22
पुर्वमा वस्ती करेल वंशसले परत जावानी यहोशवानी परवानगी
1 मंग यहोशवानी रऊबेन वंश, गादी वंश अनी मनश्शना आरधा वंश यासना लोकेसले बलाई धाडं,
2 परमेश्वरना सेवक मोशे यानी तुमले जे काही सांग व्हतं त्याप्रमाणे तुम्हीन सर्व काही करं अनी जी जी आज्ञा मी तुमले दिधी ती तुम्हीन ऐकी;
3 आजपावोत तुम्हीन आपला भाऊबंदसले सोडीसनं गयात नही अनी आपला देव यहोवा यानी आज्ञा ध्यान दिसनं पाळयात.
4 आता तुमना देव यहोवा यानी आपला वचनप्रमाणे तुमना भाऊबंदसले विसावा देयेल शे, तर आते परमेश्वरना सेवक मोशे यानी यार्देनना तिकडे तुमले जी भुमी वतन करी देयेल शे तठे तुम्हीन ज्याना त्याना डेरासले परत जा.
5 पण परमेश्वरना सेवक मोशे यानी तुमले जे धर्मशास्त्र अनी नियमशास्त्र लायी देयेल शे ते पाळानं; आपला देव यहोवा यानावर प्रेम करानं, त्याना बठा मार्गतीन चालानं, त्यानी आज्ञा पाया, त्याना व्हयीसनं राहा अनी त्यानी सेवा मन लाईसनं करा; हाई बठा करानं ध्यानमां ठेवानं;
6 यहोशवानी त्यासले आशिर्वाद दिसनं धाडी दिध, अनी त्या ज्याना त्याना डेराकडे गयात.
7 मनश्शेना आरधा वंशले मोशेनी बाशानमां विभाग दिदा व्हता, पण त्याना दुसरा आरधा वंशले यहोशवानी यार्देनना पश्चिमले त्यासना भाऊबंदसमां विभाग देयेल व्हता, यहोशवानी त्यासले ज्याना त्याना डेरासकडे रवानं करं तवय त्यानी त्यासले आशिर्वाद दिद अनी सांग,
8 विपुल पशु, रुपे, सोने, पितळ, लोखंड, बराच कपडा, आशी संपत्ती लिसनं ज्याना त्याना डेराले जावा; आपला शत्रुपाईन लेयेल लुट आपला भाऊबंदसनीबरोबर वाटी ल्या.
9 मंग रऊबेन वंश, गादी वंश, मनश्शना आरधा वंश यासना माणसे इस्त्राएल लोकेसपाईन कनान देशमां शिलोहपाईन परमेश्वरनी आज्ञाप्रमाणे मोशेनी देयेल गिलाद नावनं वतनभुमीले परत निघी गयात.
यार्देननी वेदी
10 जवय रऊबेन वंश, गाद वंश अनी मनश्शेना आरधा वंश यामाधला माणसे कनान देशमां यार्देनना थडीना परदेशमां ऊनात तवय त्यासनी यार्देननाजोडे मोठी प्रेक्षणीय वेदी बांधी.
11 रऊबेन वंश, गाद वंश अनी मनश्शना आरधा वंश यामाधला लोकेसनी कनान देशनासमोर यार्देननी पैलथडीले इस्त्राएल लोकेसनी ताबामाधला परदेशमां एक येदी बांधानी बातमी इस्त्राएल लोकेसनी कानवर व्हनं.
12 इस्त्राएल लोकेसनी बठी मंडयीनी हाई आयकावर त्यासनावर लढाई कराले चाली जावानं म्हणीसनं त्या बठा शिलो आठे एकजागे गोया व्हयनात.
13 मंग इस्त्राएल लोकेसनी रऊबेन वंश, गाद वंश अनी मनश्शना आरधा वंश यामाधला लोकेसकडे गिलाद देशमाधला एलाजार याजकना पोर्या फिनहास याले धाडं.
14 अनी त्यानासंगे इस्त्राएल लोकेसना वंशना पितृकुयमाधला परतेक वंशनामांगे अस दहा सरदार धाडात; त्या इस्त्राएल लोकेसना कुयमाधला आप आपला पितृकुयना परमुख व्हतात.
15 त्या गिलाद देशमां रऊबेन वंश, गाद वंश अनी मनश्शना आरधा वंश यामाधला लोकेसकडे जाईसनं बोलनात,
16 परमेश्वरनी बठी मंडयी सांगी राहीनी शे, “तुम्हीन इस्त्राएलना देव यहोवा यानाविरोधमां हाई काय पाप करेल शे? तुम्हीन आते हाई येदी बांधेल शे, यामां तुम्हीन परमेश्वरले अनुसरानं सोडीसनं त्यानाविरोधमां बंड करेल शे.
17 दखा, पौरना प्रकरणमां जे आमनाकडतीन अधर्म घडनं त्यामुये परमेश्वरनी मंडयीवर मरी यि गयी, तरीबी आम्हीन आजपावोत त्या अधर्मपाईन शुध्द व्हयनुत नही हाई आमले थोडं व्हयेल शे त्यामुयेच,
18 तुम्हीन परमेश्वरले अनुसरानं सोडी दि राहीना शेतस का? आज तुम्हीन परमेश्वनी येदीनाशिवाय दुसरी येदी बांधीसनं परमेश्वरनी विरोधमां बंड कर ते सकाय बठी इस्त्राएलनी मंडयीवर त्याना क्रोध व्हयी.
