13
कुष्टरोग यानाईषयी नियम
1 परमेश्वरनी मोशे अनी अहरोन यासले सांग;
2 जवय माणुसनी कातडीले सुज, खवले नाहीते पांढरा डाग व्हई अनी कुष्टरोगना चट्टा शे आशे दिसनं तवय त्यासले अहरोन याजककडे नाहिते त्याना पोर्या जे याजक शेतस त्यामाईन एकजणकडे लई जावानं.
3 मंग याजकसनी आंगना चामडीनावरना चट्टा तपासानं अनी त्यामासला केस धवळा व्हयेल वतीन अनी ते चामडीना मजारमा व्हई तवय त्याले कुष्टरोगना चट्टा समजानं त्या माणससले याजकसकडे तपासणी करीसनी त्याले अशुध्द करी टाकानं.
4 त्याना आंगना चामडीवरना डाग धवळा व्हई पण त्याना चामडीपेक्षा ते खोल जायेल नही व्हई अनी त्यानावरना केस धवळा व्हयेल नही व्हई तर याजकसनी चट्टा पडेल त्या माणससले सात दिनपावत अलग ठेवानं.
5 सातवा रोज परत एकदाव याजकसनी त्यानी तपासनी करानं अनी चट्टा जशानं तशे व्हई अनी चामडीमा पसरेल नही व्हई आशे दखामां व्हनं तर याजकसनी त्याले आखो कोंडी ठेवानं.
6 सातवा रोज याजकसनी परत एकदावं तपासानं अनी चट्टा कमी व्हई राहिना अनी चामडीमा ते पसरेल नही शे आशे त्याले दखायनं तर याजकसनी त्याले शुध्द करानं; कारण ते साधा खवले शे; त्यानी त्याना कपडा धईसनी शुध्द व्हई जावानं.
7 तो शुध्द शे आशे त्याले ठरावनं म्हणीसनी याजकले दखाडानंतर चामडीना तो डाग पसरत व्हई तर त्या माणुसनी परत एकदाव याजकले दखाडानं.
8 याजकनी तपासनी करानं अनी ते डाग चामडीमा परसरेल शे आशे दखामां व्हना त्यानी त्याले अशुध्द ठरावानं; ते कुष्टरोग शे.
9 जर एखादा माणुसले कुष्टरोग चट्टा व्हई त्याले याजकसकडे लई जावानं.
10 याजकसनी तपासनी करानं अनी जर त्याना चामडीमा धवळी सुज व्हई अनी त्यानामुळे त्याना केस धवळा व्हतीन अनी त्यामासला मास मुडदार व्हयेल शेतस,
11 तर त्याना चामडीमा ते जुना कुष्टरोग शे. याजकनी त्याले अशुध्द ठरावानं, त्याले त्यानी कोंडी ठेवानं, तो अशुध्दस शे.
12 एखादाना चामडीमा कुष्टरोग फुटिसनी तो नखशिखात बठा आंगभर पसरेल शे आशे याजकले दिसनं,
13 तर त्यानी तपासनी करानं अनी त्याले बठा आंगले कुष्टरोग व्हयेल शे त्यानी चट्टा पडेल माणुसले शुध्द ठरावान; त्याना सर्वा आंग शुभ्र व्हयनं म्हणुन तो शुध्द शे.
14 त्याना आंगवर काही मास मुडदार दखायनं तर त्याले अशुध्द समजानं.
15 याजकनी मुडदार मास दखीसनी त्याले अशुध्द ठरावानं; कारण आशे मास अशुध्दस ऱ्हास: तो कुष्टरोग शे.
16 ते मुडदार मास पलटीसनी धवळ व्हयनं तर त्यानी परत याजकसडे येवानं.
17 याजकनी त्याले तपासानं अनी जर त्याना चट्टा पलटीसनी धवळा व्हयेल शे तर त्यानी त्या चट्टा पडेल माणसासले शुध्द ठरावानं; कारण तो शुध्द शे.
18 एखादानी चामडीले फोड येईसनी तो बरा व्हयना.
19 अनी फोडनी जागावर धवळी सुज व्हयनी नाहिते लालसर धवळा डाग पडनं तर त्यानी ते याजकले दखाडानं.
20 याजकसनी तपासनी करानं अनी जर ते चामडीपेक्षा ती जागा खोल जायेल दखामा व्हनी अनी त्यानावरना केस धवळा व्हयेल शेतस तर त्याले अशुध्द् ठरावानं; हाई फोडमाईन बाहेर फुटेल महारोगना चट्टा शे.
21 त्यानावरना केस धवळा नही शेतस अनी ती जागा चामडीपेक्षा खोल जायेल नही व्हयी अनी ते बुजी राहीनं शे आशे तपासतांना दखायनं तर त्यानी त्या माणुसले सात दिवस कोंडी ठेवानं.
