13
पश्चाताप कराबद्दल बोध
1 त्याच येळले तठे राहणारा बराच जणसनी येशुले सांगं की, गालीलकरसनं रक्त पिलातनी त्यासना यज्ञमा मिसाळेल व्हतं,
2 मंग येशुनी त्यासले उत्तर दिधं, या गालीलकरसनी अस दुःख भोगेल व्हतं यावरतीन बाकीना सर्व गालीलकरस पेक्षा त्या जास्त पापी व्हतात अस तुमले वाटस का?
3 मी तुमले सांगस, नव्हतात; तरी पण जर तुम्हीन पश्चाताप करा नही तर तुमना सर्वासना त्यासना मायक नाश व्हई.
4 तसच ज्या अठरा जणसवर शिलोहमाधला बुरूज पडना अनी त्यासना नाश व्हयना, त्या यरूशलेममा राहणारा सर्व लोकसपेक्षा जास्त अपराधी व्हतात अस तुमले वाटस का?
5 मी तुमले सांगस, नव्हतात; पण जर तुम्हीन पश्चाताप करा नही तर तुमना सर्वासना त्यासनामायक नाश व्हई.
अंजिरना निष्फळ झाडना दृष्टांत
6 येशुनी हाऊ दृष्टांत सांगा, कोणी एक माणुसनी त्याना द्राक्षमयामा लायेल अंजिरनं झाड व्हतं; त्यानावर तो फळ दखाले वना पण त्याले काहीच दखायनं नही.
7 तवय त्यानी माळीले सांगं, दख, मांगना तीन वरीस पाईन मी हाई अंजिरना झाडवर फळ दखाले ई ऱ्हायनु; पण माले काहीच भेटस नही; ते तोडी टाक; उगाचच त्यानापाईन जमीनले अडथळा व्हस?
8 तवय माळीनी त्याले उत्तर दिधं, महाराज, एवढा वरीस त्याले राहु द्या, म्हणजे मी त्यानं आजुबाजू खंदिसन खत घालसु;
9 पुढला येळ त्याले फळ वनात तर ठिक; नही तर तुम्हीन ते तोडी टाका.
शब्बाथ दिनले रोगमुक्त व्हयेल बाई
10 येशु शब्बाथ दिनले एक सभास्थानमा शिकाडी राहिंता.
11 मंग जिले अठरा वरीस पाईन रोगना आत्मा लागेल व्हता अशी एक बाई तठे उभी व्हती; ती कुबडी व्हती म्हणीन तिले सरळ बी उभं राहता ये नही.
12 येशुनी तिले दखं अनं बलाईन सांगं, “बाई, तु तूना रोग पाईन मुक्त व्हयेल शे.”
13 त्यानी तिनावर हात ठेवा अनी ती सरळ व्हयनी, अनं देवनी स्तुती कराले लागनी.
14 येशुनी शब्बाथ दिनले रोग बरा करात म्हणीसन यहूदी सभास्थानना अधिकारी संतापमा लोकसनी गर्दीले बोलना, काम कराना असा सव दिन शेतस; तर त्या दिनसमा ईसन बरं व्हवानं, पण शब्बाथ दिनले येवानं नही;
15 प्रभु येशुनी त्याले उत्तर दिधं, अरे ढोंगीसवन, तुमना मातीन प्रत्येकजन शब्बाथ दिनले आपला बैल किंवा गाढवले गोठा माईन सोडिसन पाणी पेवाले लई जातस ना?
16 हाई तर अब्राहामनी संतान शे; दखा, ईले सैताननी अठरा वरीस बांधी ठेयेल व्हतं; ईले हाई बंधन मातीन सोडावानं योग्य नव्हतं का?
17 तो हाई बोली राहिंता तवय त्याना सर्व विरोधीसले लाज वाटनी; कारण ज्या गौरवना कामे त्यानाकडतीन व्हई राहींतात, त्या सर्वासमुये सर्व लोकसनी गर्दीले आनंद व्हयना.
मोहरीना दानाना दृष्टांत
(मत्तय १३:३१-३२; मार्क ४:३०-३२)
18 यावरतीन येशु बोलना, देव राज्य कसानामायक शे? मी त्याले कसानी उपमा देऊ?
