8
अहरोन अनी त्याना पो-या हयासना समर्पन
परमेश्‍वर मोशेले बोलना तु अहरोन अनी त्‍यानासंगे त्‍याना पोर्‍या यासले अनी त्‍यासना कपडा, अभिषेकना तेल पापबलिकरता बैल, दोन मेंढा अनी बेखमीर भाकरीसनी टोपली लईसनी. दर्शनमंडपना दारपान ये अनी तठे बठी मंडळीसले जमा कर. परमेश्‍वरनी आज्ञापरमानं मोशेनी करं अनी मंडळी दर्शनमंडपना दारपान जमा व्‍हयनी. मोशेनी मंडळीले सांग, परमेश्‍वरनी जे काही करानी आज्ञा देयेल शे ती आशी; मोशेनी अहरोन अनी त्‍याना पोर्‍या यासले आणीसनी त्‍यासना जलस्‍नान करं. मंग त्यानी त्‍यासले कपडा घाला, त्‍यासना करमरले कमरबंद बांध, झगा घाल, त्‍यानावर एफोद* घाला अनी नक्षीदार पट्टी एफोदनावरतीन तानीसन बांधी. मंग त्यानी त्‍यानावर उरपट बांधा अनी त्‍यानामां उरीम अनी थुम्‍मीम ठेव. मंग त्‍याना डोकामा फेटा घाला अनी फेटाना समोरना भागमा सोनानी पट्टी म्‍हणजे पवित्र मुकूट लावं, परमेश्‍वरनी मोशेले आज्ञा देयेल परमानं हाई व्‍हयनं. 10 मंग मोशेनी अभिषेकना तेल लईसनी निवासमंडपले अनी त्‍यामासले बठया वस्‍तुसले अभिषेक करीसनी पवित्र करं 11 त्‍यामाईन काही तेल लईसनी त्यानी वेदीवर सातदाव शितडानं अनी वेदी, तिना बठा उपकरणं, गंगाळ अनी त्यानी बैठक याले अभिषेक करीसनी त्‍याले पवित्र करं. 12 त्यानी अभिषेकना काही तेल लईसनी अहरोना डोकावर वतं. हाईपरमानं अभिषेक करीसनी त्‍याले पवित्र करं. 13 मंग मोशेनी अहरोना पोर्‍यासले आणं, त्‍यासले कपडा घालात, कमरले कमरबंद तानीसनी बांध अनी त्‍यासले फेटा बांध. परमेश्‍वरनी मोशाले आज्ञा करं होत तशे हाई व्‍हईनं. 14 मंग त्यानी पापार्पणना वासरु आणं अनी अहरोन अनी त्‍याना पोऱ्‍या यासनी अपला हात त्‍या पापार्पणना बैलना डोकावर ठेवं. 15 ते मारा नंतर माशेनी त्‍यानं रंगत लिसन त्‍याना बोटघाई वेदीना चारी शिंगसना चारीबाजूले लाईसनी ती शुध्‍द करं अनी ते रंगत वेदीना पायनाजोडे वतं अनी तिनाकरता प्रायश्‍चित करीसनी तिले पवित्र करं. 16 मोशेनी आतडयासवरना बठी चरबी, काळीजनीवरना पडदा अनी चरबीनीसंगे दोन्‍ही गुर्दा हाई लईसनी त्‍याना होम करी टाकं. 17 बैल, त्‍याना कातडा, त्‍याना मास अनी त्यानी ईष्‍टा हाई बठी तळनीबाहेर लईसनी ते आगघाई जाळी टाकं. परमेश्वरनी मोशेले आज्ञा देयलपरमानं त्यासनी हाई करं, 18 मंग त्यानी होमबळीना मेंढा जोडे आनं तवय अहरोना अनी त्‍याना पोर्‍या यासनी त्‍यासना हात मेंढासना डोकावर ठेवं. 19 त्‍याले मारा नंतर मोशेनी त्‍याना रंगत वेदीना चारीबाजूले शितडां 20 मंग त्‍या मेंढाना तुकडा करा अनी मोशेनी त्‍याना डोका, त्‍याना मासना तुकडा अनी चरबी हयाना होम करं. 