22 तेवढा मुदतमा ते चामडीवर पसरेल शे आशे दखायनं तर याजकसनी त्या माणुसले अशुध्द ठरावनं अनी ते कुष्टरोगना चट्टा समजानं.
23 तो धवळा डाग जेवढानं तेवढं ऱ्हाईसन ते पसरेल नही व्हई तर ते फोडनं ओळखनं शे आशे समजीसनी याजकसनी त्याले शुध्द ठरावानं.
24 एखादाना चामडीवर जळानं ओळखन व्हई अनी ती ओळखनले मुडदार मासमा लालसर पांढरा नाहिते नुसता पांढरा डाग येयेल व्हई.
25 अनी याजकले तपासनी व्हतांना आशे दखायनं की त्या पांढरा ठिकानवर केस येयल शेतस अनी चामडीपेक्षा ती जागा खोल जायेल शे, त्या जागावर कुष्टरोग फुटेल शे आशे समजानं; याजकनी त्याले अशुध्द ठरावानं, कारण ते कुष्टरोगना चट्टा शे.
26 तरीभी याजकसले आशे दखायनं त्या धवळा जागमा धवळा केस नही शेतस अनी चामडीमा खोल जायेल नही शेतस, बुजी जायं राहीना शेतस, तर त्यानी त्याले सात रोज कोंडी ठेवानं.
27 सातवा रोजले त्यानी त्याले तपाशी दखानं; चामडीना तो डाग पसरेल शे आशे दखायनं त्यानी त्याले अशुध्द ठरावानं. ते कुष्टरोगना चट्टा शे.
28 पण पांढरा डाग जेवढाना तेवढा शे, चामडीवर पसरेल नही शे अनी ते बुजी राहिना शे तर ती जळेल ठिकानले सुज समजानं अनी याजकसनी त्याले शुध्द ठरावानं. कारण ते नुसते जळेल जागवार ओळखन शे.
29 एखादा माणुसनी नाहिते बाईना डोकावर नाहिते दाढीवर चट्टा व्हईते,
30 अनी याजकनी त्यानी तपासनी करानं अनी ती जागा चामडीपेक्षा खोल दखायनी अनी तिनावर काही बारीक केस व्हतीन तर त्यानी त्या माणुसले अशुध्द ठरावानं; हाई चाई डोकानी नाहिते दाढीना कुष्टरोग शे.
31 याजकसनी हाई चाईना चट्टा तपाशी दखानं अनी ते चामडीनापेक्षा खोल नही व्हई अनी त्यानावर काळा केस नही व्हई तर चाईना चट्टा राहेल त्या माणुसले सात रोज कोंडी ठेवानं
32 सातवा रोजले त्यानी परत चट्टासनी तपासनी करानं; ती चाई पसरेल नही, त्यावार काही राखाडी केस नही शेतस अनी चाईना जागा चामडीपेक्षा खोलगट नही व्हयी आशे त्याले दखायनं.
33 तर त्या माणुसनं मुंडन करी टाकानं, पण चाईवरना केस काढानं नही; याजकनी चाई लागेल माणुसले आजुन सात रोज कोंडी ठेवानं.
34 सातवा रोजले याजकनी ती चाई परत तपाशी दखानं अनी त्यासले आशे दखामां व्हनं की चाई चामडीवर पसरेल नही शे अनी ती चामडीपेक्षा ती खोल नही जायेल शे तर त्यानी त्याले शुध्द ठरावानं. त्या माणुसनी आपला कपडा धवानं अनी शुध्द व्हयी जावानं.
35 तरिभी ते शुध्द व्हावानंतर ती चाई पसरत गईते
36 याजकाने त्याले तपासानं अनी ती चाई चामडीवर पसरेल शे आशे दखामां व्हनं व्हयीते राखडी केस दखत बसानं नही तर त्या माणुसले अशुध्द ठरावानं.
37 ती चाई जेवढीना तेवढी शे अनी तिनावर काळा केस येल शेतस आशे जर दखायनं तर ती चाई बरी व्हयेल शे अनी ती शुध्द शे; याजकनी त्याले शुध्द ठरावानं.
38 एखादा माणुसना नाहिते बाईना आंगवर पांढरा चकचकीत डाग व्हतीन ते,
39 याजकनी ते तपासानं अनी त्याना आंगना चामडीनं त्या दाग भुरा व्हतीनते तर ती चामडीले फुटेल दाद समजानं; तो मनुष्य शुध्द शे.
40 एकादा माणुसना डोकाना केस गळीसनी त्याना टक्कल पडेल व्हयी तर तो शुध्द समजानं.
41 त्याना कपाळना पुढला भागना केस गळीसनी त्याना टक्कल पडनं व्हयी तर त्याले शुध्द समजानं.
