25
सातवा वरीस
(अनुवाद 15:1-11)
1 परमेश्वरनी सीनाय पर्वतपान मोशेले बोलना
2 इस्राएल लोकेसले आशे सांग; जो देश मी तुम्हले दि राहीनूं शे तठे तुम्ही जाशाल म्हणजे परमेश्वरकरता विश्राम मिळाडानं.
3 सहा वरिश शेती करानीस अनी सहा वरिश द्राक्षमळानं छाटनी करीसनी त्याना उत्पन्न जमा करानं.
4 पण सातवा वरिशले जमीनले परमविश्रामना शब्बाथ परमेश्वरकरता राहावाले पाहिजे. त्या वरिशले वावरमां पैरानं नही नाहिते छाटनी करानं नही.
5 त्यानात्याना उगेल धान्य कापानं नही; छाटनी नही व्हयेल द्राक्षयेलना फळ तोडानं नही; जमीननं परमविश्रामना ते वरिश राहावाले पाहिजे.
6 जमीनना विश्रामकालना उपजवर तुम्हना, तुम्हना दासदासीले, तुम्हना मजुरसले, अनी तुम्हनासंगे राहानारा परदेशीसले जेवण भेटी;
7 तुम्हना पशू अनी देशमासला जनावरं यासले जमीननं बठा उत्पन्न खावाले भेटी.
स्वतंत्रना वरीस
8 सात विश्रामवरिश म्हणजे सात गुना सात एवढा वरिश मोजानं; या सात विश्राम वरिशना काळ एकूणपन्नास वरिश शेतस.
9 मंग सातवा महीनानं दशमीले म्हणजे प्रायश्चितना दिवसले महानांदना शिंग देशमा बठीकडे फुकानं.
10 त्या पन्नासावा वरिसले पवित्र मानानं अनी देशमासला बठा रहिवाशीसले मोकळ करानी घोषणा करानी; हाई वरिसले तुम्ही योबेल म्हणानं; हाई वरिसले तुम्ही ज्यानात्याना वतनमां अनी आपआपला घर परत जावानं.
11 हाई पन्नासाव वरिश तुम्हले योबेल वरिस शे; हाई वरिशले तुम्ही काही पैरानं नही, त्यानात्यान उगेल कापानं नही अनी छाटनी नही व्हयेल द्राक्षयेलनं फळ खूडानं नही;
12 कारण हाई योबेलनं वरिश शे; हाई तुम्हले पवित्र राहावाले पाहिजे; हाई वरिशले तुम्हले वावरमा जे सापडी ते खावानं.
13 हाई योबेल वरिश तुम्ही बठासनी आपआपला वतनमा परत जावानं.
14 जवय तुम्ही आपल भाउबंदसले काही विकशाल नाहिते त्यासनाकडतीन विकत लिद् तवय येरायेरवर अन्याय करानं नही.
15 योबेल वरिशनंतर जेवढा वरिश व्हयेल व्हतीन त्यासना आकडापरमानं आपला भाउबंदसपाईन मोल लेवानं अनी तेवढा वरिशना उत्पन्नपरमानं त्यानी विक्री करानी.
16 त्या वरिशना आकडा जास्त व्हतीन ते त्या मनतीन मोल कमी करानं; कारण जेवढा पिक व्हयले व्हतीन त्यासना हिशोबतीन त्यानी ती विक्री करानी.
17 तुम्ही येरायेरवर अन्याय करानं नही; तर आपला देवले भिवानं, कारण मी परमेश्वर तुम्हना देव शे.
सातवा वरिसनं संकट
18 हयानाकरता तुम्ही मना विधी मानानं अनी मना नियमकडे ध्यान देवानं अनी ते पाळानं; आशे करानंतर तुम्ही देशमा बेफिकीर राहावानं.
19 भुमी आपला उपज देई अनी तुम्ही पोटभर खाशा; तठे वस्तीमा सुकीतीन राशात.
20 तुम्ही कदाचित बोलशात, आम्ही सातवा वरिशले काय खावानं? कारण त्या वरीशले आम्हले पैरानं नही अनी वावरमा उत्पन्न जमा करानं नही.
