2
खोटा संदेष्टा अनी खोटा शिक्षक
1 तरी इस्त्राएल लोकसमा बी खोटा संदेष्टा व्हतात तसा तुमनामा बी खोटा शिक्षक उत्पन्न व्हतीन; त्या नाशकारक पाखंडी मत गुप्तपणतीन प्रचारमा आणतीन; ज्या गुरूनी त्यासले ईकत लिधं त्याले बी त्या नाकारतीन; अनी स्वतःवर नाश वढी लेतीन.
2 त्यासना कामातुरपणनी वागणुकनं अनुकरण बराच लोक करतीन; त्यासनामुये सत्यमार्गनी निंदा व्हई.
3 त्या लोभी व्हईसन बनाडेल भाषण तुमले सांगीन पैसा कमाडतीन; त्यासनाकरता नेमेल दंड पहिला पाईनच उशीर करस नही; अनी त्यासना नाश झोपस नही.
4 ज्या देवदूतसनी पाप करं त्यासले देवनी सोडं नही; तर त्यासले नरकमा टाकं अनी न्यायनिवाडाकरता साखळघाई बांधीसन अंधकारमय दरीमा ठेयल शे;
5 त्यानी प्राचीन जगले बी सोडं नही तर अभक्तसना जगवर जलप्रलय आणा अनी धार्मीकताना उपदेशक नोहा यानं सात जणससंगे रक्षण करं;
6 पुढे व्हणारा अभक्तसले दृष्टांत देवाकरता सदोम अनं गमोरा ह्या शहरसले भस्म करीसन त्यासले विध्वंसनी शिक्षा करी;
7 अनी अधार्मिक लोकसना, कामातुर वागणुकतीन त्रासेल धार्मीक लोट यानी सुटका करी;
8 तो नितीमान माणुस त्यासनामा राहि राहिंता; तवय त्यासनी अनैतीक कामसले दखीन अनं त्यासनाबद्दल ऐकीन त्याना धर्मशील जीव दिननदिन कासाविस व्हई राहिंता.
9 भक्तीमान लोकसले परिक्षामातीन सोडावणं अनं अधार्मिक लोकसले शिक्षा भोगत न्यायना दिनकरता राखी ठेयल शे हाई प्रभुले कळस.
10 विशेष म्हणजे अमंगळपणना वासनाघाई शरिरसुखना मांगे लागणारा अनी अधिकार तुच्छ यासले मांगे ठेवानं हाई प्रभुले समजस. त्या उध्दट, थोर लोकसनी निंदा कराकरता नही घाबरणारा, असा शेतस.
11 शक्तीतीन अनं पराक्रमतीन जास्त असा देवदूत बी प्रभुसमोर त्यासना अपमान करीसन दोषी ठरावस नही.
12 त्या निर्बुध्द प्राणी स्वतःले कळस नही असासबद्दल निंदा करतस; पकडाई जाईन त्यासना नाश व्हवाणं एवढाकरता जन्मेल प्राणीसनामायक त्या शेतस; त्यासना भ्रष्टतातीन नाश व्हई.
13 दुसरासनं वाईट करामुये त्यासनंच वाईट व्हई, त्यासले एक दिनना चैनबाजीमा सुख मानतस, त्या डाग अनं कलंकीत लोके शेतस, त्या तुमनासंगे मेजवानी खातांना कपटन्या गोष्टी करतस.
14 त्यासना डोया वेश्यावृत्तीतीन भरले शेतस अनी पाप कराशिवाय त्यासले राहवस नही; त्या अस्थिर मनसना लोकसले मोह घालतस; त्यासनं हृदय लोभी शे. त्या शापना पोऱ्या शेतस;
15 त्या सरळ रस्ता सोडीन बहकनात, बौरना पोऱ्या बलाम यानामांगे त्या चालनात; त्याले अधर्मनं वचन प्रिय व्हतं.
16 त्याले त्याना उल्लंघनबद्दल दंड व्हयना, मुका गधडानी मनुष्यवाणीतीन बोलीसन संदेष्टासना येडापणा थांबाडा.
17 त्या सुख्खा झरा, वादयघाई उडायेल धुकं, असा शेतस. त्यासनाकरता दाट काळोख अंधार राखेल शे.
18 भ्रममा राहणारा लोकसमातीन त्या बाहेर नही पडताच त्या लोके त्यासले फुगीरपनण्या गोष्टी सांगतस अनी वासनानी शारिरीक भूकमा टाकीसन त्यासनामा कामातुरपणाना मोह टाकतस.
19 त्या त्यासले स्वतंत्रनं वचन देतस अनी स्वतः तर भ्रष्टताना दास शेतस कारण ज्यानी एखादाले जिंकी लिधं तर तो त्याले दास बनाडस.
20 प्रभु अनी तारणारा येशु ख्रिस्त यानी वळख मुये जगमा बाबा प्रकारनी शुध्दताघाई वाची निंघनात अनी परत त्यामा फसीसन हारी गयात तर त्यासनी नंतरनी परीस्थीती पहिली परीस्थिती पेक्षा बी खराब व्हस.
21 कारण नितीना गोष्टीसनी वाट समजीसन येवानंतर आपले देयल पवित्र आज्ञाकडे पाठ फिरावनं यानापेक्षा ती नही समजनं हाई त्यासनाकरता बरं व्हतं.
22 वकीन चाटाले जाणारा कुत्रा अनी डुक्करले कितल बी धोयं तरी तो परत चिख्खलमाच जास या म्हणना मायक ह्यासनी गोष्ट सत्य व्हयेल शे.