14
येशु आराम दिनले रोगीले बरं करस
येशु शब्बाथ दिनले परूशीस माधला एक अधिकारीना घर जेवाले गया, अनं लोके येशुले जवळतीन दखी राहींतात; तवय येशुजोडे हात पाय सुजाना आजार व्हयेल एक माणुस वना. येशुनी शास्त्रीसले अनं परूशीसले ईचारं, नियमप्रमाणे शब्बाथ दिनले रोग बरं करनं हाई चांगलं शे का नही? तवय त्या चुप राहीनात. मंग त्यानी त्याले स्पर्श करीसन बरं करं अनं धाडी दिधं. मंग येशुनी त्यासले सांगं, तुमना मातीन कोणा पोऱ्या किंवा बैल विहिरमा पडना तर तो त्याले शब्बाथ दिनले त्याच येळले बाहेर काढाव नही का? तवय त्यासले त्याना प्रश्ननं उत्तर देता वनं नही.
नम्रता अनं मानसन्मान
तवय आमंत्रण देयल लोके मुख्य आसन कशी निवडी राहींतात हाई दखीन येशु त्यासले दृष्टांत दिसन बोलना; कोणी तुले लगीनना जेवणनं आमंत्रण दिधं तर तु मुख्य आसनवर बठु नको; कदाचित त्यानी तुनापेक्षा मोठा माणुसले आमंत्रण देयल व्हई. मंग ज्यानी तुले अनं त्याले आमंत्रण देयल व्हई तो ईसन तुले सांगी, याले जागा दे; तवय तु लाजीसन सर्वात खालना जागवर जाईन बसशी. 10 पण तुले जर आमंत्रण व्हई तर तु सर्वात खालना जागवर जाईन बस; म्हणजे ज्यानी तुले आमंत्रण देयल व्हई तो ईसन तुले म्हणी, मित्रा, वर ईसन बस; म्हणजे तुनासंगे जेवणले बसेल सर्वाससमोर तुना सन्मान व्हई. 11 कारण जो कोणी स्वतःले उंच करस तो झुकाई जाई; अनं जो कोनी स्वतःले झुकाई तो उचा करामा ई. 12 मंग ज्यानी त्याले आमंत्रण करेल व्हतं त्याले बी तो बोलना, जवय तुम्हीन दुपारना किंवा संध्याकायना येळले जेवणनं आमंत्रण दिशात तवय तुम्हीन आपला मित्र, आपला भाऊ, आपला नातेवाईक किंवा श्रीमंत शेजारी यासले बलावू नका; बलावशात तर कदाचित त्या पण तुमले उलट आमंत्रण देतीन अनं तुमनी फेड व्हई जाई. 13 तर तु जेवणनं आमंत्रण दिशी तवय गरीब, लुळा, लंगडा अनं आंधया यासले आमंत्रण दे; 14 म्हणजे तु धन्य व्हशी कारण तुनी फेड कराले त्यासनाजोडे काहीच नही; तरी धार्मीकसना पुनरूत्थानना येळले परमेश्वर कडतीन तुनी फेड व्हई.
लगीनना जेवणना दृष्टांत
(मत्तय २२:१-१०)
15 मंग जेवणले बशेलस पैकी कोणी एकजण या गोष्टी ऐकीसन येशुले बोलना, जो कोणी देवना राज्यमा भाकर खाई तो धन्य. 16 येशुनी त्याले सांगं, कोणी एक माणुसनी संध्याकायनी मोठी जेवणनी तयारी करी, त्यानी बराच जणसले आमंत्रण दिधं. 17 जेवण तयार व्हवावर त्यानी आपला नोकरले आमंत्रण देयल लोकसले हाई सांगाले धाडं की चला, सर्व तयार व्हयेल शे 18 तवय त्या सगळा मायकच कारण सांगु लागनात. पहिला त्याले बोलना, मी वावर ईकत लियेल शे, ते माले जाईसन दखनं पडी; मी तुले ईनंती करस, माले माफ कर. 19 दुसरा त्याले बोलना, मी पाच बैलजोडया ईकत लियेल शेतस, त्या मी तपासाले जाई राहीनु, मी तुले ईनंती करस, माले क्षमा कर. 20 अजुन एकजण बोलना, मी लगीन करेल शे, म्हणीसन माले काही येता येवावू नही. 21 मंग त्या नोकरनी ईसन आपला मालकले हाई बातमी सांगी तवय घरमालकले राग वना अनं तो आपला नोकरले बोलना, नगरना रस्तामा अनं गल्लीसमा लवकर जाय, अनी गरीब, लूळा, आंधया अनं लंगडा यासले ईकडे लई ये. 22 नोकर बोलना, “महाराज तुम्हीन आज्ञा करी त्यानाप्रमाणे व्हयेल शे, तरी अजुन बी भरपुर जागा शे.” 23 मालक नोकरले बोलना, “मनं घर भरी जावाले पाहिजे म्हणीसन वाटवर अनं वडांगीस कडे जाईसन लोकसले ईनंती करीसन लई ये” 24 कारण मी तुमले सांगस, की, त्या आमंत्रण देयल माणसंसपैकी एकले बी मना जेवणमाधलं काहीच चाखाले मिळावू नही.
खरा शिष्य कोण
(मत्तय १०:३७-३८)
25 येशुसंगे लोकसनी गर्दी जाई राहिंती; तवय तो त्यासले बोलना, 26 जो कोणी मनामांगे येवाले दखस अनी आपला माय, बाप, बायको, पोऱ्या भाऊ अनं बहिणी यासना अनी आपला जिवना पण व्देष करत नही तर त्याले मना शिष्य व्हता येवावु नही. 27 जो कोणी मराले तयार व्हस नही, त्याले मना शिष्य व्हता येवावु नही. 28 तुमनामा असा कोणी शे का, त्याले किल्ला बाधांनी ईच्छा व्हई तर, तो पहिले बशिसन खर्चना अंदाज करीसन आपलाजोडे ते पुरं बांधाई ईतली ऐपत शे की नही हाई दखस नही? 29 नही तर कदाचित पाया बांधावर त्याले जर तो पुरा करता वनं नही, तर दखणारा सर्व लोके त्यानी टिंगल करीसन म्हणतीन, 30 “हाऊ माणुस बांधाले लागना खरं, पण ह्याले ते पुर्ण करता वनं नही.” 31 असा कोण राजा शे की, तो दुसरा राजाबरोबर लढाई कराले निंघस तवय तो बशीसन हाऊ ईचार कराऊ नही का, जो वीस हजार लिसन मनावर येस, त्यानावर माले दहा हजारच लिसन जाता ई का? 32 जर जाता येवावु नही, ते तो दूर शे तोवरच तो वकिलले धाडीसन शांततामा बोलनं करी. 33 त्यानाप्रमाणेच तुमनापैकी जो कोणी आपलं सर्वस्वना त्याग करावु नही त्याले मना शिष्य व्हता येवावु नही.
बिनचव मिठ
(मत्तय ५:१३; मार्क ९:५०)
34 मीठ हाऊ चांगला पदार्थ शे; पण मीठना खारटपणाच निंघी गया तर त्याना खारटपणा कशाघाई आणता ई? 35 मंग ते जमीनकरता किंवा खतकरता उपयोगना नही; तर ते फेकाई जाई. ज्याले ऐकाले कान शेतस तो ऐको.
14:5 मत्तय १२:११ 14:11 मत्तय २३:१२; लूक १८:१४ 14:26 मत्तय १०:३७ 14:27 मत्तय १०:३८; १६:२४; मार्क ८:३४; लूक ९:२३