3
इस्त्राएल लोकसनी यार्देन नदी पार करी
यहोशवा पहाटले ऊठना अनी बठा इस्त्राएलसले शिट्टीमाईन कुच करीसनं यार्देननी काठले ऊना; ती उतरीसनं जावाना पहिले तठे त्यानी मुक्काम करा. तीन दिन नंतर पूढारीसनी छावनीमां फिरीसनं लोकसले अशी आज्ञा करी की, “तुमना देव यहोवा याना करारना कोश लेवी याजक उचलीसनं लयी जातांना दखशात तवय तळ हालाईसनं त्यानामांगे जावा; पण कोशमां अनी तुमनामां जवयपास दोन हजार हात मोजीसनं आतर ठेवानं; त्याना जास्त जवय जावानं नही, म्हणजे जी वाटतीन तुमले जावानं शे ती तुमले दखायी; कारण आजुनपावोत हाई वाटघाई तुम्हीन कवयच जायेल नही शे. मंग यहोशवानी लोकेसले सांग की शुध्द व्हा, कारण सकाय परमेश्वर तुमनामां अद्भुत कृत्य करणार शे. मंग यहोशवानी याजकसले सांग की करारनं कोश उचलीसनं लिसन लोकेसनीमोरे चाला त्याप्रमाणे त्या तो लिसन लोकेसनामोरे चालनात. परमेश्वर यहोशवाले बोलना, आज मी बठा इस्त्राएल लोकेसनासमोर तुनी थोरवी वाढावानी सुरुवात करस; म्हणजे मी जशे मोशेनीसंगे व्हतु तशे तुनासंगेबी शे हाई तुले कळी. करारना कोश वाहनारा याजक यासले आशी आज्ञा करी की जवय तुम्हीन यार्देनना पाणीना काठले जाशात तवय यार्देनमां उभं ऱ्हावानं.”
मंग यहोशवानी इस्त्राएल लोकेसले सांग, जोडे ईसनं परमेश्वर तुमना देव यानं म्हणनं ऐका. 10 यहोशवा बोलना, जिवत देव तुमनामां शे, अनी कनान, हित्ती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी अनी यबुसी यासले तो तुमनासमोर हाकली दी हाई यानावरतीन समजमा ई. 11 बठी पृथ्वीना जो प्रभु त्याना करारना कोश तुमनासमोर यार्देनमां परवेश करी राहीना शे. 12 तर आते इस्त्राएल वंशमाईन बारा माणसे निवाडानं, परतेक वंशमाईन एक एक. 13 बठी पृथ्वीना जो प्रभु परमेश्वर याना करारना कोश वाहनारा याजकना पाय यार्देनना पाणीले लागताच वरतीन वाहत येनारा यार्देनना पाणी थांबी जमी अनी त्यानी रास व्हयी. 14 बठा माणसे यार्देननातिकडे जावाकरता आपला डेरामाईन निघनात तवय करारना कोश वाहनारा याजक लोकेसनामोरे चालनात. 15 करारना कोश वाहनारा यार्देनपान यिसनं पोहचनात अनी त्यासना पाय काठना पाणीमां बुडनात (सुगीना दिवसमां यार्देन नदी दुथडी वाहास राहास) 16 तवय जे पाणी वरतीन वाहीसनं येत व्हतं ते बराच अंतरवार म्हणजे सारतान नगरजोडे आदाम नगरपान एकजागे व्हयीसनं चढनात अनी त्यासनी रास व्हयनी, अनी जे पाणी अरबना समुद्रमां म्हणजे क्षार समुद्र यानाकडे वाहात जात व्हतं ते सरकनं; अनी त्या बठा लोक यरीहोनामोरे उतरीसनं पार गयात. 17 परमेश्वरना करारना कोश वाहनारा याजक यार्देनना मजारमां कोयडी जमीनवार उभा राहीनात; अनी बठा इस्त्राएल लोक कोयडी जमीनवरतीन निघी गयात; हाई परकारं झाडीसनं बठा राष्ट्र यार्देनना तिकडे निघी गयात.