11
शुध्द अनं अशुध्द जनावर
परमेश्‍वरनी मोशे अनी अहरोनले सांग; इस्राएल लोकेसले सांगानं की, जगमासला पशुसमाईन ज्‍याना मास तुम्‍हले खावानं शे ते हाई; जनावरसमाईन ज्‍याना खुर चिरेल शे नाहिते दुभागेल शेतस अनी ज्‍या रवंथ करंतस त्‍या बठा तुम्‍ही खावानं. पण ज्‍या नुसता रवंथ करंतस नाहिते ज्‍यासना नुसता खुर चिरेल शेतस त्‍या खावानं नही, उंट हाई रवंथ करस पण त्‍याना खुर चिरेल नही शे म्‍हणुन ते अशुध्द शे. शाफान रवंथ करस पण त्‍याना खुर चिरेल नही, म्‍हणुन ते तुम्‍हले अशुध्द शे. ससा रवंथ करस पण त्‍याना खुर चिरेल नही, म्‍हणीन ते भी तुमना करतता अशुध्द शे. डुकरना खुर चिरीसनी दुभागेल शे पण ते रवंथ करस नही, म्‍हणीन ते भी तुमना करतता अशुध्द शे. त्‍यासना मास खावानं नही, त्‍यासना शवले हात लावानं नही, तुम्‍हले हाई बठा अशुध्द शेतस. पाणीमासले जे खावानं ते हाई शे; समुद्रमा अनी नदयासमा राहाणारा ज्‍या प्राणीसले पख अनी खवला शेतस त्‍या तुम्‍ही खावानं. 10 पाणीमासाला ज्‍या प्राण्‍यासले पख नाहीते खवला नही आशे समुद्रमा अनी नदयासमा राहाणारा बठा पाणीमासाला प्राणी अमंगळ शेतस. 11 तुम्‍ही त्‍यासले अमंगळ समजानं; त्‍यासना मास खावानं नही अनी त्‍यासना शवसले अमंगळ समजानं. 12 जलाशयामासला‍ ज्‍या प्राण्‍यासले पख नही अनी खवलाबी नही त्‍या बठासले अमंगळ समजानं. 13 चिडासमाईन जे अमंगळ समजीसनी खावानं नही त्‍या हया शेतस; गरुड, लोळणारा गीध, कुरर 14 घार, न्‍यार्‍या-न्‍यार्‍या जातीसना ससाणा, 15 परतेक जातना हाडयाल 16 शहामग, गवळण, कोकीळा न्‍यारा-न्‍यारा जातीसना बहिराससाणं 17 पिंगळा, करडोक, मोठा घुबड, 18 राजहंस, पाणकोळी, गिधाड 19 करकोच, अलग अलग जातीसना बगळा, टीटवी अनी वटवाघुळ. 20 ज्‍या पखासवाले प्राणी पायसवर चालतस त्‍यासले तुम्‍ही अमंगळ समजानं. 21 पण चार पायसवर चालणारा पखासवाले प्राण्‍यासमाईन ज्‍यासले जमीनवर उडया माराले पायसनावर तंगडया राहतस त्‍या खावानं 22 त्‍यासमाईन जे खावानं शेतस त्‍या हाई; टोळ, नाकतोडा, खरपुडे, गवत्‍यटोळ हाई खावानं. 23 जमीनवर रांगणारा चार पायसना पखसना प्राणी तुम्‍ही अमंगळ समजानं. 24 त्‍यासनामुळे तुम्‍ही अशुध्‍द व्‍हई जातीन. जो कोणी त्‍यासना शवसले स्‍पर्श करी त्यानी संध्‍याकाळपावोत अशुध्‍दच राव्‍हानं 25 त्‍यासना शवसना एकादा भाग कोणी उचलं तर ‍त्‍यानी आपला कपडा धईसनी संध्‍याकाळपावोत अशुध्‍दस राव्‍हानं. 26 ज्‍या पशुसना खुर चिरेल शे पण दुभागेल नही अनी रवंथ करतस नही ते तुम्‍हले अशुध्द शेतस; त्‍यासले ज्‍याना स्‍पर्श व्‍हई त्यानी अशुद्धच राव्‍हानं 27 चार पायसावर चालणारा बठा पशुसमाईन ज्‍या आपला पंजासवर चालतस त्‍या तुम्‍हले अशुध्द शेतस; त्‍यासना शवसले जो स्‍पर्श करी त्यानी संध्‍याकाळपावोत अशुद्धच राहावानं 28 ज्‍यानी त्‍यासना शव उचलं त्यानी आपला कपडा धईसनी संध्‍याकाळपावोत अशुध्‍दस राहावानं, कारण ते तुम्‍हले निषिध्‍द् शेतस; 29 जमीनवर रांगणारा जीवसमाईन तुम्‍हले निषिध्‍द त्‍या हया शेतस; मुंगूस, उंदिर, वेगवेगळया जातीसना सरडा 30 चौपई, घोरपड,पाल, सांडा अनी गुहिर्‍या सरडा 31 जमीनावर रांगणारासमाईन हाई बठा तुम्‍हले निषिध्‍द शेतस; जो कोणी त्‍यासना शवसले स्‍पर्श करी त्यानी संध्‍याकाळपावोत अशुध्‍दस राहावानं. 