7
लगीन वरीन करेल बोध
1 भाऊ अनी बहिणीसवन, ज्यासले नियमशास्त्रानी माहिती शे असं लोकसनासंगे मी बोली ऱ्हायनु शे, मनुष्य जोपावत जिवत शे तोपावत त्यानावर नियमशास्त्रानी सत्ता शे हाई तुमले नही माहीत का?
2 कारण ज्या बाईले नवरा शे, ती बाई नवरा जिवत शे तोपावत त्यानी लगीन व्हयेल बाई नियमशास्त्रतीन त्याले बांधेल ऱ्हास; पन तिना नवरा मरावर त्याना बंधन मातीन तिनी सुटका व्हस.
3 म्हणीन नवरा जिवत ऱ्हाईसन बी जर ती दुसरा पुरूषनी बाई व्हस, तर तिले व्यभिचारीन म्हणतीन, पन नवरा मरावर ती त्या बंधनमाईन मुक्त व्हस; मंग ती दुसरा पुरूषनी बाई व्हयनी तर ती व्यभिचारीन व्हस नही.
4 म्हणीन मना भाऊ अनी बहिणीसवनं, तुम्हीन पन ख्रिस्तना शरिरद्वारा नियमशास्त्रले मरेल जायेल अस शेतस; म्हणजे तुम्हीन दुसराना, जो मरेल मातीन ऊठेल शे, त्याना व्हवाले पाहिजे; म्हणजे आपन देवले फळ देवाले पाहिजे.
5 कारण आपन शरीर स्वभावना अधीन व्हतुत, तवय नियमशास्त्रना द्वारा उद्रवयेल पापनी वासना आपला अवयवमा मरणले फळ देवाकरता कार्य करी राहिंतात.
6 पन आपन ज्याना बंधनमा व्हतुत त्याले आपन मरेल ऱ्हावामुये आपन आते नियमशास्त्र पाईन मुक्त व्हयेल शेतस, ते यानाकरता की, आपन आत्माना नविनपनतीन सेवा करानं, शास्त्रलेखना जुना पनतिन नही.
नियमशास्त्र अनं पाप
7 मंग काय म्हणानं? नियमशास्त्र पाप शे का? कधीच नही. पण माले नियमशास्त्रना शिवाय पाप समजत नही, “लोभ धराना नही” अस नियमशास्त्रमा सांगा शिवाय माले लोभ कळता नही.
8 पापनी संधी साधीन हाई आज्ञानं योगे मनामा सर्वा प्रकारना लोभ निर्माण व्हयेल व्हता; कारण नियमशास्त्रा शिवाय पाप निर्जीव शे.
9 मी नियमशास्त्राना शिवाय व्हतु तवय जगी राहिंतु पण नियमशास्त्र येवावर पाप संजिवीत व्हयनं अनी मी मरण पावनु.
10 अनं जिवननासाठे देयल आज्ञा हाई मराकरता कारण व्हयनी हाई माले दखायनं.
11 कारण पापनी नियमशास्त्राना योगे संधी साधीसन माले फसाडं अनं तेना योगे माले ठार करं.
12 म्हणीसन नियमशास्त्र पवित्र शे, तसच आज्ञा पवित्र, न्याय अनं चांगलं शे.
13 तर मंग जे उत्तम तेच माले मरण अस व्हयनं का? कधीच नही! पाप ते पापच दखावाले पाहिजे, म्हणीसन जे उत्तम त्याना योगे ते मनाठायी मरण घडवणारा अस व्हयनं, नियमशास्त्राना आज्ञानायोगे पाप पराकाष्टाना व्हवाले पाहिजे म्हणीसन अस व्हयनं.
मनुष्यंसना दैहिक अनं आध्यात्मिक लढा
14 कारण आपलाले हाई माहित शे की, नियमशास्त्र हाई अध्यात्मिक शे, पन मी शारीरतिन शे अनी पापले ईकायेल शे.
15 कारण मी काय करी ऱ्हायनु हाई माले कळस नही; अनी मी ज्यानी ईच्छा मी करस ते मी करस नही, अनी ज्यानी ईच्छा मी करस नही ते मी करस.
16 तर मनी ईच्छा शे ते मी करस नही तर नियमशास्त्र चांगलं शे हाई मी मानस.
17 मंग आते मी ते करस नही मनामाधलं पाप ते करस
18 कारण माले माहित शे मना शरीरमा काहीच चांगलं राहस नही कारण ईच्छा करानं मनाजोडे शे, पण चांगलं ते करानं माले जमस नही.
19 कारण मी जे चांगलं करानी ईच्छा शे ते मी करस नही तर मी ज्यानी ईच्छा मी करस नही ते वाईट मी करस.
20 मंग ज्यानी माले ईच्छा नही ते जर मी करस तर ते मी नही तर मनामाईन पाप ते करस.
21 मंग जर मी चांगलं करी ऱ्हायनु तवय पाप मना हातमा शे हाई दिसस.
22 कारण मी मना अंतर्यामी देवना नियमशास्त्रतीन खूश व्हस.
23 पन मना शरिरमा एक असा नियम दिसस, तो मना मनमातला नियमससंगे लढिसन, माले मना शरिरमातला पापना नियमसना स्वाधीन करस.
24 मी कितला दुःखी माणुस; माले ह्या मरणमाधलं शरिरमातीन कोण सोडाई.
25 मी आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्याना कडतीन देवना उपकार मानस, जो माले मुक्त करस,
म्हणजे मी स्वतःना मनतिन देवना नियमसना दास्य करस, पन शरीरतिन पापना नियमना दास्य करस.