21 तर मी सहावा वरिशले आशी बरकत दिसु की, जमीन तुम्हले तीन वरिशनं उत्पन्न देई.
22 मंग आठवा वरिशले तुम्ही पैरशात तवय जुना साठा तुम्ही खात राहाशात; नववं वरिशनं पिक हातमा येस तोपावोत त्या वरिशले तुम्ही जुना साठा खात राहाशात.
जमिन सोडावाना नियम
23 जमीन ईकानी शे म्हणीसनी ती कायमनी ईकानी नही; कारण जमीन मनी शे अनी तुम्ही मना आश्रयले परदेशी अनी उपरि राहानार शेतस.
24 म्हणुन तुम्हना वतनना बठा व्यवाहरमा जमीन सोडानाबारामा तुम्ही तरतूद करानी.
25 तुम्हना भाऊबंदसमाईन कोणी कंगाल व्हयीसनी त्यानी आपला वतनना काही भाग ईकी दिधा तर त्याना नातेवाईकसनी समोर येईसनी आपला भाउबंदसनी ईकेल भाग सोडी लेवानं
26 जर त्या माणुसना कोणी नातेवाईक नही व्हतीन ज्या ते सोडतीन, अनी आपला वतनभाग सोडवता येई एवढी ऐपत त्यानी व्हयनी,
27 तर त्यानी ते वतन ईकी टाकं व्हयीते तर त्या वरिसपाईन हिशोब करीसनी बाकीना वरिसना उत्पन्न ईकत लेनाराले देवानं अनी आपला वतनले परत जावानं.
28 पण ते वतन परत मिळाडानीकरता त्यानी ऐपत नही व्हयी तर आपली ईकेल जमीन ईकत लेनारानी ताबामा योबेल वरिशपावोत राहू देवानं; योबेल वरिशले ती सुटी तवय त्यानी आपला वतनले परत जावानं.
29 एकादा माणुसनी तटबंदीना नगरमासला घर ईकं तर त्यानी ईकानंतर एक वरिशना आगोदर पैसा देईसनी त्याले सोडवता येई; पैसा देईसनी त्याले सोडता येई; पैसा देईसनी सोडावानं हक्क त्याले पुरा एक वरिश राही.
30 एक पुरा वरिशना आगोदर ते सोडावं नही तर तटबंदिना नगरमासला घर ईकत लेनारानी व्हयी जाई अनी पिढयानपिढया त्याना वंशमा कायम राही. योबेल वरिश ते सुटाऊ नही.
31 पण बिगर तटबंदिना खेडामा ज्या घरे व्हतीन त्या देशमा शेतनासारखं समजानं; ती सोडा येतीन अनी योबेल वरिशले त्यासनी सुटका व्हयी.
32 लेवीसना वतनना नगरमा बांधेल घरं लेवीसले पाहीजे तवय सोडावता येई.
33 एकादा लेवीनं घर दुसरा एकादानी सोडाई लिद् तर त्याना वतनना नगरमासला त्यानं ते ईकेल घर याबेल वरिसले सूटी; कारण इस्राएलमा लेवीसना वतन म्हणं म्हणजे त्यासना नगरमासला घरच शेतस.
34 त्या नगरनी शिवारनी जमीन ईकानी नही; ते त्यासना कायमनं वतन शे.
गरीबसले उधार देवानं
35 तुना कोनी भाऊ कंगाल व्हयना अनी त्याना हात काम नही करी राहिना आशे तुले दखायनं तर तु त्याले आधार देवानं. परदेशीपरमानं नहीतर उपर्यासपरमानं तो तुना जोडे राही.
36 त्यानापाईन व्याज किंवा फायदा लेवानं नही; आपला देवले भ्याईसनी आपलाजोडे आपला भाऊसले राहु देवानं.
37 तु आपला पैसा त्याले व्याजतीन देवानं नही; नाहितर आपला दाणा गोटा वाढीदीडीसनी त्याले देवानं नही.
