21
लेवी वंशनं शहर
1 मंग लेवी वंशमाधला पितृकुयना परमुख माणसे हया एलाजार याजक, नुनाना पोर्या यहोशवा अनी इस्त्राएली वंशना पितृकुयना परमुख यापान ऊनात.
2 त्या कनान देशमाधला शिलो आठे यिसनं बोलनात की परमेश्वरनी मोशेकडतीन आशी आज्ञा करी व्हती की आमनी वस्तीकरता नगर अनी आमना जनावरासकरता शिवार देवानं.
3 त्यावरतीन इस्त्राएल लोकेसनी परमेश्वरनी आज्ञाप्रमाणे ज्यानात्याना वतनभागमाईन लेवीसले नगरे अनी शिवार दिधात, त्या याप्रमाणे;
4 कहाथी कुयनी चिठी निघी तवय लेवीसमाईन अहरोन याजकनं वंशले यहुदा, शिमोन अनी बन्यामिन या वंशासना वाटासमाईन तेरा नगर भेटनात.
5 बाकीना कहाथी वंशसले एफ्राईम वंशमाधला कुयना वाटासमाईन अनी दान वंशना अनी मनश्शना आरधा वंशना नगरमाईन दहा नगर चिठया टाकीसनं दिधात.
6 गेर्षोन वंशसले इस्साखार वंशमाधला कुयना अनी आशेर अनी नफताली यासना वंशना अनी अनी बाशानमाधला मनश्शेना आरधा वंशना नगरमाईन तेरा नगर चिठया टाकीसनं दिधात.
7 मरारी वंशासले त्यासना कुयप्रमाणे रऊबेन अनी जबुलून यासना वंशना वाटामाईन बारा नगर दिधात.
8 परमेश्वरनी मोशेले देयेल आज्ञाप्रमाणे इस्त्राएल लोकेसनी लेवीसले चिठया टाकीसनं हाई नगर अनी त्यासना शिवार दिधात.
9 त्यासनी यहुदा अनी शिमोन यासना कुयमाधला विभागमाईन पुढे सांगेल नगर दिधात.
10 लेवी वंशमाधला कहाथी कुयमाधला अहरोनना वंशले पहिला वाटा मिळना.
11 त्यासले त्यानी यहुदामाधला डोंगराय परदेशमाधला किर्याथ-आर्बा ऊर्फ हेब्रोन हाई नगर शिवारनीसंगे दिधं; आर्बा हाऊ अनाकना बाप व्हता;
12 पण त्या नगरना वावर अनी आसपासना खेडापाडा यफुन्नेना पोर्या कालेब याले त्यानी वतन करी देयेल व्हता.
13 अहरोन याजकना वंशले मनुष्यवध कराकरता शरणपूर म्हणीसनं हेब्रोन अनी त्याना शिवार, यानाशिवाय लिब्ना अनी त्याना शिवार;
14 यत्तीर अनी त्याना शिवार, एष्टमोवा अनी त्याना शिवार;
15 होलोन अनी त्याना शिवार, दबीर अनी त्याना शिवार;
16 अईन अनी त्याना शिवार, युटा अनी त्याना शिवार, बेथ-शेमेश अनी त्याना शिवार आशा बठा नऊ नगर त्या दोन वंशासले विभागी दिदात.
17 बन्यामिन वंशना विभागमाईन गिबोन अनी त्याना शिवार, गेबा अनी त्याना शिवार,
18 अनाथोथ अनी त्याना शिवार, अलमोन अनी त्याना शिवार दिदात, अस चारा नगर दिधात.
19 यापरकारं अहरोन वंशमाधला याजकले तेरा नगर अनी त्यासना शिवार मिळनात.
20 बाकीना कहाथी वंशमाधला लेवीसले एफ्राईम वंशमाधला विभागमाईन चिठी टाकीसनं नगर दिदात.
21 मनुष्यवध कराकरता शरणपूर म्हणीसनं त्यासले एफ्राईमना डोंगराळ परदेशमाधला शखेम नगर अनी त्याना शिवार, यानाशिवार गेजेर अनी त्याना शिवार;
22 किबसाईम अनी त्याना शिवार अनी बेथ-हारोन अनी त्याना शिवार, अस बठा चार नगर त्यासनी दिदात.
23 दान वंशना विभागकरता एलतके अनी त्याना शिवार, गिब्बथोन अनी त्याना शिवार,
24 अयालोन अनी त्याना शिवार अनी गथ-रिम्मोन अनी त्याना शिवार हाई चार नगर दिदात.
