्रांतमां काही नगर एफ्राईमना व्हतात; आजून मनश्शानी सीमा त्या ओहळना उत्तरले जाईसनं समुद्रपावोत जासं; 10 दक्षिणकडला परदेश एफ्राईमना अनी उत्तरकडला मनश्शाना, त्यानी सीमा समुद्र शे; त्याना उत्तर सीमाले आशेर अनी पुर्वले इस्साखार शे. 11 इस्साखार अनी आशेर यासना प्रांतमां मनश्शेना गाव व्हतं ते अस: बेथ-शान अनी त्याना खेडापाडा, इब्लाम अनी त्याना खेडापाडा; दोर आठेनी लोकवस्ती अनी त्याना खेडापाडा; एन-दोरनी लोकवस्ती अनी त्याना खेडापाडा; तानख आठेनी लोकवस्ती अनी त्यानी खेडीपाडी; मगिद्दो अनी त्यानी खेडीपाडी अनी त्यासन्या रहीवाशासनीसंगे तीन टेकडया; 12 पण हाई नगरना रहीवाशासले मनश्शना वंशसले घालाडाता ऊनं नही; त्या देशमांस राहावानं हट्ट कनान्यासनी धरं. 13 इस्त्राएल लोके समर्थ व्हयनात तवय त्यासनी त्या कनानी लोकेसले बिगारकाम कराले लावं, बठासले हाकलं नही.
एफ्राईम अनी मनश्शे पश्चिमकडली जास्त जमीन मागतसं
14 योसेफ वंशसनी यहोशवाले बोलनात, परमेश्वरना आमनावर आजपावोत प्रसाद राहावामुये आम्हीन संख्यातीन बराच शेतस तर तु चिठी टाकीसनं आमले वतनना एकच भाग का बर दिध?
15 यहोशवा त्यासले बोलना, तुम्हीन संख्यातीन बराच शेतस अनी एफ्राईमना डोंगराळ परदेश तुमले पुरस नही तर परिज्जी अनी रेफाई यासना देशमाधला जंगल तोडीसनं तठे वस्ती करा.
16 तवय योसेफना वंश बोलनात, हाई डोंगराळ परदेश आमले पुरस नही; बेथ-शान अनी त्याना आसपासना खेडापाडा अनी इज्रेल खोरं, या तलप्रांतमां राहानारा कनानी लोकेसपान लोखंडी रथ शेतस.
17 यहोशवानी योसेफना वंशसले म्हणजे एफ्राईम अनी मनश्शे यासले सांग, तुम्हीन संख्यातीन बराच शेतस अनी तुमना सामर्थ्यबी मोठ शे; तुमले फक्त एकच विभाग भेटी अस नही. 18 तर तो पहाडी देश तुमना‍ व्हयी; तठे जंगल शे ते तोडा म्हणजे त्याना आसपासना देश तुमना व्हयी. कनानी लोकेसपान लोखंडी रथ व्हतीन अनी त्या बलिष्ट व्हतीन तरीबी तुमले त्यासले घालाडाता येई.
17:4 गणना 27:1-7 17:12 शास्ते 1:27-28