38 मी परमेश्वर तुमना देव शे; तुम्हले कनान देश देवानं अनी तुम्हना देव व्हवानं म्हणीसनी मी तुम्हले मिसर देशमाईन तुम्हले बाहेर आणेल शे.
दासले सोडावाना नियम
39 तुना कोनी भाऊबंद तुनामोरे कंगाल व्हयनं अनी त्यानी स्वताले ईकी टाक तर त्यानापाईन सेवा करी लेवानं नही.
40 मजुरना सारखा नाहिते उपर्यासपरमानं तो तुनाजोडे राहावले पाहिजे; योबेल वरिशपावोत तो तुना सेवाचाकरी करी.
41 त्या वरिशले आपला पोर्यासोर्यासंगे त्यानी तुनापाईन निघीसनी आपला कुटूंबमा अनी आपला वाडवडीलसनीसंगे वतनमा परत जावानं.
42 कारण मिसर देशमाईन मी ज्यासले काढेल शे त्या मना सेवक शेतस; दासपरमानं त्यासनी विक्री करानं नही.
43 कठोरनागतक त्यानावर अधिकार चालाडानं नही; आपला देवले भिवानं.
44 तुम्हले दास अनी दासी ठेवानं व्हतीन त्या तुम्ही दुसरा देशमाईन लयी येवानं; दास अनी दासी हया त्यासमाईन ईकत लेवानं.
45 तुमनामा येईसनी राहेल ज्या उपरी लोक अनी त्यासना पोटी जो घराना तुम्हना देशमा पैदा व्हयेल शेतस त्यासनामाईन तुमी दास अनी दासी ईकत लेवानं, ती तुम्हनी मालमता शे.
46 तुम्ही आपलामागे आपला पोर्यासले त्यासना ताबा देवानं, अनी ती त्याना वतनभाग व्हयी; त्या माणसासमाईन तुम्हले कायमनं दास करता येई, पण तुम्हना इस्राएल भाऊबंदसनी तिकडलातिकडे आपला अधिकार कठोरतीन चालाडानं नही.
47 तुना गावामा राहेल परदेशी नाहिते उपरी धनवान व्हयेल शे अनी त्यानाजोडे राहेल तुना एकादा भाऊ कंगाल व्हयीसनी त्यानी स्वताले त्या परदेशीसले नाहिते उपरी माणसुले नाहिते त्यासना वंशमासला कोणले ईक व्हयी.
48 तर त्यानी ईक्री व्हावानंतर त्याले सोडावता येई, त्याना भाऊबंदसमाईन कोणलेबी त्याले सोडावता येई.
49 आपला चुलता, आपला चुलत भाऊ नाहिते आपला कूळमाईन कोणी जोडेना नातेवाईक यासले त्याले सोडावता येई नाहिते तो स्वतः धनवान व्हयेल शे तर त्याले आपली सुटका करता येई.
50 ज्यानी त्याले ईकत लिधं व्हयी त्यानाजोडे त्यानी आपली विक्रीना वरिशपाईन ते योबेल वरिशपावोत हिशोब करानं; वरिशना आकडापरमानं विक्रीना दाम ठरावानं; मजुरना रोजपरमानं दाम लेता येवाले पाहिजे.
51 योबेल वरिशले बराच वरिश राहातीन, तर जेवढी रकमले त्यानी विक्री व्हयेल शे, त्यासमाईन आपला भागना दाम, त्या वरीशना आकडापरमानं त्याले परत देवानं.
52 योबेलले थोडा वरिश व्हतीन तरिबी त्यानी आपला मालकना हिशोब करिसनी आपला भागना दाम तेवढा वरिशना त्याले परत देवानं.
53 त्यानी आपला मालकनासंगे सालदारपरमानं राहावानं, त्याना मालकनी तुनामोरे त्यानावर कठोरतीन अधिकार चालाडानं नही.
54 हाई परकारं त्यानी सुटका नही व्हयनी तर योबेल वरिश तो आपला पोर्यासोर्यासंगे सटी जावानं.
55 कारण इस्राएल लोक मना दास शेतस, मिसर देशमाईन काढेल हया मना दास शेतस, मी परमेश्वर तुमना देव शे;