25 मनश्शेना आरधा वंशना विभागमाईन तानख अनी गथ-रिम्मोन अनी त्याना शिवार हया दोन नगर दिधात.
26 या प्रकारे बाकीना राहेल कहाथी वंशसले जवयपास बठा दहा नगर शिवारनासंगे दिधात.
27 लेवी वंशमाधला गेर्षोनना कुयले मनश्शना आरधा वंशना विभागमाईन मनुष्यवध कराकरता शरणपूर म्हणीसनं बाशानमाधला गोलान अनी त्याना शिवार, यानाशिवाय बैश्तरा अनी त्याना शिवार, अस जवयपास बठा दोन नगर त्यासनी दिधात.
28 इस्साखार वंशना विभागमाईन किशोन अनी त्याना शिवार, दाबरथ अनी त्याना शिवार;
29 यर्मुथ अनी त्याना शिवार, एन-गन्नीम अनी त्याना शिवार अस चार नगर त्यासनी दिदात.
30 आशेर वंशना विभागमाईन मिशाल अनी त्याना शिवार, अब्दोन अनी त्याना शिवार;
31 हेलकाथ अनी त्याना शिवार, अनी रहोब अनी त्याना शिवार, हया चार नगर त्यानी दिधात.
32 नफताली वंशना विभागमाईन गालीलमाधला नगर मनुष्यवध कराकरता शरणपूर म्हणीसनं केदेश अनी त्याना शिवार, हम्मोथ-दोर अनी त्याना शिवार अनी कर्तान अनी त्याना शिवार हया तीन नगर त्यासनी दिधात.
33 याप्रमाणे त्यासनी गेर्षोन वंशसले त्यासना कुयप्रमाणे जवयपास तेरा नगर त्यासना शिवारसहीत दिधात.
34 बाकीना लेवीसले म्हणजे मरारी वंशना लोकेसले जबुलून वंशना विभागमाईन यकनाम अनी त्याना शिवार, कर्ता अनी त्याना शिवार;
35 दिम्रा अनी त्याना शिवार अनी नहलाल अनी त्याना शिवार असा चार नगर त्यासनी दिदात.
36 रऊबेन वंशना विभागमाईन बेसेर अनी त्याना शिवार, याहस अनी त्याना शिवार,
37 कदेमोथ अनी त्याना शिवार अनी मेफाथ अनी त्याना शिवार अस चार नगर त्यानी दिदात.
38 मनुष्यवध कराकरता शरणपूर म्हणीसनं गाद वंशना विभागमाईन गिलादमाधला रामोथ अनी त्याना शिवार; यानाशिवाय महनाइम अनी त्याना शिवार;
39 हेशबोन अनी त्याना शिवार अनी याजेर अनी त्याना शिवार, अस जवयपास बठा चार नगर त्यासनी दिधात.
40 याप्रमाणे बाकीना लेवीसले म्हणजे मरारी वंशना लोकेसले त्यासना कुयप्रमाणे अस जवयपास बारा नगर चिठया टाकीसनं त्यासनी दिदात.
41 इस्त्राएल लोकेसनी वतनमाईन लेवीसले जवयपास अठ्ठेचायीस नगर अनी त्यासना शिवारसहीत त्यासनी दिदात.
42 हया नगर त्यासना आसपासना बठा शिवारसहीत भेटनात; यापरकारं त्या बठा नगरले लागीसनं व्हतात.
इस्त्राएल लोकसना कनान देशवर पुरा अधिकार
43 याप्रकारं जो देश देवानीबारामां परमेश्वरनी इस्त्राएल लोकेसनी पुर्वजसनीसंगे आणभाक करी व्हती तो बठा त्यानी त्यासले दिधा अनी त्या त्याना वतन पाईसन तठे राहावाले लागनात.
44 परमेश्वरनी त्यासना पुर्वजसले वचन दिद् व्हतं त्याप्रमाणे चारीमेर विसावा भेटना; त्यासना कोनताच शत्रुले त्यासनामोरे टिकनात नही; परमेश्वरनी त्यासना बठा शत्रुसले त्यासना हातमां दिधं.
45 परमेश्वरनी इस्त्राएल घराणाले ज्या ज्या हितन्या गोष्ट सांग्या व्हत्यात त्यामासली एक बी कमी पडनी नही; त्या बठया शिध्दीस गयात.