3
खरा सत्य
1 मना भाऊ अनी बहिणीसवन, आते इतलंच सांगानं शे की प्रभुमा एक व्हईन आनंद करा. असा गोष्टी तुमले लिखाले मी कटाळा करस नही, त्या तुमले दृढ करणाऱ्या शेतस.
2 ज्या कुत्रा वाईट गोष्टी करतस अनं ज्या सुंता कराकरता दोष देतसं असा लोकसपाईन सावध रहा.
3 ज्या आपन देवना आत्माघाई सेवा करनारा, ख्रिस्त येशुबद्दल अभिमान बाळगणारा अनी शरिरवर भरवसा नही ठेवणारा त्या आपन खरा सुंता व्हयेल शेतस;
4 तरी शरिरवर बी भरवसा शे, जर दुसरा कोनले शरिरवर भरवसा ठेवाना अस वाटनं तर जास्त वाटी.
5 मी तर आठवा दिनले सुंता व्हयेल, इस्त्राएल जातीना, बन्यामीन वंशना, इब्रीसना खरा रंगतना इब्री; नियमशास्त्रना नजरतीन मी परूशी व्हतू,
6 मना आस्थाबद्दल सांगानं तर मी मंडळीना छळ करेल शे, नियमशास्त्रनी ठरायेल नितीमत्वाबद्दल मी निर्दोष शे.
7 तरी ज्या गोष्टीसना माले लाभ व्हता त्या आते मी ख्रिस्तकरता नुकसान अस समजस.
8 इतलंच नही, तर ख्रिस्त येशु मना प्रभु, त्यानाबद्दलना सर्वश्रेष्ठ ज्ञानमुये मी बाकी सर्वकाही नुकसान समजस, त्यानाकरता सर्वकाही मी गमाडेल शे. ख्रिस्त मिळाकरता मी सर्वकाही कचरा समजस.
9 अनी मी त्यानाठायी ऱ्हायेल असा सापडाले पाहिजे, मनं नितीमत्व नियमशास्त्रना योगे मिळेल नही, तर त्या ख्रिस्तवरला ईश्वासतीन, म्हणीसन देवपाईन ईश्वासतीन मिळणारं नितीमत्व अस शे.
10 हाई असाकरता की तो त्याना पुनरूत्थानना सामर्थ्य अनी त्याना दुःखना भागीपण हाई मी त्याना मरणले अनुरूप व्हईसन समजी लेवानं.
11 म्हणीसन माले कसं बी प्रकारे मरण माईन पुनरूत्थान मिळाले पाहिजे.
ध्येयाना दिशाकडे धावानं
12 हाई अस नही की मी पहिलेच बक्षीस मिळाडेल शे किंवा पहिलेच परिपुर्ण व्हयेल शे. ज्या बक्षीसकरता ख्रिस्त येशुनी माले ताबामा लिधं ते बक्षीस मिळाडाकरता मी प्रयत्न करस.
13 मना भाऊ अनी बहिणीसवन, ते मी मिळाडं अस समजस नही, पण एक गोष्ट शे की, ती कराना मी निश्चय करस, जे भुतकाळमा शे ते मी ईसरस, अनी जे मनासमोर शे ते मिळाडाना प्रयत्न करस.
14 ख्रिस्त येशुमा जे वरनं पाचारन, जे देवनं बक्षीस ते जिंकाकरता मर्यादावरनी खुनकडे मी धावस.
15 तर जितला आपण प्रौढ शेतस तितलासनी हाऊ भाव धराले पाहिजे, अनी तुम्हीन एखादी गोष्टबद्दल दुसरा भाव धरा, तरी देव ते बी तुमले प्रकट करी.
16 इतलंच की, आपन ज्या नियमतीन आतेपावत चालनुत त्याच नियमतीन पुढे बी चालाले पाहिजे.
17 मना भाऊ अनी बहिणीसवन, तुम्हीन सर्वाजनं मना अनुकरण करनारा असा व्हा, अनी आम्हीन जसं तुमनासमोर दृष्टांत शेतस, त्याप्रमाणतीन ज्या चालतस त्यासनाकडे बी ध्यान ठेवा.
18 कारण याना पहिले मी तुमले जसं बराच वेळा सांगं अनी आते बी परत रडीसन सांगस, बराचजनं असा शेतस की, ज्या ख्रिस्तना क्रुसखांबना वैऱ्यासनामायक वागतस.
19 नाश हाऊ त्यासना शेवट, शरिरनी ईच्छा हाई त्यासना देव, अनी लाज हाई त्यासनं गौरव शे, त्यासनं चित्त पृथ्वीवरला गोष्टीसवर ऱ्हास.
20 आपलं नागरिकत्व तर स्वर्गीय शे तठेईन प्रभु येशु ख्रिस्त हाऊ तारणारा असा ई, यानी आपन वाट दखतस.
21 त्याना ज्या सामर्थ्यघाई तो सर्वकाही आपला स्वाधीन कराले समर्थ्य शे त्यानाघाई तो आपलं शरीर बदली टाकी, अनी त्याना वैभवी शरिरनामायक करी.