2
गरिबसले छळनारासना धिक्कार
ज्या अनर्थासना संकल्प करतस अनं बिछान्यावर पडी पडीसन दुष्टतानी योजना करतस त्यासले धिक्कार असो! सकासले उजाया व्हताच त्या आपला बेत सिध्दीमा नेतस, कारण हाई करानं सामर्थ्य त्यासना हातमा शे. त्या वावरना लोभ धरीन हिसकाई लेतस, घरना लोभ धरीन त्यानावर ताबा बसाडी लेतस; आशे त्या मानसंसवर अनं त्याना घरवर, अनं त्याना वतनवर जुलूम करतस.
म्हणीन परमेश्वर सांगस, दखा, या वंशना ईरोधमा संकट मी योजी राहिनु शे; त्याना दुसेरनाखालतीन तुमले आपली मान काढता येवाव नही; तुमले ताठ मान करीसनं चालता येवाव नही; कारण प्रसंग वाईट शे. त्या दिनमा लोक तुमले आड लाईसन बोलतीन, विवळीन शोक करतीन अनं सांगतीन, आमना पुरा नाश व्हयना शे. त्यानी मना लोकसना वाटा परकीसना स्वाधीन करेल शे; तो मनपाईन कस काय काढी लेल शे! आमनं क्षेत्र धोका देणारासले त्यानी वाटी देल शे.
परमेश्वरनी मंडळीमां चिठ्ठी टाकीसन अनी दोरी मोजीसन जमीन वाटनारा कोनीच ऱ्हावावू नही अनी तुमले जमीनना हिस्साबी भेटाव नही. “भविष्य सांगनारा सांगस की, तुम्हीण भविष्य सांगानं नही, ह्यानाबारामा भविष्य करु नको, ज्यामुये अपमान व्हवावू नही.” ज्यासले याकोबना घराणामाधलं सांगतस, त्या तुम्हीन लोकसवनं, परमेश्वरना आत्मा कमी सहनशील शे का? हाई त्यानं करणं शे का? मनं वचनं सरळपणतीन वर्तन करनारासना बरं करस नही का? तरीबी मना लोके शत्रुनामायक उभा राही जायेल शेतस, ज्यासले युध्द कराले नही आवडस, आशे ज्या चुपचाप जोडेतीन निघी जातस त्यासले मना वचन बरं करस नही. तुम्हीन मना लोकसना बायासले त्यासना सुखमाईन काढडतस, त्यासना पोऱ्यासपाईन मना आशिर्वाद कायमना काढी लेतस. 10 उठा, चालता व्हा, हाई तुमना विश्रांतीना स्थान नही शे; कारण अशुध्दतामुये नाश, सर्वा नाश व्हई. 11 वायफळ अनं खोटा चालीना कोणी माणूस खोटा बोलीन सांगी की द्राक्षरस अनं दारु यासना मी प्रचार करीन, तर तो या लोकसना संदेष्टा व्हई. 12 हे याकोबा, मी तुमले सर्वासले खरच एकत्र करसु; इस्त्राएलना अवशेष मी निश्चय जमा करसु; मी त्यासले मेंढवाडामासला मेंढरंसनामायक एकत्र करसु, लोकसमुदाय मोठा रावामुये कुरणमाधलं कळपनामायक त्या गजबजतीन. 13 फोडतोड करनारा त्यासनापुढे चाली राहिना शे; ते फोडीन वेशीमाईन पार निंघी जायेल शे; त्यासना राजा त्यासनापुढे चाली राहिना शे अनं परमेश्वर त्यासनी वाट दखाडनारा शे.