19 ते मोहरीना दानाना सारखं शे; एक माणुसनी तो दाणा लिसन आपला शेतमा पेरा, मंग रोपटं वाढिन त्यानं झाड व्हयनं; अनं आकाशमाधला पक्षी त्याना फांदिसवर घरटा बांधीसन ऱ्हावाले लागनात.
खमीरना दृष्टांत
(मत्तय १३:३३)
20 येशु परत, “बोलना, मी देवना राज्यले कसानी उपमा देऊ?
21 एक बाईनी ते खमीर लिसन ते जास्त प्रमाणमा पिठमा मिसाळं अनी ते सर्व पिठ फुली गयं.”
तारणप्राप्तीना धाकला दरवाजा
(मत्तय ७:१३-१४; २१–२३)
22 येशु गावगावमा अनं खेडापाडासमा शिक्षण देत यरूशलेमले जाई राहिंता.
23 तवय कोणी एक माणुसनी त्याले सांगं, प्रभुजी, तारण प्राप्त व्हयेल लोके थोडाच शेतस की काय?
24 येशु त्यासले बोलना, धाकला दरवाजातीन मजारमा जावाना जास्त प्रयत्न करा; कारण मी तुमले सांगस, बराच लोके मजारमा जावाना प्रयत्न करतीन, पण त्यासले मजार जाताच येवाऊ नही.
25 घरमालकनी ऊठीसन घरना दार बंद करा म्हणजे तुम्हीन बाहेर उभा राहीसन दार ठोकीन सांगशात, गुरजी! आमनाकरता दार उघडा; तवय तो तुमले उत्तर दि, तुम्हीन कोठला शेतस, हाई माले माहीत नही;
26 तवय तुम्हीन सांगशात, आम्हीन तुमनासंगे खादं पिधं, अनी तुम्हीन आमना बजारमा आमले शिकाडं;
27 पण तो त्यासले सांगी, मी तुमले सांगस, तुम्हीन कोठला शेतस हाई माले माहीत नही; अहो, पापीसवन मनापाईन दूर व्हा.
28 जवय तुम्हीन अब्राहाम, इसहाक, याकोब अनं सर्व संदेष्टासले देवना राज्यमा बठेल दखशात अनं स्वतःले बाहेर टाकायेल दखशात, तवय तठे रडणं अनं दातखाणं राही.
29 पुर्व अनं पश्चिमकडतीन, उत्तरकडतीन अनं दक्षिणकडतीन लोके ईसन देवना राज्यमा बसतीन;
30 अनी दखा, आते ज्या शेवटला शेतस त्या पहिला व्हतीन, अनी ज्या पहिला शेतस त्या शेवटला व्हतीन.
येशुनं यरूशलेमबद्दल प्रेम
(मत्तय २३:३७-३९)
31 त्याच येळले बराच परूशी ईसन येशुले बोलनात, आठेन निंघी जा, कारण हेरोद तुमले माराले दखी राहिना शे.
32 त्यानी त्यासले सांगं, त्या कोल्हाले जाईसन सांगा, दखं, मी आज अनी सकाय भूतं काढस अनं रोगीसले बरं करस, अनी तिसरा दिनले मनं काम पुर्ण व्हई.
33 तरी माले आज, सकाय अनं परव पुढे जावाले पाहिजे; कारण यरूशलेमना बाहेर संदेष्टासना नाश व्हयना असा व्हवाले नको.
34 यरूशलेमा, यरूशलेमा, संदेष्टासना घात करनारा, अनं तुनाकडे धाडेलसले दगडमार करनारा! कोंबडी जशी आपला पिल्लासले पंखखाल एकत्र करस तसच तुना पोऱ्यासले एकत्र करानी कितलांदाव मनी ईच्छा व्हती, पण तुमनी ईच्छा नव्हती!
35 “तुमनं घर तुमनाकरता ओसाड पडेल शे” मी तुमले खरंखरं सांगस, “परमेश्वरना नावतीन येणारा तो धन्यवादित,” अस तुम्हीन म्हणतस नही, तोपावत मी तुमना नजरमा पडावु नही.