15
दवडायेल मेंढरु
(मत्तय १८:१२-१४)
सर्व जकातदार अनं पापी लोके येशुनं बोलनं ऐकाकरता त्यानाजोडे ई राहींतात. तवय शास्त्री अनं परूशी या लोकसनी अशी कुरकुर करी, की हाऊ पापी लोकसमा जाईसन त्यासना बराबर जेवस. मंग येशुनी त्यासले हाऊ दृष्टांत सांगा; तुमनामा असा कोण माणुस शे की, त्यानाजोडे शंभर मेंढरं शेतस अनं त्यानामातीन एक दवडी गयं. तर त्या बाकीना नव्यान्नव मेंढरंसले जंगलमा सोडीसन ते दवडायेल मेंढरू सापडस नही तोपावत तो त्याना शोध करस नही? ते मेंढरू सापडावर तो त्याले आनंदमा खांदावर लेस; अनी घर ईसन मित्रसले अनं शेजारीसले बलाईसन सांगस, मनं दवडायेल मेंढरू सापडनं शे, म्हणीन तुम्हीन मना बराबर आनंद करा. त्यानामायकच ज्यासनी पहिलेच पाप करानं सोडी दिधं असा नव्याण्णव धार्मीकसबद्दल व्हनारा आनंदपेक्षा पश्चाताप करनारा एक पापी माणुसबद्दल स्वर्गमा जास्त आनंद व्हस, हाई मी तुमले सांगस.
दवडायेल नाणं
जर समजा अशी कोणी बाई शे की तिनाजोडे दहा पैसा शेतस त्यामातीन एक पावली दवडायनी तर ती दिवा लाईसन अनं घर झाडीसन ते नाणं सापडस नही तोपावत ती मनपाईन ते शोधस नही का? अनं ते सापडावर ती मैत्रिणीसले अनी शेजारीसले बलाईसन सांगस, “की मनी दवडायेल पावली माले सापडनी, म्हणीन मनाबरोबर आनंद करा.” 10 त्यानामायकच, पश्चाताप करनारा एक पापी माणुसबद्दल देवना दूतससमोर आनंद व्हस, हाई मी तुमले सांगस.
दवडायेल पोऱ्या
11 परत येशु त्यासले बोलना, कोणी एक माणुसले दोन पोऱ्या व्हतात; 12 त्यासना माधला धाकला पोऱ्या बापले बोलना, मना मालमत्ताना वाटा माले द्या. तवय त्याना बापनी त्याले आपली संपत्ती वाटी दिधी. 13 मंग थोडा दिन नंतर धाकला पोऱ्या सर्व संपत्ती जमा करीसन दुर देशले निंघी गया; अनं त्यानी तठे जाईसन मौज मजा करीसन आपली सर्व संपत्ती उडाई दिधी. 14 त्यानाजोडे जे व्हतं ते सगळं त्यानी खर्च करी टाकं नंतर त्या देशमा मोठा दुष्काळ पडना; तवय त्याले अडचण येवाले लागनी. 15 मंग तो त्या देश माधला एक रहिवाशीजोडे जाईसन त्यानाकडे कामले लागना, त्यानी त्याले वावरमा डुकरं चाराले धाडं. 16 तवय डुक्कर ज्या शेंगा खातस त्यामधला शेंगा खाईसन तरी आपलं पोट भरू अस त्याले वाटणं; पण त्याले कोणीच काही दिधं नही. 17 मंग तो शुध्दीवर ईसन बोलना, मना बापना घर मजुरसले भाकरनी कमी नही शे! अनी मी तर आठे भूक्या मरी राहिनु. 18 मी ऊठीसन आपला बापनाजोडे जासु अनं त्याले म्हणसु, बापा, मी स्वर्गानाविरूध्द अनं तुमना विरूध्द पाप करेल शे; 19 तर आते तुमना पोऱ्या म्हणी लेवाले मी योग्य नही; माले आपला एक नोकर मायक ठेवा. 20 मंग तो ऊठीसन आपला बापकडे गया. तो दुर व्हता तवयच त्याना बापनी त्याले दखं अनी त्याले त्यानी किव वनी अनी पयत जोडे जाईसन गळामा पडीन त्याले मिठी मारी, अनी त्याना मुका लिधात. 21 पोऱ्या त्याना बापले बोलना, बापा, मी परमेश्वरविरूध्द अनं तुमना विरूध्द पाप करेल शे; आते तुमना पोऱ्या म्हणी लेवाले मी योग्य नही शे; 22 पण बापनी आपला नोकरसले सांगं, लवकर चांगला झगा आणीसन याले घाला, याना हातमा अंगठी अनं पायमा जोडा घाला, 23 अनी चांगला बोकड आणीसन कापा; आपण ते खाऊत अनी आनंद करूत; 24 कारण हाऊ मना पोऱ्या मरेल व्हता, तो परत जिवत व्हयेल शे; अनी दवडेल व्हता तो सापडेल शे मंग त्या आनंदमा उत्सव कराले लागनात.
25 त्याना मोठा पोऱ्या वावरमा व्हता; तो घरजोडे वना तवय त्यानी गाणासना अनी नाचनारासना आवाज ऐका. 26 तवय त्यानी एक नोकरले बलाईसन ईचारं, हाई काय चालु शे? 27 त्यानी त्याले सांगं, तुमना भाऊ परत येल शे; अनी तो तुमना बापले सुखरूप भेटना म्हणीन त्यासनी चांगला बोकड कापेल शे.
28 तवय त्याले भलता राग वना अनं तो घरमा जाई नही राहिंता; म्हणीन त्याना बाप बाहेर ईसन त्याले समजाडु लागना; 29 पण त्यानी बापले उत्तर दिधं, दखा, मी इतला वरीस पाईन तुमनी सेवा करी राहिनु, अनी तुमनी एक बी आज्ञा मी कधी मोडी नही; तरी तुम्हीन माले मना मित्रससंगे मेजवानी कराले आजपावत एक धाकला बोकड पण दिधा नही; 30 पण ज्यानी तुमनी संपत्ती वेश्यासवर उडाई दिधी तो हाऊ तुमना पोऱ्या परत वना अनी तुम्हीन त्यानाकरता मोठा बोकड कापा. 31 बापनी उत्तर दिधं, बेटा, तु तर कायम मनासंगेच शे, अनी मनं जे काही शे ते सर्वकाही तुनंच शे; 32 पण उत्सव अनी आनंद करानं हाई योग्य शे; कारण हाऊ तुना भाऊ मरेल व्हता, तो जिवत व्हयना शे; दवडेल व्हता, तो सापडना शे.
15:1 लूक ५:२९,३०