2
यरीहो नगरमा यहोशवा गुप्त हेरसले धाडस
1 नूनाना पोर्या यहोशवा यानी लपाडीन दोन हेर शिट्टीमा आठेतीन धाडं; त्यानी त्यासले सांग, “जा अनी तो देश अनी विशेषतः यरीहो हाई दखी या.” त्या गयात अनी रहाब नावनी वेशाना घरमा उतरनात.
2 मंग कोणीतरी यरीहोना राजाले सांग की आज रातले काही इस्त्राएल लोक आमना देशमा भेद काढाले आठे येल शेतस.
3 तवय यरीहोना राजानी रहाबले सांगीसन धाडं की ज्या माणसे तुनाकडे ईसन तुनी घर उतरेल शेतस त्यासले बाहेर काढ; कारण बठा देशना भेद काढाले त्या येयल शेतस.
4 “त्या दोनी माणससले लपाडीसन ती बाई बोलनी, मनाकडे ज्या कोणीतरी माणसे येल व्हतात हाई खरं शे, पण त्या कथाना शेतस हाई माले माहीत नही.
5 आंधार पडावर वेस लाईसन लेवाना येळले त्या निंघी गयात; त्या कोठे गयात ते माले माहीत नही; तुम्हीन लवकर त्यासना पिछा करा म्हणजे त्यासले सापडावशात.”
6 पण तिनी त्या माणससले धाबावर लिसनं तठे जवसना ताटे पसारेल व्हतात त्यामा दपाडी ठेयेल व्हतं.
7 त्या माणसे त्यासना शोध करत यार्देनना वाट वरतीन उतारपावोत गयात; त्यासना पिछा करनारा गावना बाहेर जातस वेस बंद करामा ऊनी.
8 इकडे त्या हेर झोपाना पहिले ती बाई त्यासनाकडे धाबावर गयी.
9 अनी त्यासले बोलनी “परमेश्वरनी हाऊ देश तुमले देयेल शे; आमना देश मधला सर्वा रहिवाशी तुमना भीतीतीन गाळण उडेल शे, हाई माले माहीत शे;
10 कारण तुम्हीन मिसर देशमाईन निंघनात तवय तुमनासमोर परमेश्वरनी तांबडा समुद्रनं पाणी आटाडं अनी यार्देनना तिकडे राहणारा अमोर्यासना दोन राजा सीहोन अनं ओग यासना तुम्हीन संहार करा हाई आमना कानवर येल शे.
11 हाय ऐकीसन आमना मनन पाणी पाणी व्हयनं, तुमनामुये कोणाच जीवमां जीव राहीना नही; कारण तुमना देव यहोवा हाऊ वर आकाशमां अनी खाल पृथ्वीवर देव शे.
12 मी तुमनावर दया करेल शे, याकरता आते मनासंगे परमेश्वरनी नावतीन आणभाक करानं की आम्हीन तुमना बापना घरानावर दया करसू; अनी याकरता माले खात्रीलायक खूण दे;
13 अनी आम्हीन तुना मायबाप, भाऊबहीन अनी तुमना बठासना बचाव करसू अनी तुमना बठासना जीव मृत्युपाईन वाचाडसूत आशी मनासंगे आणभाक करानं!”
14 तवय त्या माणससनी तिले सांग, “तुम्हीन कोणी बी आपली गोष्ट फोडी नही तर तुमना जीवकरता आम्हीन आमना जीव दिसुत; अनी परमेश्वर आमले हाई दी तवय आम्हीन तुनासंगे दयातीन अनी खरा मनतीन वागसुत.”
15 तवय राहाबनी त्यासले खिडकीमाईन दोरघाई गावनाबाहेर उतारं; कारण तिनं घर गावकुसनी भितले लागीसनं व्हतं; तठे ती राहे.
16 तिनी त्यासले सांग की, “तुमना पाठलाग करनारासनी तुमले गाठाले नही पाहीजे म्हणीसनं त्या डोंगरपान तठे तीन दिन दपी बठा; तेवढा येळमां तुमना पाठलाग करनारा परत येतीन; मंग तुम्हीन जावानं.”
17 त्या माणसे तिले बोलनात; “तु आमनाकडतीन जी आणभाक करेल शे तिना बारामां आमले दोष नही लागाले पाहिजे.
18 दख, आम्हीन हाऊ देशमां इसुत तवय जी खिडकीमाईन तु आमले उतारं तिले हाऊ लाल धागा बांध; अनी तुना हाई घरमां आपला मायबाप, भाऊबंद अनी आपला पितृकुळमाधला बाकीना बठासले एकजागे कर.
19 त्या येळले कोनी तुना घरना दारनाबाहेर रस्तावर गया ते त्याना रक्तपातना दोष त्याना माथे राही; आमनाकडे त्याना दोष येवाऊ नही; घरमां तुनासंगे ज्या राहातीन त्यासनावर कोणा हात पडना तर त्यासना रक्तपातना दोष त्यासना माथाले.
20 जर का हाई गोष्ट तु कोठे बाहेर फोडी तर आमनासंगे जी आणभाक तु करेल शे, तीमातीन आम्हीन मुक्त व्हई जासुत.”
21 ती बोलनी, “तुम्हीन सांगेल प्रमाणेच व्हई; तिनी त्यासले निरोप देवानंतर त्या मार्गस्थ व्हयनात; नंतर तिनी लाल रंगना धागा आपली खिडकीले बांधा.”
22 त्या जाईसनं डोंगरवर वनात; अनी त्यासना पाठलाग करनारा परत जातसं तोपावोत तठे तीन दिन राहीनात; त्यासना पाठलाग करनारासनी, वाटमां चारीमेर शोध करा; पण त्या त्यासले सापडनात नही.
23 मंग त्या दोनी माणसे डोंगर उतरीसनं नुनाना पोर्या यहोशवा यानाकडे परत गयात अनी आपलं बठं वर्तमान त्यासनी त्याले सांग.
24 त्या यहोशवाले बोलनात, हाऊ बठा देश परमेश्वरनी आपला हातमां खरच देयल शे; अनी हावु देशना बठा रहीवासी आपलामुये घाबरी जायेल शेतस.