32 त्‍यासमाईन कोणी मरीसनी एखादी वस्‍तुवर पडी तेबी अशुध्‍द समजानं; मंग ते काठना पाञ, वस्‍ञ, तरट, नाहिते कोनतेभी कामना हत्‍यार राहो ते पाणीमा टाकानं अनी संध्‍याकाळपावोत अशुध्‍दस राहावानं; मंग त्‍याले स्‍पर्श करानं. 33 यामाईन एखादा मातीना भांडामा पडं तर‍ त्‍या भांडमा जे काही राही ते अशुध्‍द व्‍हई अनी ते भांड फोडी टाकानं; 34 जर एकादी वस्‍तु खावाकरता योग्‍य व्‍हई पण त्‍यामा पानी पडेल शे तर ती वस्‍तूले अशुध्‍द समजानं अनी आशे भांडामा काही पेय राहिते तर तेभी अशुध्‍द समजानं. 35 अनी त्‍यासना शवंसना एखादा भाग भट्टीनावर नाहीते चुलावर पडनं तर ते अशुध्‍द समजीसनी मोडी टाकानं; कारण त्यानी ती अशुध्‍द व्‍हतस. अनी तुम्‍ही ती अशुध्‍द समजानं. 36 झरा नाहिते विहिर ज्‍यामा पाणी साठा राहास ते शुध्‍द राहास; तरी त्‍यामासाला शवले ज्‍याना स्‍पर्श व्‍हई ते अशुध्‍द समजानं. 37 त्‍यासना शवसना काही भाग पैरानां बियासवर पडनं तरी त्‍या बियासले शुध्‍द समजानं. 38 त्‍या बियासवर पाणी शितडेल शे त्‍यानावर त्‍या प्राण्‍यासना शेवळासना पडनं तर ते तुम्हले अशुध्‍द शेतस. 39 खावानं पशुसमाईन एखादा मरना तर त्‍याना शवसले शिवणार्‍यासनी संध्‍याकाळपावोत अशुध्‍दस राहावानं 40 त्‍याना शवसना काही भाग त्यानी खाद् तर त्यानी आपला कपडा धईसनी संध्‍याकाळपावोत अशुध्‍दस राहावानं; त्‍याना शव उचलनारासनभी आपला कपडा धईसनी संध्‍याकाळपावोत अशुध्‍दस राहावानं; 41 जमीनवर रांगणारा बठा प्राणी अमंगळ शेतस; ते खावानं नही. 42 जमीनवार रांगणारासमाईन ज्‍या पोटवर चालतस नाहिते चार पायसवर चालतस अनी ज्‍यासले बराच पाय शेतस त्‍या काही तुम्‍ही खावानं नही; त्‍या अमंगळ शेतस. 43 तुम्‍ही कोणत्‍याभी प्रकारना रांगत चालणारा प्राण्‍यासमुळे अमंगळ होवु देवानं नही नाहिते त्‍यासनाव्‍दारा अशुध्‍द व्‍हईसनी विटाळ व्‍हवाले नही पाहिजे. 44 मी परमेश्‍वर तुम्‍हना देव शे म्‍हणुन स्‍वत:ले पवित्र करीसनी पविञ राहावानं; कारण मी पविञ शे;‍ म्‍हणुन जमीनवर रांगणारा कोतणतेभी जातीसना विटाळानं नही. 45 कारण मी तुमना देव व्हावाले पाहिजे म्हणीसनं त्या परमेश्वरनी तुमले मिसर देशमाईन आठे आणं तोच मी शे; मी पवित्र शे; त्याकरता तुमीबी पवित्र व्हावानं. 46 पशु, पक्षी सर्व पाणीवर अनं जमिनवर रांगणारा बठा जनावर यासनाबारामां 47 अशुध्द अनी शुध्द, जे खावानं अनी जे खावानं नही यासमासला भेद दखानं हाई नियम शे.