4
परमेश्वरना शांतीनं राज्य
(यशया 2:1-4 )
शेवटना दिनमा अश व्हई की, परमेश्वरना मंदिरना डोंगर पर्वतसना माथावर स्थापन करामा ई अनी सर्वा डोंगरसपेक्षा तो उच्चा व्हईसन त्यानाकडे राष्ट्र येतीन. देशदेशना लोकसन्या झुंडीसन्या झुंडी जातीन अनं सांगतीन, चला, आपण परमेश्वरना डोंगरवर, याकोबना देवना मंदिरकडे चढीन जाऊत; तो आमले आपला मार्ग शिकाडो म्हणजे आम्हीन त्याना अनुसरन करीसनं चालसुत; कारण सीयोनमाईन शिक्षण अनं यरूशलेमाईन परमेश्वरना वचन निंघी. तो देशदेशना बराच लोकसना न्याय करी, ज्या दूर शेतस अश बलवान राष्ट्रसना न्याय ठराई, तवय त्या आपला तलवार मोडीसन त्यासना नागर बनाडतीन, आपला भालासना कोयता बनाडतीन; यानापुढे एक राष्ट्र दुसरा राष्ट्रवर तरवार उचलावू नही; त्या यानापुढे युध्दकला शिकावुत नहीत. त्या सर्वा आपापला द्राक्षमळाखाल अनं अंजिरना झाडखाल बसतीन, कोणी त्यासले भिवाडावू नही; कारण सेनाधीश परमेश्वरनी तोंडनी हाई वाणी शे. सर्व राष्ट्र आपापला देवसना नावतीन चाली राहिना शेतस; पण आम्हीन परमेश्वर आमना देव याना नावतीन सर्वकाळ चालसुत.
इस्त्राएलनी बंदिवानमाईन सुटका
परमेश्वर सांगस, त्या दिनमा मी लंगडासले जमा करसु; हाकली देयलसले अनं मी ज्यासले पीडा दिधी त्यासले एकत्र करसु. मी लंगडासले वाचाडी ठेवसु, दूर घाली देयलसना मी समर्थ राष्ट्र करसु. अनी आठेन पुढे सर्वकाळ परमेश्वर सीयोन डोंगरमा त्यासनावर राज्य करी. हे कळपना बुरूज, सीयोनकन्येना डोंगर, तुना सुरवातना राज्य तुले परत ई, यरूशलेमनी कन्याले राज्य परत प्राप्त व्हई. तर तू आते अशी मोठा आवाजतीन आक्रोश काबर करस? तुनामा कोणी राजा नही शे का? तुना मंत्री मरी जायेल शे का? कारण प्रसवती बाईनासारख्या तुले कया लागन्या शेतस. 10 हे सीयोनकन्या, तुले कळा येऊ दे; प्रसूत व्हणारी बाईनाप्रमाण तुले वेदना होऊ दे; कारण तू आते शहरना बाहेर जाशी, शेतमा वस्ती करशी अनं बाबेलपावतबी जाशी, तठे तुनी सुटका व्हई तठे परमेश्वर तुले तुना वैरीसना हातमाईन सोडाई ली. 11 आते पुष्कळ राष्ट्र तुनाविरूध्द जमा व्हयेल शेतस, त्या सांगतस, ती भ्रष्ट व्हवाले पाहिजे, आमना डोया सीयोनले दखीसन तृप्त व्हतीन. 12 पण त्यासले परमेश्वरना ईचार कळतस नही, त्याना संकल्प त्या समजत नहीत; कारण खळानाकरता पेंढ्या गोया करतस तसं त्यानी त्यसले गोया करेल शे. 13 सीयोनकन्या, ऊठ, मळणी कर; मी तुनं शिंग लोखंडनामायक अनं तुना खुर पितळनामायक करस; तू अनेक राष्ट्रसना चुराडा करशी; त्यासनी कमाई परमेश्वरले वाहशी, त्यासनी संपत्ति पृथ्वीना प्रभुले तू वाहशी.
4:3 योएल 3:10 4:4 जखर्या 3:10