10
नादाब अनं अबीहू ह्यासनं पाप
मंग अहरोनना पोर्‍या नादाब अनी अबीहू यासनी ज्‍यानात्‍याना धुपाटण लईसनी त्‍यामा आग टाकं अनी त्‍यानावर धूप टाकीसनी ते अशुध्द अग्‍नी परमेश्‍वरनीमोरे आणं; आशे अग्नी लई जावानाबारामा परमेश्‍वरनी आज्ञा कायनी व्‍हती. तवय परमेश्‍वरकडतीन आग व्‍हनं अनी त्यानी त्‍यासले भस्‍म करी टाकं अनी परमेश्‍वरनी देखत मरी गयात. मंग मोशेनी अहरोनले सांग; परमेश्‍वरनी सांगेल शे ते हाई, ज्‍या मनाजोडे येतीन त्‍यासनी माले पवित्र मानानं अनी सर्वा लोकासनासमोर म्‍हना महिमा व्‍हावाले पाहिजे; तवय अहरोन शांत व्‍हईना. मंग अहरोनना चुलतभाऊ उज्‍जीयेल याना पोर्‍या मिशाएल अनी एलसाफान यासले मोशेनी बलाईसनी सांग की तुम्‍ही इकडे या, तुम्‍हना भाऊसले पविञस्‍थाननामोरेतीन छावणीनीबाहेर लई जा. मोशेनी आज्ञापरमानं त्‍या व्‍हनातं अनी त्‍यासना कपडासुध्‍दा छावणीनाबाहेर लई गयात. मोशेनी अहरोन अनी त्‍याना पोर्‍या एलाजार अनी इथामार यासले सांग की तुम्‍ही आपला डोकासनं केस मोकळ सोडानं नही अनी आपला कपडा फाडानं नही; जर तुम्‍ही तशे करं तर मरशी अनी सर्वा मंडळीवर परमेश्‍वरना कोप भडकी; परमेश्‍वरनी जे हाई अग्‍नी पेटाडेल व्‍हतं त्‍यानीबारामा तरी तुम्‍हना भाऊबंदसनी म्‍हणजे सर्वा इस्राएल घराणानी शोक करानं. तुम्‍ही दर्शनमंडपना दारनीबाहेर जावानं नही; जाशी ते मरशी: कारण परमेश्‍वरनी विहीत करेल अभिषेकना तेलघाई तुम्‍हना अभिषेक व्‍हयेल शे; त्‍यासनी मोशानी सांगेलपरमानं करं.
याजकना करता नियम
अजुन परमेश्‍वरनी अहरोनले सांग: जवय-जवय तुम्‍ही मनजे तु अनी तुना पोर्‍या दर्शनमंडपमा जातीन तवय तुम्‍हनामाईन कोणी द्राक्षरस नाहिते कोनता भी परकारनी दारु पेव्‍हानं नही, पिसी ते मरशी; हाई तुम्‍हनाकरता पिढयानपिढया कायमना नियम शे: 10 हाई परमानं तुम्‍ही पवित्र अनी अपवित्र, शुध्‍द अनी अशुध्‍द यामासला भेद वयखानं. 11 अनी परमेश्‍वरनी मोशानीव्दारे सांग सर्वा नियम तुम्‍ही इस्राएल लोकेसले शिकाडानं. 12 मंग मोशेनी अहरोनले अनी त्‍याना बाकीना उरेल पोर्‍या म्‍हणजे एलाजार अनी इथामार यासले सांग की परमेश्‍वरनी हव्‍यामाईन जे अन्‍नार्पण बाकी ऱ्हाई ते लईसनी वेदीपान बिगर खमिरनं खाशी; कारण ते परम पवित्र शे. 13 ते तुम्‍ही पवित्र ठिकानं खावानं, परमेश्‍वरले हव्‍यासमाईन तो तुना अनी तुना वंशजना हक्‍क शे; माले आशीच आज्ञा व्‍हयेल शे. 14 ओवाळेल ऊर अनी समर्पित करेल फरा हाई तुम्‍ही तुम्‍हना पोर्‍या अनी पोरीसोबत शुध्‍द ठिकाणले बशीनी खावानं; कारण इस्राएल लोकेसनी करेल शांत्‍यर्पणमाईन तुले अनी तुना पोर्‍यासोर्‍यासना ते हक्‍क म्‍हणीसनी देयेल शेतस. 15 समर्पण करानं फरा अनी ओवाळानं ऊर हाई चरबीना हव्‍यांसना सोबत ओवाळणीनं अर्पण, त्‍याकरता परमेश्‍वरना देखत आणानं; हाई तुम्‍हना अनी तूम्‍हना वंशना कायमना हक्‍क शे; आशी परमेश्‍वरनी आज्ञा शे. 16 मोशेनी पापबळीना बोकडले ध्यान दिसन दखं; तवय त्‍याले सापडनं की ते जाळी टाकं व्‍हतं, हाई देखसनी अहरोनना बाकी ऱ्हायेल पोर्‍या एलाजार अनी इथामार यासले संताप करिसनी बोलना. 17 तुम्‍ही पापबळी पवित्र ठिकानं काबर खादं नही? ते परमपवित्र शे अनी मंडळीना दुष्‍कर्मासना भार वाहीसनी त्‍यासना करता परमेश्‍वरनामोरे प्रायश्‍चित करानं याकरता ते तुम्‍हले देयेल शे. 18 दखा, त्‍याना रंगत पवित्र ठिकाणले मजारमा लयं नही, तुम्‍ही मना आज्ञापरमानं त्‍याना मास खावालेच पाहिजे व्हतं. 19 याना उत्‍तर अहरोननी मोशेले दिधं की दखं, आज त्‍यासनी पापबळी अनी होमबळी हाई परमेश्‍वरनामोरे अर्पण करं म्‍हणुन मनावर आशे संकट येयल शेतस; समजा आज मी पापबळी खाई लिधं व्‍हतं ते परमेश्‍वरलं चांगलं वाटी कां? 20 जवय मोशेले हाई ऐकं मंग त्याले चांगलं वाटनं.