18
उरेल जागानी वाटनी
मंग इस्त्राएलनी बठी मंडयी शिलो आठे एकजागे व्हयनी अनी तठे‍ त्यासनी देवनं दर्शनमंडप उभं करं; आते बठा देश त्यासना हातमां येयल व्हतं. इस्त्राएल लोकेसमाईन ज्यासले वतनभाग भेटनं नही अस सात वंश राहेल व्हतात. यहोशवा इस्त्राएल लोकेसले बोलना, “तुमना पुर्वजना देव यहोवा यानी तुमले जो देश दिध तो आपला ताबामां लेवानाबारामां तुम्हीन कोठपावोत येळ लावशात? परतेक वंशमाधला तीन माणसे नेमा म्हणजे मी‍य त्यासले धाडंस; त्यासनी जाईसनं चारीमेर फिरीसनं देश दखानं, अनी आप आपला वंशासले मिळानं वतनभागना वर्णन लिखीसनं मनाकडे लयी येवानं. त्यासनी उरेल देशना सात भाग रेखाटानं; यहुदानी दक्षिणकडला आपला नेमेल वतनभागमां वस्ती करानी अनी योसेफना वंशसनी उत्तरले आपला वतनभागमां वस्ती करानी. त्या देशना सात भागनी माहीती काढीसन ते वर्णन मनाकडे लयी येवानं म्हणजे मी आठे आपला देव यहोवा यानामोरे तुमना नावसनी चिठी टाकसू. लेवीसले तर तुमनामां वतनभाग नही; परमेश्वरनी त्यासले देयेल याजकवृत्ती हाईच त्यासना वतन शे; गाद, रऊबेन अनी मनश्शेना आर्धा वंश यासले यार्देनना पुर्वले वतन भेटी चुकेल शे; परमेश्वरना सेवक मोशे यानी त्यासले ते देयेल शे.”
मंग त्या माणसे मार्गस्थ व्हयनात; तवय त्या देशना वर्णन लिखाले ज्या जाणार व्हतात त्यासले यहोशवानि आज्ञा दिधी की, “जा अनी इकडे तिकडे फिरा अनी त्याना वर्णन लिखीसनं मनाकडे लयी या अनी म्हणजे मी शिलो आठे परमेश्वरनामोरे तुमन्या नावन्या चिठया टाकसू.” तवय त्या माणसे तठेतीन निघीसनं देशभर फिरनात अनी तठेना नगरप्रमाणे त्यासन्या सात वाटयासन्या वर्णन त्यासनी वहीमां लिखीसनं त्या बठा शिलो आठे छावनीमां यहोशवाकडे लयात. 10 शिलो आठे परमेश्वरनामोरे यहोशवानी त्यासन्या नावन्या चिठया टाक्यात; त्या ठिकाणले यहोशवानी इस्त्राएल लोकेसले‍ ज्याना त्याना वतनप्रमाणे जमीन वाटी दिधी.
बन्यामीन वंशले देयल भाग
11 बन्यामिनना वंशले त्यासना कुयप्रमाणे चिठी टाकीसनं जो वाटा भेटना तो आशा: त्याना वाटा यहुदाना वंश अनी योसेफना वंश यासना प्रांतले लागीसनं व्हता. 12 त्यासनी उत्तर सीमा यार्देननाजोडे सुरु व्हसं व्हयीसनं यरीहोना उत्तरकडतीन वर जाईसनं पश्चिमले डोंगरवरतीन बेथ-आवेनना जंगलमां निघसं; 13 तठेतीन ती लूज ऊर्फ बेथेल आठे येस अनी लूजन दक्षिण बाजुतीन निघीसनं खालना बेथ-हारोनना दक्षिणले पहाडपाईन अटारोथ-अदार आठे निघस. 14 तठेतीन पश्मिम सीमाले वळसा घालीसनं बेथ-हारोनना मोरेतीन त्याना दक्षिणकडला पहाडवरतीन यहुदा नगर किर्याथ-बाल ऊर्फ किर्याथ-यारीम आठे निंघसं; यानी पश्चिम सीमा हाईच शे. 15 दक्षिणनी सीमा पश्चिमले सुरु व्हईसन किर्याथ-यारीमना वरन टोकपाईन निंघीसनं नफ्तोह झरापान जासं. 16 तठेतीन हिन्नोमपुत्रसना खिंडनासमोरतीन अनी रेफाई खिंडना उत्तरले जो पहाड शे त्याना उत्तर टोकपाईन हिन्नोम खिंडमां म्हणजे यबूसीना दक्षिण बाजुतीन ती सीमा एनरोगेलासले आठे उतरसं. 17 तठेतीन ती सीमा उत्तरले वळसा लिसनं एन-शेमेश आठे निंघसं अनी तशीच अदुम्मीम चढावनामोरे जे गलीलोथ शे तिकडे जासं; तठेतीन ती रऊबेनपुत्र बोहन याना खडककडे जास. 18 मंग ती उत्तरले जाईसनं मैदाननामोरे यार्देनना घाटमा उतरसं. 19 तठेतीन ती सीमा बेथ-हाग्लाना उत्तर दिशाले जाईसनं क्षारसमुद्रना उत्तरनी घाटपान यार्देनना दक्षिण मुखपान निंघसं; हाई दक्षिण सीमा शे. 20 त्यानी पुर्व सीमा यार्देन शे. बन्यामिनना वतनभाग त्यानी चतु:सीमासहीत त्याना कुयप्रमाणे हाई शे.
21 बन्यामिन वंशना लोकेसले त्यानसा त्यासना कुयप्रमाणे हया नगर भेटनात; यरीहो, बेथ-हाग्लाना, एमेकक-केसास, 22 बेथ-अराबा, समाराईस, बेथेल, 23 अव्वीम, पारा, अफ्रा, 24 कफर अम्मोनी, अफनी, अनी गेबा; हया बारा नगर अनी त्यासना आसपासना गाव; 25 गिबोन, रामा, अनी बैरोथ; 26 मिस्पा, कफीरा अनी मोजा; 27 रेकेम, इपैल अनी तरला; 28 सेला, एलेफ, यबुशी ऊर्फ यरुशेलम, गिबाथ अनी किर्याथ; हया चौदा नगर अनी त्यासना आसपासना गाव; बन्यामिनना वंशना त्यासना त्यासना कुयप्रमाणे हाई वतन शे.