19 तुमनी वतन भुमी अपवित्र व्हयीते परमेश्वरना निवासमंडप जठे शे त्या परमेश्वरनी वतनदेशमां नदीना तिकडे यिसनं आमनामां वतन ल्या, पण आमना देव यहोवा यानी येदीशिवाय दुसरी येदी बांधीसनं परमेश्वरना विरोधमां अनी आमनाविरोधमां बंड करानं नही.
20 जेरहना पोर्या आखान यानी समर्पित वसतुनीबारामां आज्ञा मोडी अनी इस्त्राएलनी बठी मंडयीवर कोप व्हयना नही का? त्याना अधर्मतीन त्याना एकलानां नाश व्हयनं नही.”
21 तवय रऊबेन वंश, गाद वंश अनी मनश्शना आरधा वंश यामाधला माणसे इस्त्राएलना पितृकुयना प्रमुखसले बोलनात,
22 “देवाधिदेव यहोवा, देवाधिदेव यहोवा याले माहीत शे; इस्त्राएल लोकेसले बी माहीती पडो की, आम्हीन परमेश्वरना विरोधमां बंड करीसनं अनी त्यानी आज्ञा मोडीसनं असं करं व्हई ते तो आज आमले जीवत नही ठेवो!
23 परमेश्वरले अनुसरानं सोडी देवाकरता आम्हीन हाई येदी बांधी व्हई ते, तिनावर होमार्पण, पेयार्पन अनी शांतीर्पण कराकरता बांधेल व्हई ते, परमेश्वर आमनी झडती लेवो.
24 आम्हीन पुढला ईचार करीसनं अनी ईषेस हेतुतीन हाई करेल शे; आम्हीन बोलनुत, एखादा येळले पुढला कायमां तुमना पोर्या आमना पोर्यासले म्हणानं की, इस्त्राएलना देव यहोवा यानासंगे तुमना काय संबंध शे?
25 ये रऊबेनी अनी गादी लोकेसहो, परमेश्वरनी तुमनामां अनी आमनामां यार्देननी सीमा लाई देयल शे, म्हणीसनं परमेश्वरवर तुमना काही हक्क नही शे; अस म्हणीसनं तुमना वंश आमना वंशसले परमेश्वरनी भक्ती सोडी देवाले भाग पडतीन.
26 तवय आम्हीन बोलनूत चाला, आपण एक येदी बांधू; ती होमबली नाहिते यज्ञबली अर्पाकरता नही ते,
27 तुमना आमनामां अनी आमना मांगेतीन आमन्या अनी तुमन्या पिढयासमां साक्ष राहावाले पाहीज, याकरता की आपण होमबली, यज्ञबली अनी शांतीर्पण या करीसनं परमेश्वरनामोरे उपासना करानी, म्हणजे परमेश्वर वर तुमना काही हक्क नही अस पुढला कायमां तुमना पोर्यासनी आमना पोर्यासले नही म्हणाले पाहीजे.
28 आम्हीन सांगनूत, मोरे जवय त्या माणसे आमले नाहिते आमना वंशसले अस म्हनतीन तवय आम्हीन त्यासले सांगसूत, परमेश्वरवार येदीना नमुना दखा; आमना पुर्वजसनी ती होमबली नाहीते यज्ञबली अर्पाकरता करी नही ते, ती तुमना आमनामां साक्ष म्हणीसनं शे.
29 आमना देव यहोवा याले होमार्पण, अन्नर्पण कराकरता आमना देव यहोवा यानी त्याना निवासमंडपनामोरेनी जी येदी शे तिनीशिवाय दुसरी येदी बांधीसनं परमेश्वरना विरोधमां बंड करानी अनी प्रभुले अनुसरानं आज सोडी देवानं आमना हातमाईन कधीच नही घडो.”
30 रऊबेन वंश, गाद वंश अनी मनश्शना आरधा वंश यामाधला, लोकेसना हाई म्हणनं ऐकीसन फिनहास याजक अनी त्यानासंगेना ज्या इस्त्राएल वंशना सरदार व्हतात यासनं समाधान व्हयनं.
31 तवय एलाजार याजकना पोर्या फिनहास यानी, रऊबेन, गाद अनी मनश्शे याना वंशसले सांग, यामां तुमीन काही परमेश्वरना गुन्हा करेल नही म्हणीसनं आमनी खातरी व्हयेल शे की परमेश्वर आमनामां शे; तुम्हीन आते इस्त्राएल लोकेसले परमेश्वरनी हातमाईन वाचाडेल शे.
32 तवय एलाजार याजकना पोर्या फिनहास अनी सरदार हया रऊबेनी अनी गादी यासपाईन निघीसनं गिलादमाईन कनान देशले इस्त्राएल लोकेसकडे परत गयात अनी त्यासनी त्यासले हाई बातमी सांगी.
33 इस्त्राएल लोकेसना समाधान व्हयीसनं त्यासनी परमेश्वरना धन्यावद करं अनी रऊबेनी अनी गादी यासनासंगे लढाना बारामां नाहिते त्या राहातात, तो देश नाश करानीबारामां त्यासनी परत ती गोट काढी नही.
34 रऊबेनी अनी गादी यासनी सांग की परमेश्वर हाऊच देव शे, यानी तुमना आमनामां साक्ष म्हणीसनं हाई येदी शे; यावरतीन त्यासनी तिनं नाव एद अस ठेवं.