3
मीखानाव्दारा इस्त्राएलना नेतासनी निंदा
1 मी बोलनु, याकोबना प्रमुखसवनं, इस्त्राएल घराणासना सरदारसवनं, ऐका, न्यायनी जाणीव तुमले नको ऱ्हावाले का?
2 तुम्हीन बराना द्वेष करतस अनं वाईटनी आवड धरतस; तुम्हीन लोकसना कातडं सोली काढतस अनं त्यासना हाडवरना मांसना लचका तोडतस;
3 तुम्हीन मना लोकसना मांस खातस, त्या त्याजवरना कातडं सोली काढतस, हांडीमां टाकेल नहीते कढईमा असेल मांसना तुकडाप्रमाणं त्या त्यासना हाडे मोडीसन तुकडा तुकडा करतस.
4 त्या येळले त्या परमेश्वरले आरोळ्या मारतीन तरी तो त्यासना ऐकावू नही; तो त्या येळले त्यासनाकडेन आपले तोंड फिराई कारण त्यासनी दुष्कृत्ये करेल शेतस.
5 ज्या संदेष्टे मना लोकसले बहकवतस, काही खावाले भेटनं तर कल्याण असो, अश ज्या म्हणतस अनं ज्यानापाईन त्यासले खावाले भेटस नही त्यासनाबरोबर लढाले ज्या तयारी करतस, त्यासनाईषयी परमेश्वर अश म्हणस.
6 तुमनावर रात जाईसन तुमले दृष्टांत व्हवाव नही; तुमनावर अंधार पडीन तुमले भविष्य सांगता येवाव नही; संदेष्ट्यावर सुर्य मावळी, त्यासना दिनलेच काळोख व्हई.
7 दृष्टांत दखणारा लज्जीत व्हतीन, ज्योतिषी फजीत व्हतीन; त्या सर्वा आपली ओठ झाकतीन कारण देवकडतीन काहीच उत्तर भेटावू नही.
8 मी ते याकोबले त्याना अपराध अनी इस्त्राएलले त्यासनं पाप दखाडाले खरच परमेश्वरना आत्मातीन, सामर्थ्यतीन, न्यायतीन अनं बळतीन पुर्ण शे.
9 याकोब घराणामाधला प्रमुखहो, इस्त्राएल घराणाना सरदारहो, ज्या तुम्हीन न्यायले नकार देतसं अनं नीट शेतस त्यासले वाकाडतसं त्या तुम्ही ऐका.
10 तुम्हीन सीयोन रक्तपात करीन अनं दुष्टाई करीसन यरूशलेम बांधतस.
11 तिना प्रमुख लाच खाईन न्याय करतस, तिना याजक वेतन लिसन धर्मशिक्षण देतस, तिना संदेष्टे पैसा लिसन भविष्य सांगतस; तरी त्या परमेश्वरवर अवलंबीन सांगतस की परमेश्वर आमना ठाई नही शे का? आमनावर काहीच संकट येवाव नही.
12 म्हणीन तुमनामुये सीयोन शेतनामायक नांगरतीन, यरूशलेम नाशना ढिग व्हई अनं मंदिरना पर्वत जंगलमाधला टेकडीनामायक व्हई.