4
बोध
1 म्हणीसन मना भाऊ अनी बहिणीसवन, तुमनाकडे मना ध्यान लागेल शे, तुम्हीन मना आनंद अनी अभिमान शेतस, प्रिय भाऊ अनी बहिणीसवन, मी तुमले सांगाप्रमाणे तुम्हीन प्रभुमा तसाच स्थिर ऱ्हावाले पाहिजे.
2 मी युवदीयीले अनी संतुखीले ईनंती करस की, तुम्हीन बहिणी प्रभुना ठायी एकचित्त राहा;
3 मना ईश्वासु सहकारीसवन, मी तुमले सांगस की, ज्या बाईसनी मनासंगे सुवार्ताना प्रचार कराकरता कष्ट लिधं अनी ज्यासनी नावे देवनं जिवनना पुस्तकमा लिखेल शेतस त्यासले कृपा करीसन मदत करा.
4 प्रभुमा एक व्हईसन सर्वदा आनंद करा; परत सांगस, आनंद करा.
5 तुमनी सौम्यता सर्वासले समजाले पाहिजे, प्रभुनं येणं जोडे येल शे.
6 कसानी बी काळजी करानी नही तर सर्व गोष्टीसबद्दल प्रार्थना अनी ईनंती करीसन आभार प्रदर्शनासंगे आपली मागणी देवले सांगा.
7 म्हणीसन सर्व बुध्दी सामर्थ्यना पलीकडे असेल देवनी शांती तुमना अंतःकरण अनी तुमना ईचार ख्रिस्त येशुमा राखी.
8 मना भाऊ अनी बहिणीसवन, शेवट ईतलच सांगस की, जे काही सत्य, सन्मान, न्याय, शुध्द, प्रिय, सुश्राव्य, जो काही सद्गुण, जी काही स्तुती त्यासनं मनन करा.
9 जे तुम्हीन शिकणात, जे स्विकारणात, अनी मनं ऐकं अनं दखं ते करा; म्हणीसनं शांतीना देव तुमनासंगे राही.
दान भेटाबददल धन्यवाद
10 माले प्रभुमा मोठा आनंद व्हयना की आते तरी तुमनी मना बद्दलनी काळजी परत जागी व्हयनी; हाई काळजी तुम्हीन करी राहींतात, पण ती दखाडाले तुमले संधी भेटनी नव्हती.
11 मी हाई गरजपोटी बोलस अस नही, कारण शे त्या स्थितीमा मी समाधानी ऱ्हावाले शिकनु शे.
12 अडचणमा ऱ्हावानं माले समजस, संपन्नतामाही ऱ्हावानं समजस; प्रत्येक प्रसंगले अनी सर्व प्रसंगले अन्नतृप्त ऱ्हावानं, अनी उपाशी बी ऱ्हावानं, संपन्न ऱ्हावानं अनी गरीब बी ऱ्हावानं, ह्यानं शिक्षण माले भेटेल शे.
13 जो ख्रिस्त माले सामर्थ्य देस त्यानाद्वारा मी सर्व परिस्थीतीना सामना करू शकस.
14 त्यामुये मना संकटमा तुम्हीन मना सहभागी व्हयनात हाई चांगलं करं.
15 फिलीप्पैकरसवन, तुमले बी माहीत शे की, सुवार्ताना सुरवातना दिनमा, मी मासेदोनियातीन निंघनु, तवय फक्त तुमना शिवाय कोणती बी मंडळीनी मनासंगे देवान घेवानना व्यवहार करा नही.
16 मी थेस्सलनीकामा व्हतु तवयच मना गरजकरता तुम्हीन एकपेक्षा जास्त दाव माले मदत धाडी.
17 मी तुमना कडतीन बक्षिसनी ईच्छा धरस अस नही, तर तुमना हिसाबनी जास्त वाढ व्हवाले पाहिजे अशी ईच्छा धरस.
18 माले पाहिजे ते सर्व मनाजोडे शे अनी जास्त बी शे, तुमनापाईन येल बक्षिस एपफ्रदीसना हाततीन भेटामुये माले भरपुर व्हयनं, ते मधुर सुगंधी अर्पण स्विकाराले योग्य अस यज्ञ जो देवले संतोष दि अस शे.
19 मना देव आपला संपत्यनुरूप तुमनी सर्व गरज ख्रिस्त येशुना गौरवमा पुराई.
20 आपला देवपिता याले युगानुयुग गौरव राहो. आमेन.
सलाम
21 ख्रिस्त येशुमा प्रत्येक पवित्र जणसले सलाम सांगा. मनासंगेना भाऊ तुमले सलाम सांगतस.
22 सर्व पवित्रजन अनी विशेषकरतीन कैसरना घरना तुमले सलाम सांगतस.
23 प्रभु येशु ख्रिस्तनी कृपा तुमना सर्वाससंगे राहो.