4
स्मृती चिन्हना बारा दगडी
1 त्या राष्ट्रमाधला झाडीसनं बठा माणसे यार्देनना तिकडे गयात तवय परमेश्वरानी यहोशवाले सांगं.
2 “लोकसमाईन वंशनामांगे एक असा बारा माणसे निवाड,
3 अनी त्यासले अशी आज्ञा दे; यार्देनना मजारमां म्हणजे याजकसना पाय जठे स्थिर व्हयेल व्हतीन तठेतीन बारा दगड उचलीसनं आपलासोबत पलीकडे लयी जाय अनी आज रातले ज्या ठिकाणले तुमना मुक्काम व्हयी तठे ते ठेव.”
4 मंग यहोशवानी इस्त्राएल लोकेसमाधला वंशमांगे एक असा ज्या बारा माणसे तयार करा व्हतात त्यासले बलावं.
5 यहोशवा त्यासले बोलना, “तुम्हीन आमला देव यहोवा याना करारना कोशना समोर यार्देनना मजारमां जाईसनं इस्त्राएल वंशना संख्याप्रमाणे एक एक दगड उचलीसनं आपला खांदावर ल्या.
6 हाई तुमनामां चिन्हदाखल व्हयी, अनी पुढे तुमना पोरेसोरे ईचारतीन की हाई दगडीसनं प्रयोजन काय?
7 तवय तुम्हीन त्यासले सांगानं की, यार्देननं पाणी परमेश्वरना करारना कोशना समोर दोन भागमा व्हयनं; तो कोश यार्देनमाईन जाई राहिंता तवय यार्देनना पाणीना दोन भाग व्हयनात; अशा प्रकारे या दगडी इस्त्राएल लोकेसले कायमनं स्मारक व्हयनात.”
8 यहोशवानी हाई आज्ञाप्रमाणे इस्त्राएल लोकेसनी करं; परमेश्वरानी इस्त्राएल लोकेसले सांगं व्हतं त्याप्रमाणे त्यासनी इस्त्राएल वंशना संख्याप्रमाणे बारा दगड यार्देनना मजारमाईन उचलात अनी जठे त्यासनी मुक्काम करा तठे त्यासनी त्या आपलासंगे लयी जाईसन ठेवात;
9 अनी यार्देनना मजारमां करारना कोश वाहनारा याजकना पाय जठे स्थिर व्हयेल व्हतात तठे यहोशवानी बारा दगडं उभा करात; त्या अजून तठेच शेतस.
10 लोकेसले जे सांगानी आज्ञा परमेश्वरानी यहोशवाले करी व्हती ते बठं सरस तोपावोत करारना कोश वाहनारा याजक यार्देनना मधला भागमां उभा राहीनात; इकडे माणसे लवकर पार उतरीसनं गयात.
11 झाडीसनं बठा माणसे उतरीसनं जावानंतर त्यासनादेखत परमेश्वरना कोश अनी याजक पलीकडे गयात.
12 रऊबेनी, गादी अनी मनश्शना आर्धा वंश हाई मोशेनी आज्ञाप्रमाणे सशस्र व्हयीसनं इस्त्राएल लोकेसनामोरे उतरीसनं पलीकडे गयात;
13 युध्दकरता तयार व्हयेल जवयपास चाळीस हजार माणसे परमेश्वरनामोरे नदी उतरीसनं यरीहोनाजोडे मैदानवर गयात.
14 त्या दिन परमेश्वरनी बठा इस्त्राएलदेखत यहोशवानी थोरवी वाढायी; म्हणीसनं जस त्या मोशेना भय धरेत तस यहोशवानं भय त्यासनी बठी हयातीमां धरं.
15 परमेश्वरनी यहोशवाले सांगं;
16 आज्ञापटना कोश वाहानारा याजक यासले आज्ञा दे की, त्यासनी यार्देनमाईन वर येवानं.
17 त्याप्रमाणे यहोशवानी याजकसले आज्ञा करी की यार्देनमाईन निघीसनं वर यावं.
18 परमेश्वरना कोश वाहानारा याजक यार्देनना मधला भागमाईन निघीसनं वर वनात अनी त्यासनी आपला पाय उचलीसनं कोयडी जमिनवर ठेवात तवय यार्देननं पाणी मुळ ठिकानले वनं अनी पहीलेना मायक दोनी थडी भरीसनं वाहावाले लागनं;
19 पहिल्या महिनानं दशमीले इस्त्राएल लोकेसनी यार्देनमाईन निघीसनं यरीहोनना पुर्व दिशानी सीमाले गिलगाल आठे डेरा दिदा.
20 ज्या बारा दगड यार्देनमाईन उचलीसनं आनेल व्हतात त्या यहोशवानी गिलगाल आठे उभं करं;
21 तो इस्त्राएल लोकेसले बोलना की, “पुढे तुमना पोरेसोरे ज्याना त्याना वडीलसले ईचारतीन, हाई दगडसना प्रयोजन काय?
22 तवय तुम्हीन त्यासले सांगानं की, इस्त्राएल लोक हया यार्देनमाईन कोयडया जमीनवर चालीसनं पार वनात.
23 कारण तुमना देव यहोवा यानी आम्हीन उतरीसनं पार जातसं तोपावोत आमनामोरेतीन तांबडा समुद्र हटाडीसनं कोयडी जमीन करी;
24 यावरतीन पृथ्वीमाधला बठा देशना माणसेसले कळी की, परमेश्वरना हात समर्थ शे; अनी तुमना देव यहोवा याना धाक त्यासले कायम वाटी.”