42 त्या टक्कल पडेल डोकावरना नाहिते कपाळनावरना बाजुले काहिसा लालसर पांढरा चट्टा पडनं तर आशे समजानं की ते टक्कल पडेल डोकावर नाहिते कपाळवर कुष्टरोग फुटीसनी निघि राईना शे.
43 तवय याजकनी त्याले तपाशी दखानं अनी त्याना डोकानं टक्कलमा नाहिते कपाळना वरना भागमा आंगना चामडीनावर कुष्टरोगना मायक तांबूस पांढरा चट्टा शे आशे त्याले दखायनं.
44 तर तो माणूस कुष्टरोग शे अनी तो अशुध्द भी शे, याजकनी त्याले अशुध्द ठरावानं; त्याना डोकाले व्हयेल तो कुष्टरोगना चट्टा शे.
45 ज्या कुष्टरोगना आंगवर हाई चट्टा व्हई त्याना कपडा फाडेल राहावाले पाहिजे, त्याना डोकानं केस सोडेल ऱ्हावाले पाहिजे, त्यानी आपला वरला ओठ झाकीसनी ठेवानं अनी अशुध्द आशे ओरडत ऱ्हावानं.
46 जेवढा दिवस हाई चट्टा त्याना आंगवर ऱ्हाई तेवढा दिवस त्यानी अशुध्द ऱ्हावानं. तो अशुध्द शे, त्यानी एकला ऱ्हावानं अनी छावणीबाहेर त्यानी वस्ती ऱ्हावाले पाहिजे.
खराब कपडाना नियम
47 एखादा कपडाले, मंग तो कपडा लोकरना ऱ्हावो नाहिते सणसना ऱ्हावो, कुष्टरोगना चट्टा पडनं.
48 तो सणसना नाहिते लोकरना ताण्याले नाहिते बाण्याले, चामडाले नाहिते चामडानी बनाडेल वस्तुले पडना.
49 अनी त्या कपडाले, चामडाले, ताण्याले नाहिते बाण्याले अनी चामडाना वस्तुमा पडेल तो चट्टा हिरवट नाहिते तांबुस व्हयना तर ते कुष्टरोगना चट्टा समजानं, अनी याजकले दखाडानं.
50 याजकनी ते तपासानं; चट्टा पडेल वस्तुले सात रोज त्यानी अलग करी ठेवानं.
51 त्यानी सातवा रोज तो चट्टा तपासनं अनी कपडासना ताणावर नाहिते बाणावर, चामडासवर नाहिते चामडासनी कोनतेभी वस्तुवर तो चट्टा पसरेल शे. आशे दखायनं तर ते चढत जाणारा कुष्ठ समजानं, ती वस्तु अशुध्द शे.
52 त्या कपडा लोकरीना ऱ्हावो की सणासना ऱ्हावो, त्यासना बाणामा, चामडामा अनी चामडानी एखादी वस्तुले चट्टा व्हयी तर चढत जाणारा कुष्ठ ऱ्हावामुळे ती वस्तुले आगघाई जाळी टाकानं.
53 तपासणी व्हावानंतर जर याजकले दखामां व्हनं की कपडासना ताणामा नाहिते बाणामां नाहिते चामडाना व्हयेल एखादी वस्तुमां तो चट्टा पसरत नही.
54 तर चट्टा व्हयेल वस्तुले धई टाकानी आज्ञा याजकनी करानं अनी अजुत सात रोज ती अलग करी ठेवानं.
55 ती वस्तु धवानंतर तिले याजकनी दखानं अनी त्या चट्टान रंग बदलेल नही व्हयी अनी ते पसरेल नही व्हयी तरी त्याले अशुध्द समजानं; ती वस्तुले आगमा जाळानं; तो चट्टा मजारमां ऱ्हावो नाहिते बाहेरना बाजुमां ऱ्हावो, त्याले चढत जाणारा चट्टा समजानं.
56 धवामुळे त्या डागना चकचकीतपणा कमी व्हयेल शे आशे जर याजकले दखायनं तर त्यानी कपडासना ताणाना नाहिते बाणासाना नाहिते चामडासना वस्तुसना तेवढाच भाग फाडी टाकानं.
57 एवढं करिसनीबी जर कपडासना ताणामां नाहिते बाणामां नाहिते चामडानी वस्तुमा तो चट्टा परत फुटीसनी व्हनं तर ती चट्टा फुटेल वस्तुले आगमा जाळी टाकानं.
58 कपाडासना ताणा नाहिते बाणा नाहिते चामडानी कोनतीबी वस्तुले धवानंतर त्याना ते डागना नायनाट व्हयनं तर ती वस्तुले परत एकदाव धवानी म्हणजे ती शुध्द व्हयी.
59 लोकरनं नाहिते सणासना कपडासना ताणामा नाहिते बाणामा नाहिते चामडामा एखादा वस्तुले कुष्टरोगना डाग दखामां व्हनं तर शुध्द नाहिते अशुध्द ठरावानं हाई नियम शेतस.