7
आखाननं पाप
1 त्या येळले इस्त्राएल लोकेसनी समर्पित वस्तुनीबारामां देवनं ऐकं नही त्यासनी अपराध करा; यहुदा वंशमाधला आखान बिन कर्मी जब्दी बिन जेरह यानी समर्पित वस्तुसमाईन काही ठि लिदयात त्यामुये इस्त्राएल लोकंसवर परमेश्वरना कोप भडकना.
2 बेथेलना पुर्वले बेथ-आवेनाजोडे आय नगर शे तठे यहोशवानी यरीहोतीन माणसे धाडीसनं त्यासले सांगं की, जाईसनं तो देश हेरा, तवय त्यासनी जाईसनं आय नगर शोध करी टाक.
3 त्या यहोशवाकडे परत ईसन बोलनात, “बठासनी तठे जावाले नको; फक्त दोन तीन हजार माणसंसनी जाईसनं हस्तगत करानं; तठे बठा माणससले जावानं कष्ट देवानी गरज नही शे; कारण त्या लोकं थोडाच शेतस;”
4 म्हणीसनं जवयपास तीन हजार माणसे तिकडे गयात; पण आय आठेना माणसेसना मोरेतीन त्यासले पळ काढना पडा.
5 आय आठेना माणससनी त्यामाधला आजमासे छतीस माणसे मारी टाकात अनी आपला वेशीपाईन दगडसनी खदानपावोत त्यासना पाठलाग करीसनं उतरतीपावोत मारतच लयी गयात; त्यामुये लोकेसना काळीजनं पाणी पाणी व्हयनं.
6 यहोशवानी आपला कपडा फाडात मंग तो अनी इस्त्राएलना वडीलजन संध्याकायपावोत परमेश्वरना कोशनामोरे उपडा पडी राहीनात; अनी त्यासनी आपला डोकावर धुळ टाकी लिदी.
7 यहोशवा बोलना, “हायहाय! हे प्रभू परमेश्वर आमले अमोरीसना हातमां देईसनं आमना नि:पात कराले पाहिजे म्हणीसनं तु हाई बठी प्रजा यार्देननापार का बरं आनी? आम्हीन सावध राहीसनं यार्देननातिकडे राहातु ते बरं व्हतं!
8 हे प्रभू, इस्त्राएलनी आपला शत्रुले पाठ दखाडी ते मी आते काय सांगू!
9 आते कनानी लोक अनी देशमाधला बठा रहीवाशी हाई ऐकीसन आमले घेरतीन अनी पृथ्वीवरलं आमनं नाव नाहीसं करतीन, तर तुनं थोर नाव राखाकरता काय करशी?”
10 तवय परमेश्वर यहोशवाले बोलना, “ऊठ, अस उपडा का बर पडना?
11 इस्त्राएल लोकेसनी पाप करेल शे! मी त्यासनासंगे करेल करार त्यासनी मोडेल शे; समर्पित वस्तुमाईन काही त्यासनी लेयल शेतस; एवढेच नही ते त्यासनी चोरी अनी लबाडी करेल शे, अनी त्या वस्तु त्यासना सामानमां ठेयल शेतस.
12 त्यामुये इस्त्राएल लोकसले आपला शत्रुनामोरे टिकाव धरता येस नही; त्या आपल्या शत्रुले पाठ दखाडतसं; कारण त्या शापग्रस्त व्हयेल शेतस; तुमनामाईन त्या समर्पित वस्तु नष्ट व्हस तोपावोत तुमनासंगे मी आठेतीन मोरे राहावू नही;
13 तर ऊठ, लोकेसले शुध्द कर; त्यासले सांग; सकायकरता तुम्हीन बठा शुध्द व्हा; कारण इस्त्राएलना देव यहोवा म्हणसं; ‘हे इस्त्राएला, तुमपान समर्पित वस्तू शेतस; तुमनामाईन त्या समर्पित वस्तु दुर करावूत नही तोपावोत तुले तुना वैर्यासनीमोरे टिकाव धरता येवावू नही!’
14 सकासले तुमनामाईन एक एक वंशनी जोडे यिसनं उभं राहावानं; ज्या वंशनी चिठी निघी त्यामाधला एकएक गोत्रसनी जोडे जावानं अनी ज्या गोत्रानी चिठी निघी त्यामाधला एक एक घरानानं जोडे येवानं; अनी ज्या घरानानी चिठी निघी त्यामाधला एक एक माणसासनी जोडे येवानं.”
15 ज्यानाजोडे समर्पित वस्तु सापडी त्याले त्याना आपतासनीसंगे जाळी टाकानं; कारण त्यानी परमेश्वरना करार मोडेल शे; अनी इस्त्राएलमां मुढमां काम करेल शे.
16 यहोशवा पहाटले उठीसनं इस्त्राएलना एक एक वंश जोडे उभं कर; तवय यहुदा वंशनी चिठी निघनी;
17 मंग त्यानी यहुदाना एक एक गोत्र जोडे आणं, तवय जेरह गोत्रानी चिठी निघनी; अनी जेरहना गोत्रामाधला एक एक घरानाले जोडे आणं, तवय जब्दीनी घरानानी चिठी निघनी;
18 मंग त्या घरानानां एक एक माणुसले जोडे आणं तवय यहुदा वंशमाधला आखान बिन कर्मी जब्दी बिन जेरह याले धरं;
19 तवय यहोशवा आखानले बोलना, “पोर्या, इस्त्राएलना देव यहोवा याले थोर मान; त्यानामोरे आपला पाप कबुल कर; तु काय करं ते माले सांग; मनापाईन काही दपाडू नको.”
20 आखान यहोशवाले बोलना, “मी खरंच इस्त्राएलना देव यहोवा याना अपराध करेल शे, मी जे काही करेल शे ते हाई;
21 लुटमां एक चांगला शिनारी झगा, दोन किलो चांदी अनी अर्धा किलो वजननी एक सोनानी ईट हाई मनी नजरमां पडनी; तवय त्याना लोभ करीसनं ती लिदी; ती दख, मना डेरामां जमीनमां बुजेल शेतस अनी झगानाखाल चांदी शे.”
22 तवय यहोशवानी काही जासुद धाडात; त्या डेरामां पयत गयात; अनी झगा त्याना डेरामां दपाडेल शेतस त्याना खाल रुपे ठेयेल शे अस त्यासले दखायनं.
23 त्यासनी ती डेरामाईन काढीसनं यहोशवा अनी बठा इस्त्राएल लोक यानाकडे लयीसनं परमेश्वरनामोरे ठेवं.
24 तवय यहोशवानी अनी त्यानासंगेना बठा इस्त्राएलसनी आखान बिन जेरह याले अनी त्यानासंगे ते चांदी, तो झगा अनी सोनानी ईट, त्याना पोरीसना पोर्या, त्यासना बैल, गधडा, शेरडामेंढरा, त्याना डेरा अनी त्यानं जे काही व्हतं नव्हतं ते बठं आखोर खिंडमां आणं.
25 तवय यहोशवा बोलना, “तु आमले त्रास का बरं दिधा? परमेश्वर तुले आज त्रास देई,” मंग बठा इस्त्राएलसनी त्यासले दगडमार करी अनी ती बठी आगघाई जायीसनं त्यानावर दगड टाकात.
26 त्यानावर त्यासनी एक मोठी दगडासनी रास करी ती आजपावोत शे; तवय परमेश्वरना भडकेल कोप कमी व्हयनं; यावरतीनी ती जागले आजपावोत आखोर म्हणजे त्रास देणारी खिंड बोलतसं.