6
इस्त्राएलनासंगे परमेश्वरना वाद
1 आते परमेश्वर काय सांगस ते ऐका: ऊठ पर्वतनासमोर वाद कर, डोंगरसले तुना शब्द ऐकू दे.
2 पर्वतसवनं, परमेश्वरना वाद ऐका; पृथ्वीना टिकाऊ पायासवनं, तुम्हीनबी ऐका; परमेश्वरना त्याना लोकेसनीसंगे वाद शे; तो इसत्राएलनासंगे वाद करणार शे.
3 हे मना लोकेसवन, मी तुमना काय करेल शे? माले उत्तर दया, मी तुमले कोनता कारनतीन दु:खं देयेल शे?
4 मी तर तुमले मिसर देशमाईन बाहेर आणं, दासना कोंडवाडामाईन तुमले सोडाई लिधं, मी तुनापुढे मोशे, अहरोन अनं मिर्याम यासले धाडात.
5 मनी प्रजा, मवाबना राजा बालाक यानी काय युक्ती करी, बौराना पोऱ्या बलाम यानी त्याले काय उत्तर दिधं अनी शिट्टीम अनं गिल्गाल यासना आसपास काय व्हयनं यासनी आठवण कर, म्हणजे परमेश्वरनी न्यायकृत्ये तुले समजतीन.
परमेश्वरले काय पाहिजे?
6 मी परमेश्वरनासमोर काय लिसन येऊ? परात्पर देवनासमोर नमस्कार कशे घालू? होमबलि, एक वरीसना वासरू लिसन त्यानापुढे येऊ का?
7 हजारो मेंढरासघाई, दहा हजार जैतुन तेलन्या नद्या यासनाघाई परमेश्वरले संतोष व्हई का? मनी पापनी किंमत म्हनीसनं मी मना मोठा पोऱ्याले देऊ का? मना जिवनी करेल पाप बद्दल मी आपला पोटना फळ देऊ का?
8 हे मनुष्य, चांगलं अनी वाईट काय ते त्यानी तुले दखाडेल शे; नीतितीन वागाण, आवडतीन दया करणं अनं आपला देवना समोर नम्रभावतीन चालण यानाशिवाय परमेश्वर तुनाजोडे काय मांगस?
9 परमेश्वर ह्या नगरले हाका मारी राहिना शे; जो शहाणा शे तो परमेश्वरना नाव वैखस; तुम्हीन दंडना अनं नेमनाराना ऐका.
10 अजून दुष्टना घरमा अन्यायतीन मियाडेल धन शे का? दोषास्पद अशं माप त्याना घरमा ऱ्हास का?
11 दगलबाजीना तागडा ठेईन, खोटा वजननी थैली वापरीन मी शुध्द ठरसु का?
12 तठेना धनवान लोके जूलुम करतस, तठेना रहीवासी खोटं बोलतस, अनी त्यासनी जीभ कपटघाई भरेल शे.
13 त्यामुये मी तुले मारीसनं जखमी करस, तुना पातकसमुये मी तुले उजाड करस.
14 तू खाशी पण तृप्त व्हवाव नहीस; अनी तू उपाशी ऱ्हाशी, तुना ठायी कंगालपणा राही; तू धननी सारासार करशी, पण ते तुले वाचाडता येवाव नही अनं तू काही वाचाडं तर मी ते तरवारना हवाली करसु.
15 तू पेरणी करशी पण कापणी करावुस नही, तू जैतून झाडना फळ तोडशी पण त्याना तेल स्वताले लावावू नही; द्राक्षसना उपज तोडशी पण तू द्राक्षरस पेवाव नही.
16 अम्रीना कायदा तुम्हीन पाळतस, अहाबना घराणाना चालीरीती तुम्हीन पाळतस, अनं त्यासना रिवाजपरमानं तुम्हीन चालतस, म्हणीन तुमना नाश व्हई, हाई शहरमांसला राहानारा लोके तुमनी चेष्टा करतीन; मना लोकसनी अप्रतिष्ठा तुमले सोसना पडी.