16
प्रायश्चितना दिन
1 अहरोना दोन पोर्या परमेश्वरनाजोडे जावामुळे मरनात परमेश्वरनी मोशेले सांग बोलना;
2 परमेश्वरनी मोशेले सांग; तुना भाऊ अहरोन याले सांग, कोशवर शे ते दयासनामोरे अंतरपटना मजारना पवित्र स्थानमा तु कवयभी जावानं नही, गया ते मरशी, कारण दयासना मेघवर मी दर्शन देस राहासु.
3 जवय अहरोन पवित्रस्थानमां प्रवेश करी तवय त्यानी पापार्पण कराकरता एक बैल अनी होमार्पण कराकरता एक मेंढा लयी येवानं.
4 त्यानी सणना कपडाना पवित्र अंगरखा घालानं, सणना कडाना चोळणीघाई आपला आंग झाकानं सणना कमरबंदघाई आपली कंबर बांधानी अनी सणना फेटा बांधानं, हाई बठा पवित्र कपडा शेतस; त्यानी पाणीघाई स्नान करीसन हाई कपडा घालीसनी येवानं.
5 मंग त्यानी इस्राएलना मंडळीकडतीन पापार्पण कराकरता दोन बोकडया अनी होमार्पणना एक मेंढा लयी येवानं.
6 अहरोननी त्यानाकरता आणेल पापार्पणना बैल अर्पण करिसनी सोताकरता अनी स्वताना घराणाकरता प्रायश्चित करानं.
7 मंग त्यानी त्या दोन बोकडया लईसनी दर्शनमंडपना दारपान परमेश्वरनीमोरे ठेवानं.
8 अहरोननी त्या दोन बोकडयासवर चिठया टाकानं, एक चिठी परमेश्वरकरता अनी दुसरी पाप वाही लयी जावाकरता.
9 ज्या बोकडयासवर परमेश्वरनी नावनी चिठी निघी ते अहरोननी पापार्पण म्हणीसनी बळी देवानं.
10 ज्या बोकडयासवर पाप वाही लयी जावानं बारामां चिठी निघी त्याले परमेश्वरनीमोरे जीवता उभा करानं अनी त्यानाकडतीन प्रायश्चित व्हावाले पाहिजे; अनी तो बोकडया पाप वाही लेवाकरता जंगलमां सोडी देवानं.
11 मंग सोताकरता पापर्पण कराना वासरु अहरोननाजोडे आणानं अनी ते मारीसनी आपलाकरता अनी आपला घरानाकरता प्रायश्चित करानं.
12 अनी परमेश्वरनीमोरे राहेल वेदीनावरतीन जळेल निखारासना भरेल धुपाटनं लेवानं अनी कुटेल बारीक ओंजळभर सुंगधी धूप आंतरपटना मजारमा लयानं.
13 ते धुप परमेश्वरनीमोरे आगवर आशे घालानं की त्याना धुरघाई साक्षपटलनावरना दयासनले भरि टाकानं, म्हणजे ते मराऊ नही.
14 मंग त्यानी बैलन काही रंगत दयासननं पूर्व भागले बोटघाई शितडानं; अनी ते रंगत बोटघाई त्या दयासननामोरे सातदाव शितडानं.
15 मंग त्यानी लोकेसनीकरता आणेल पापार्पणना बोकडया मारानं; त्याना रंगत अंतरपटना मजार लयी जावानं अनी जशे त्यानी वासरुना रंगतना करानं तशे बोकडयानं रंगतनं करानं, म्हणजे ते दयासननावर अनी दयासननामोरे शितडानं.
16 आजून त्यानी इस्राएल लोकेसनी अशुध्दता अनी अपराध यानाकरता म्हणजे त्याना बठा पापसकरता पवित्रस्थानकरता प्रायश्चित करानं; माणसासनी अशुध्दताघाई व्याप्त व्हईसनी त्यासनामा राहणारा दर्शनमंडपनाकरता तशे करानं.
17 अहरोन प्रायश्चित कराकरता पवित्रस्थानमां प्रवेस करी तवयपाईन तो आपलाकरता, आपला घराणाकरता अनी इस्राएलनी बठी मंडळीकरता प्रायश्चित करीसनी बाहेर येईपावोत त्या दर्शनमंडपमा दुसरा कोणी भी माणुस नही राहावाले पाहिजे.
