12
बाळानपण व्हवा नंतर मायकरता शुध्दीरनना नियम
1 परमेश्वरनी मोशेले सांग
2 इस्राएल लोकेसले सांग: बाई गर्भवती व्हईसनी तिले पोर्या व्हवानंतर तिनी सात दिवस अशुध्द ऱ्हावानं; ऋतुकाली जशी दुर बससं तशी तिले अशुध्द समजानं.
3 आठवा रोजले त्या पोर्यानी सुंता करी टाकानं.
4 नंतर त्या बाईनी आपला रक्तस्रावपाईन शुध्द व्हावाकरता तेहतीस दिवस पुरा करानं; तिना शुध्दीना दिवस पुरा व्हस तोपावोत तिनी कोणतेभी पवित्र वस्तुले हात लावानं नही अनी पवित्र ठिकानवर जावानं नही.
5 तिले पोर व्हईनीते जशी ती ऋतुकाली दुर बसस त्यापरमानं तिनी चौदा दिवस अशुध्द ऱ्हावानं अनी रक्तस्रावपाईन शुध्द व्हवाकरता सहासष्ट दिवस पुरा करानं;
6 जवय त्यासना शुध्द व्हवानं दिवस पुर वतीन तवय तिले पोर्या अनी पोर वतीन तवय होमबळी कराकरता एक वर्षीना मेंढा अनी पापबळीकरता पारवासना पिला नाहीते होला दर्शनमंडपना दारपान याजकसकडे लई जावानं
7 मंग याजकसनी ते परमेश्वरनीमोरे अर्पिसनी तिनाकरता प्रायश्चित करानं; म्हणजे रक्तस्रावमाईन शुध्द व्हई; जी बाईले पोर्या नाहिते पोर व्हई तिनीबारामा नियम हाई.
8 तिले मेंढा अर्पण करानी ऐपत नही व्हईते तिनी दोन होला नाहिते पारवासना दोन पिला, एक होमबळी कराकरता अनी दुसरा पापबळी कराकरता आणानं अनी याजकसनी तिनाकरता प्रायश्चित करानं म्हणजे ती शुध्द व्हई.