2
अन्नार्पण
ज्‍या कोणी परमेश्‍वरले अन्नार्पण करानं व्‍हई तर त्यानी मैदाना अर्पण करानं. त्‍यानावर तेल टाकीसन लोबान ठेवानं. त्यानी ते अहरोना पोर्‍या ज्‍या सेवक शेतस त्‍यानाकडे आनानं. त्‍यामाईन मुठ भरीसन मैदा, तेल अनं सर्वा लोबान संगे आणीसन सेवकसनी स्‍मारकभाग म्‍हणीसन त्‍याना वेदीवर भेट करानं. अर्पण माईन जे काही उरी ते अहरोना अनं त्‍याना पोर्‍यासना व्‍हई; हाई उरेल भेट परमेश्‍वरले नवस करानं जी भेट हवन त्‍यामासला परम पवित्र शे. भट्‍टीमा भाजेल अर्पण करानं व्‍हईते ते तेलमा मळेल मयदान्‍या बेखमीर भाकरी नाहीते तेलमा चोपडेल बेखमीर चानक्‍या राहावाले पाहीजे. तवामां भाजेल भेट करानं व्‍हई ते तेलघाई मळीसनी बेखमीर मयदानं ऱ्हावाले पाहीजे. त्‍याना दाखला दाखली तुकडा करीसनी त्‍यानावर तेल टाकानं, हयाले अन्नार्पण म्‍हणतस. कढाईमा तळेल अर्पण करानं व्‍हई ते बी तेलघाई मळीसनी बेखमीर मैदानं ऱ्हावाले पाहीजे. हाई पध्‍दतमां अर्पण लयी येवानं; ते परमेश्‍वरना देखत आणानं, सेवकसकडे आणानं. त्‍यानानंतर सेवक ते वेदीनाजोडे लई जाई. सेकवकसनी अर्पण माईन स्‍मारकभाग काडीसनी त्‍याना वेदीवर होम करानं. तवय ते परमेश्‍वरना करता सुवासिक भेट व्‍हई. 10 अर्पण माईन जे काही उरी ते अहरोनना अनं त्‍याना पोर्‍यासना व्‍हई, हाई उरेल परमेश्‍वरले नवस करानं जे भेट त्‍यामासला परम पवित्र शे. 11 परमेश्‍वरले अर्पण करेल कोणते भी अर्पणमाईन खमीर ऱ्हावाले नही पाहीजे, खमीर नाहिते मध हयाना अग्‍नीमा हवन करीसनी ते परमेश्‍वरले अर्पण करानं नही. 12 पहिला फळ म्‍हणीसनी त्‍याना अर्पण परमेश्‍वरले करानं; पण ते सुवासिक हवन म्‍हणीसनी वेदीवर अर्पण करानं नही. 13 तू बनाडशी त्‍या सर्वा अर्पण मिठघाई चवदार बनाडानं; तू आपले देवनीसंगे करेल करारनं मिठ आपले अर्पणमा घालाले चुकानं नही. तुना सर्वा अर्पण मिठना ऱ्हावाले पाहीजे. 14 परमेश्‍वरनी करता तु अर्पण म्‍हणीसनी पहिला पिक अर्पण करशी तवय ईस्‍तववर भाजेल हीरवा कनससना दाना; म्‍हणजे हिरव्‍या कनससले चोळीसनी काढेल उंब्‍या पहिला पिक अर्पण म्‍हणीसनी लय; 15 त्‍यानावर तेल टाक अनं लोबान ठेव; हयाले म्‍हणतस अन्नार्पण. 16 चोळीनी काढेल दाना अनं तेल यानामाईन जरासा अनं सर्वा लोबान स्‍मारकभाग म्‍हणीसनी सेवकसनी जाळनं; हाई परमेश्‍वरनी करता हवन शे.