18 मंग तो तथाईन निघीसनी परमेश्वरनीमोरे वेदीनाजोडे जाईसनी तिनाकरता प्रायश्चित करानं; बैल अनी बोकडयानं काही रंगत लयीसनी ते वेदीनं चारी बाजुना शिंगासले लावानं.
19 अनी काही रंगत लयीसनी आपला बोटघाई सातदाव तिनावर शितडीसनी ती इस्राएलना अशुध्दतापाईन मुक्त करीसनी पवित्र करानी.
प्रायश्चितना बोकड्या
20 मंग पवित्रस्थान, दर्शनमंडप अनी वेदी यानाकरता प्रायश्चित करानं सरानंतर तो जीवता बोकडया जोडे आणानं.
21 अहरोनी आपल दोन्ही हात ते जीवत बोकडयानं डोकावर ठेईसनी इस्राएल लोकेसनी बठा दुष्कर्म अनी अपराध यासना म्हणजे बठा पापना अंगीकार करानं; अनी ती बठी तो बोकडयानं डोकावर ठेईसनी त्याले नेमेल माणुसनी हातघाई जंगलमा धाडी देवानं.
22 तो बोकड त्याना बठा दुष्कर्मना भार त्यानावर लिईसनी त्या बोकडयाले जंगलमा सोडी देवानं; त्या मानुसनी त्या बकराले जंगलमा सोडी देवानं.
23 मंग अहरोन दर्शनमंडपमा येईसनी पवित्रस्थानमा जावानी आगोदर परिधान करेल सणसना कपडा काढीसनी ठेई देवानं
24 मंग त्यानी एकादा पवित्र ठिकाणले पाणीघाई स्नान करानं अनी आपला कपडा घालीसनी बाहेर जाईसनी सोताकरता अनी लोकासना होमर्पण करीसनी सोताकरता अनी लोकसकरता पापछाकी.
25 पापार्पणना चरबीना त्यानी वेदीवर होम करानं
26 पाप वाही लयी जावानीबारामा बोकडं ज्या माणुसनी सोडेल शे त्यानी आपला कपडा धवानं, पाणीघाई आंग धवानं अनी मंग छावणीमा येवानं.
27 पापार्पणना ज्या बैल अनी पापार्पणना ज्या बोकडयासना पवित्र ठिकाणले प्रायश्चित कराकरता लयी जावामा येई, त्या दोन्ही तळनाबाहेल लयी जावानं अनी त्याना कातडा, मास अनी शेन हाई आगमा जाळी टाकानं.
28 ते जाळणारानी आपला कपडा धवानं, पाणीघाई स्नान करानं अनी मंग छावणीमा येवानं.
पापझाकाना दिन मानानं
29 तुम्हले कायमनं आशे नियम राहावाले पाहिजे; सातवा महिनानी दशमीले तुम्ही आपलं जीवले त्रास देवानं; त्यारोजले काम करानं नही, मंग ते स्वदेशना राहो की तुम्हना राहणारा परदेशी राहो.
30 कारण त्यारोज तुम्ही शुध्द व्हावानं म्हणीसनी तुमनाकरता प्रायश्चित करामा येई; पमेश्वरनीमोरे तुम्ही आपला बठा पापसपाईन शुध्द ठरावामा येई.
31 तुम्हले हाई परम विश्रामनं शाब्बाथ शे; हाई रोज तुम्ही आपला जीवले क्लेश देवानं. हाई कायमनी विधी शे.
32 ज्याले आपला वडीलनं जागवर याजक व्हावाकरता अभिषेक अनी शुद्ध व्हई त्यानी प्रायश्चित करानं; म्हणजे सणना कपडा घालीसनी.
33 पवित्र स्थान, दर्शनमंडप अनी वेदी यानाकरता त्यानी प्रायश्चित करानं अनी याजक अनं मंडळीमासला दुसरा बठा माणसे यासनाकरताभी प्रायश्चित करानं.
34 इस्राएल लोकेसकरता वर्षमा एकदाव त्यासना बठा पापसना प्रायश्चित करानं, म्हणीन हाउ तुमले कयमना नियम शेतस, परमेश्वरनी मोशेले आज्ञा देल परमानी त्यानी करं.