21 आतडा अनी पाय पाणीघाई धईसनी मोशानी बठा मेंढाना होम करी टाकं, ते परमेश्‍वरकरता सुवासीक होमबळी व्‍हयना; परमेश्‍वरनी मोशेले आज्ञा करी व्‍हती तशे हाई व्‍हयनं. 22 मंग त्यानी दुसरा मेंढा मनजे समर्पणाना मेंढा जोडे आणा, अहरोन अनी त्‍याना पोर्‍या यासनी त्‍यासना हात मेंढाना डोकावर ठेवं. 23 ते मारानंतर त्‍याना काही रंगत मोशेनी लईसनी अहरोनना उजवा कानना शेंडाले, उजवा हातना अंगठाले अनी उजवा पायनी अंगठाले लावं. 24 मंग मोशेनी अहरोनना पोर्‍यासपान आनीसनी त्‍याना उजवा कानना शेंडाले, उजवा हातना अंगठाले अनी उजवा पायना अंगठाले लावं. मंग मोशेनी वेदीना चारीबाजूले शितडं. 25 त्यानी चरबी, चरबीदार शेपटी आतडयासवर राहेल बठी चरबी, काळीजनीवरना पडदा, दोन्‍ही गुर्दा, त्‍यानवरनी चरबी अनी उजवा फरा हाई काढी लिदी. 26 परमेश्‍वरनीमोरे ठेयेल बेखमीर भाकरीन्‍या टोपलीमाईन एक भाकर, तेल लायेल एक पोळी अनी एक पोळी लईसनी त्‍या चरबीवर अनी उजवा मांडीवर ठेवं. 27 हाई बठा त्यानी अहरोनना अनी त्‍याना पोर्‍यासनी हातसवर ठेवं अनी परमेश्‍वरनीमोरे ओवाळणीनं अर्पण म्‍हणीसनी ते ओवाळानं. 28 मंग मोशेनी त्‍यासना हातमाईन लईसनी त्‍यासना वेदीनावरना होमबळीवर होम करं; हाई समर्पणना परमेश्‍वरनीकरता सुवासिक भेट व्‍हयनं. 29 मंग मोशेनी ऊर लईसनी परमेश्‍वरनीमोरे ओवाळणीनं अर्पण म्‍हणीसनी ओवाळी लिदं, समर्पणना मेंढाना हाई भाग मोशाना व्‍हता. परमेश्वरनी मोशेले आज्ञा करी व्‍हती तशे हाई व्‍हयनं. 30 मंग मोशेनी अभिषेकना तेल अनी वेदीनावरना रंगत थोडासा लईसनी अहरोन अनी त्‍याना कपडा, त्‍याना पोर्‍या अनी त्‍यासना कपडा यासवर शितडं अनी अहरोन अनी त्‍याना कपडा अनी त्‍यान पोर्‍या अनी त्‍यासना कपडा पवित्र करं. 31 मोशेनी अहरोन अनी त्‍याना पोर्‍या यासले सांग, हाई मास दर्शनमंडपना दारपान शिजाडानं अनी तठे समर्पणना टोपलीमाईन भाकरीनासंगे ते खा. अहरोन अनी त्‍याना पोर्‍या यासनी ते खावानं आशी आज्ञा मी देयेल शे. 32 मास अनी भाकरी यामाईन जे काही उरेल व्‍हयी ते आगमा जाळी टाकानं. 33 तुम्‍हना समर्पणनी विधीना दिवस पुरा व्‍हतस तोपावत म्‍हणजे सात दिवस दर्शनमंडपना दारनामोरे जावाले नही पाहिजे, कारण सात दिवसपावोत तुम्‍हना समर्पणनी विधी व्‍हई. 34 तुम्‍हनाकरता प्रायश्‍चित व्‍हावाले पाहिजे‍ म्‍हणीसनी आज करं त्‍यापरमान करानी आज्ञा परमेश्‍वरनी देयेल शे. 35 हाई परकारे तुम्‍ही दर्शनमंडपना दारपान सात दिवस रात्र अनी दिवस राहीसनी परमेश्वरनी आज्ञापरमाने वर्तन करानं. नहीते तुमीन मरशात; कारण माले आशी आज्ञा शे. 36 परमेश्‍वरनी मोशेनीव्दारे ज्‍या गोष्‍टीनीबारामा आज्ञा करेल व्‍हता त्‍या सर्वा अहरोन अनी त्‍याना पोर्‍या यासनी करं.
* 8:7 एफोद याजसना कपडा